लोग जालीम है हर इक बात का ताना देंगे।

Submitted by सतीश कुमार on 9 October, 2019 - 21:47

लोग जालीम है हर इक बात का ताना देंगे।

आज१० ऑक्टोबरला प्रख्यात गझल गायक जगजीत सिंग यांची पुण्यतिथी. कविता आणि संगीत या विषयातील रसिक, आणि विशेषतः गझल कानसेन यांना जगजीतसिंग यांची नव्याने ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. सिर्फ नाम ही काफ़ी है।

१९७६ साली " द अन्फर्गेटेबल " हा जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांचा अल्बम प्रकाशित झाला आणि ही जोडी रातोरात स्टार झाली. कुठल्याही गझल संग्रहाला हिंदी अथवा उर्दू शीर्षक देण्याची प्रथा असे. या गझल अल्बमला इंग्रजी नाव देण्याची सूचना चित्रा सिंग यांच्या वडिलांनी केली आणि जगजीत सिंग यांनी होकार दिला, आणि गझल संग्रहाला इंग्रजी नाव देण्याचा पायंडा पडला. किती समर्पक नाव दिलं गेलं य! खरेच न विसरता येणारे, कायम स्मरणात राहतील असे.

उराशी स्वप्नं बाळगून मुंबईला आल्यावर जगजीत सिंग पार्श्व गायनाच्या क्षेत्रात नशीब आजमावत होते. शेर - ए - पंजाब या हॉटेलच्या कळकट खोलीत दिवस काढल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी जिंगल गायनाची संधी त्यांना मिळाली. चित्रा सिंग ( म्हणजे पूर्वीच्या चित्रा दत्त) यांचे पती देबू दत्त तेंव्हा ध्वनिमुद्रण या क्षेत्रात काम करत आणि त्यासाठी लागणारी उच्च दर्जाची ध्वनिमुद्रण यंत्रे केवळ त्यांच्याकडेच होती आणि हे काम ते घरातच करत. श्याम बेनेगल, वनराज भाटिया आणि मृणाल सेन अशी मंडळी ह्या रेकॉर्डिंग स्टुडिओत येत तेंव्हा जगजीत सिंग ही येत असत कारण जिंगल तिथेच ध्वनिमुद्रित केले जात असे. चित्रा सिंग ही जिंगल गात असत. चित्रा सिंग यांची कन्या मोनिका जगजितसिंग यांना अंकल असे संबोधित असे. काही काळानंतर देबु आणि चित्रा यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. चित्रा सिंग यांच्या त्या वेळच्या दोलायमान मानसिक स्थितीत जगजीत सिंग यांनी त्यांना आधार दिला. मोनिकाचीही काळजी ते घेत असत. जगजीत आणि चित्रा यांची जवळीक वाढली आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्यांची वाढणारी जवळीक आणि लग्न या मधल्या काळात चित्रा यांच्यावर येणारे मानसिक दडपण यांचे वर्णन याच अल्बम मधील " बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी" या काव्यात केलेले आहे. लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष न देता कशाचेही दडपण बाळगू नकोस असं यात म्हटलेलं आहे. ह्या काव्याला नज़्म असे म्हणतात. नज़्म म्हणजे एकाच विषयावरील संपूर्ण काव्य. गझल मध्ये मात्र दोन ओळींचे अनेक शेर असतात आणि त्यांचे विषयही एकमेकांपासून स्वतंत्र असतात.

बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी
( विषय निघालाच तर फार वाढत जाईल)

लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे
( लोकं तू उदास का आहेस याचं कारण विचारतील)

ये भी पूछेंगे के तुम इतनी परेशां क्यूँ हो
( हे ही विचारतील तू एवढी चिंता कसली करतेस)

उंगलियां उठेंगी सूखे हुए बालों की तरफ़
( तुझ्या विस्कटलेल्या केसांकडे बोट दाखवतील)

एक नज़र देखेंगे गुज़रे हुए सालों की तरफ़
( तुझं वय झालंय आता असं ही म्हणतील )

चूड़ियों पर भी कई तंज़ किये जायेंगे
( तुझ्या हातातल्या बांगड्या वर ही टोमणे मारतील)

काँपते हाथों पे भी फ़िकरे कसे जायेंगे
( ( त्यांना उत्तर देताना ) तुझ्या थरथरणाऱ्या हातांवर व्यंग करतील)

लोग ज़ालिम हैं हर एक बात का ताना देंगे
( लोकं दुष्ट आहेत, प्रत्येक गोष्टीवर वर्मी लागेल असं बोलतील)

बातों बातों में मेरा ज़िक्र भी ले आयेंगे
( बोलत असताना माझाही विषय काढतील)

उनकी बातों का ज़रा सा भी असर मत लेना
( त्यांच्या बोलण्याचा ( मनावर ) जराही परिणाम करून घेऊ नकोस)

वरना चेहरे की तासुर से समझ जायेंगे
( नाहीतर चेहऱ्यावरच्या हावभावावरून त्यांना कळेल

चाहे कुछ भी हो सवालात ना करना उनसे
( काहीही झालं तरी त्यांच्याशी वाद करू नकोस)

मेरे बारे में कोई बात न करना उनसे
(माझ्या बद्दल काहींचं सांगू नकोस)

बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी
( विषय निघालाच तर फार वाढत जाईल)

_______

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.
(तुमचा हा लेख आज मटा मधे वाचला)

सुंदर लेख..
गझलांमधले उर्दु शब्दांचे अर्थ प्लीज खाली लिहाल का? नंतर लक्षात राहायला सोप पडेल.. Happy
पुलेशु!

@मन्या s, धन्यवाद. निश्चितच. उर्दू शब्दांचा अर्थ कळला कि गझलांची खुमारी वाढते.मी लक्षात ठेवीन पुढच्या वेळी.