चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुशिन्चा मुलगा माझ्या मेव्हण्याच्या शेजारीच रहातो..बावधन मधे. त्याला विचारता येइल...>>>>>> बब्बन, कुठे हरवलात?

बब्बन, 'समग्र सुशि' मलाही हवाय.

सुशि ज्युनीअर आणि मायबोली असे मिळून काही करता येणे शक्य आहे का?

बुकगन्गावर बघितलय. बहुतेक पुस्तके आहेत सुशिची तिकडे. सुशिच्या नोव्हेलसचा एक सेट सुद्दा आहे. पण मला हवी असलेली पुस्तके नेमकी ' आउट ऑफ स्टॉक' आहेत. Sad उदा. क्षणोक्षणी, सॉरी सर.

अरे वा अमेझॉनवर बरीच आहेत की. बुकगंगावर ५-६ महिन्यापुर्वी फार नाही दिसली. थँक्स बब्बन. तरी विचारलेली माहिती मिळाली तर लिहा. फेसबुकवर काही विशिष्ठ गॄप आहे का? (फेसबुकवर जात नसते पण जाऊन पाहीन)

धन्स बब्बन. ते ' क्षणोक्षणी, सॉरी सर' बद्दल काही माहिती मिळाली ( ती पुस्तके मिळण्याबद्दल) तर इथे कळवा प्लिझ!

सुशि नवीन चालू करणाऱ्या मुलांनो,
सनसनाटी,झूम,निमित्तमात्र,बरसात चांदण्यांची,दुनियादारी, जाता येता पासून चालू करून मग हळूहळू दारा बुलंद,मंदार,फिरोज इराणी,अमर विश्वास कडे जा.सुशी स्टाईल ला सरावलं नसलं तर कंटाळायला होतं नाहीतर.
बरसात चांदण्यांची हे एक मस्त पुस्तक आहे.

Happy
मला वाटतं आपापल्या आवडीप्रमाणे सुरूवात करायला हवी. जर थ्रिलर्स आवडत असतील तर मंदार आणि फिरोज पासून सुरूवात करावी. कोर्टरूम ड्रामा आवडत असेल तर अमर पासून. निवांत कादंबर्‍या आवडणारा पिंड असेल तर मी_अनु म्हणते त्या मार्गाने जायला हरकत नाही. हॉरर्स आवडत नसतील तर मातम, धुकंधुकं, समथिंग, स्पेलबाऊन्ड वगैरे सारखी पुस्तकं वाचू नयेत Proud पर्सनली मला दारा बुलंदच्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. डाकूंच्या गोष्टी आवडत असतील तरच दारा वाचायला घ्या.

(कोणी हे सर्व प्रतिसाद सुशि धाग्यावर हलवेल का?)
मला दारा बुलंद च्या गोष्टी खूप डिप्रेस करतात.त्यात खूप हिंसा असते.शिवाय आधी प्रचंड ट्रेजीडीज झाल्याशिवाय दारा ची एन्ट्री होत नाही.शिवाय ती होऊन पण गोष्टी थांबवण्या पेक्षा झालेल्या वाईट गोष्टींचा सूड इतकंच असतं.दारा कथांमध्ये कोणीही शेवटी सुखाने नांदत नाही.शेवटी फुल वाताहत असते.
अमर विश्वास आणि मंदार सुखासुखी केस सोडवतात.त्यांचा पर्सनल लॉस होत नाही.आणि त्यांच्याकडे खूप लक्झरी कार्स असतात.
फिरोज हे जेम्स बॉण्ड चे सुशि व्हर्जन आहे.त्याच्या नायिका सारख्या मरतात. पण तो भरपूर पैसे मिळवून खुश असतो.

बरसात चांदण्यांची >> एकदम मस्त आहे. आयुष्यातली पहिली कादंबरी शाळकरी वयातली. प्रेम नावाचा प्रकारही ठाऊक नव्हता. तरी किंचीत गुदगुल्या झालेल्या.
मग मंदार अथवा अमरविश्वास नवरे म्हणुन हवे झाले कॉलेज संपेपर्यंत. Lol Lol :
मग निष्ठुर दुनियेशी ओळख झाली Lol Lol

धागा बदला हो, इथे फक्त चित्रपटाच्या गप्पा करा

मेलं आशेने यावं, कुठल्यातरी चित्रपटाबद्दल वाचायला मिळेल म्हणून, तर पुस्तकं चर्चिली जाताहेत हे बघायला मिळतं. Happy Happy

मला दारा बुलंद च्या गोष्टी खूप डिप्रेस करतात.त्यात खूप हिंसा असते.शिवाय आधी प्रचंड ट्रेजीडीज झाल्याशिवाय दारा ची एन्ट्री होत नाही.शिवाय ती होऊन पण गोष्टी थांबवण्या पेक्षा झालेल्या वाईट गोष्टींचा सूड इतकंच असतं.दारा कथांमध्ये कोणीही शेवटी सुखाने नांदत नाही.शेवटी फुल वाताहत असते. >>>>>> अनुराग कश्यप किव्वा राम गोपाल वर्मा यावर चान्गला सिनेमा काढू शकेल.

धाग्याला लाईन वर आणण्यासाठी..
वॉर पाहिला. अ आणि अ सीन्सने ठासून भरलेला अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमा. जय जय शिव शंकर गाणं प्रेक्षणीय.
...फक्त आणि फक्त हृतिक आणि टायगर असल्यामुळे सिनेमा सहन तरी करता आला. दुसरं कोणी असतं तर जाम बोअर झाला असता ! या दोघांचे फॅन असल्यास नक्की पहा.

कुणी स्काय इज पिंक पाहिलाय का?
दिग्दर्शक आणि कलाकारांची नावे पाहता एक सशक्त कलाकृती असेल असं वाटतं.
लहान मुला ला (वय वर्ष 8) घेऊन जाऊ शकतो का?

कुणी स्काय इज पिंक पाहिलाय का?
दिग्दर्शक आणि कलाकारांची नावे पाहता एक सशक्त कलाकृती असेल असं वाटतं.
लहान मुला ला (वय वर्ष 8) घेऊन जाऊ शकतो का? >> चित्रपट पाहिला नाही, पण चांगला आहे असं ऐकलं, लहान मुलाला नेण्याबद्दल आयडिया नाही.

स्काय इज पिंक काल माझी मुलगी बघून आली. भावनिक सिनेमा आहे ़ खर्‍या घटने वर आधारित आहे. प्रियांका व फरहान ह्यांनी चाम्गली कामे केली आहेत. भावनाप्रधान असल्याने मुली अर्धावेळ डोळे पुसत बघत होत्या. कथा सांगणे थोडे पसरट झाले आहे. पन कामे सर्वांची टॉप क्लास आहेत. ह्यातल्या मुलीला ऑटो इम्युन डिसीज असतो. मी तर पूर्ण वेळ रडेन म्हणून गेले नाही वीकांताला. लेक सुट्टी साठी आली की तिच्याबरोबर
डिस्कशन करेन. तिने ह्या चित्रपटाचे प्रोड्युसर रॉय कपूर फिल्म्स बरोबर समर इंटर्न शिप केलेली आहे. त्यामुळे जरा आमची अटाच मेंट जास्ती. त्या प्रोजेक्ट मध्ये असताना ह्या प्रोजेक्ट बद्दल कळत होते. बघा एकदा.

(कोणी हे सर्व प्रतिसाद सुशि धाग्यावर हलवेल का?)
मला दारा बुलंद च्या गोष्टी खूप डिप्रेस करतात.त्यात खूप हिंसा असते.शिवाय आधी प्रचंड ट्रेजीडीज झाल्याशिवाय दारा ची एन्ट्री होत नाही.शिवाय ती होऊन पण गोष्टी थांबवण्या पेक्षा झालेल्या वाईट गोष्टींचा सूड इतकंच असतं.दारा कथांमध्ये कोणीही शेवटी सुखाने नांदत नाही.शेवटी फुल वाताहत असते.
अमर विश्वास आणि मंदार सुखासुखी केस सोडवतात.त्यांचा पर्सनल लॉस होत नाही.आणि त्यांच्याकडे खूप लक्झरी कार्स असतात.
फिरोज हे जेम्स बॉण्ड चे सुशि व्हर्जन आहे.त्याच्या नायिका सारख्या मरतात. पण तो भरपूर पैसे मिळवून खुश असतो.>>>>>>>>>

मला आळशी मुलिला कुणी सुशिंच्या धाग्याची लिंक आयती देईल का प्लीज ?

या विकांताला ' maleficent" पाहिला ईतके वर्शानी . आवडला . अ‍ॅन्जी तशी फारशी आवडत नाही पण ईथे एक्दम फीट वाटली .
तिचा मेकप , बोलणं , ताठा सगळं आवडलं .
sleeping beauty ल दिलेला ट्वीस्ट आवडला .

ईथले रेको वाचून , मनोरमा ... पाहिला .
बराचसा स्लो आहे . पण पूर्ण चित्रपटाची ट्रीटमेन्ट आवडली .

फास्ट अँड फ्युरियस, मिशन इंपॉसिबल असे पिक्चर्स आवडत असल्याने वॉर खुप आवडला. मस्त झालेत सगळे प्रसंग. पिक्चर काही तरी लॉजिक लावून बघणार असाल तर नका बघू Proud

बाकी ह्रितीक आणि तेंदूआ दोघेही भन्नाट दिसतात आणि अ‍ॅक्शन करतात. त्या वाणी कपूर पेक्षा तेंदूआचे अजून एखादे गाणे चालले असते. काय डान्स करतात दोघे !!!

गोड दिसतात दोघे
ह्रितिक आल्यावर थिएटरमध्ये बाई पुरुष सर्वानी शिट्ट्या मारल्या
काय दिसतो
टायगर गोड आहे पण सिनियर महाराजांपुढे (वयाने) लहान पडलाय.

Pages