Submitted by Asu on 11 October, 2019 - 02:21
सृजन सोहळा
शालू हिरवा पृथ्वी ल्याली
सूर्यबिंब कुमकुम भाली
क्षितिजावरती भल्या सकाळी
वसुंधरेच्या गाली लाली
नववधूसम अंगी भरली
सोनपिवळ्या रंगी न्हाली
सुखसमृद्धीचे रूप हिरवे
रानोरानी दिसते बरवे
सृष्टी प्रसवली हिरव्या रंगा
हिरवा शालू सर्व अंगा
धरतीचा हिरवा सृजन सोहळा
हिरवा हिरवा रंग वेगळा
निळ्या नभाची निळी निळाई
पावसातून भूमीत पडे
पिवळ्या पिवळ्या सूर्यकिरणांची
पिवळाई मग त्यात मिसळे
निळा पिवळा मिलन होता
बीजातून हिरवे रूप खडे
निळ्या नभातून किरणे झरता
हिरवे वाटे जग सगळे
- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूपच छान. कोणीतरी चाल लावायला
खूपच छान. कोणीतरी चाल लावायला हवी!! निसर्गावरचे, छानसे गाणे होइल.
नावातच जिंकलत.
मनःपूर्वक धन्यवाद!
मनःपूर्वक धन्यवाद!
आपण न्यू जर्सीला आहात असे
आपण न्यू जर्सीला आहात असे दिसते. 'मराठी विश्व एनजे'च्या 'रंगदीप' दिवाळी अंक २०१८ मध्ये माझं साहित्य प्रकाशित झालं होतं आणि आता 'रंगदीप' दिवाळी अंक २०१९ मध्येही प्रकाशित होईल. शक्य असल्यास जरूर वाचावे.
जरुर!! मराठी विश्वची मेंबरशिप
जरुर!! मराठी विश्वची मेंबरशिप घ्यायचा विचार आहेच.