विठ्ठल नामाचं चांदणं

Submitted by पुरंदरे शशांक on 13 October, 2019 - 03:25

विठ्ठल नामाचं चांदणं

त्याच्या अंगणी सांडलं
विठ्ठल नामाचं चांदणं

त्याच्या ह्रदयी गोंदण
विठूनामाचं स्मरण

त्याच्या श्वासी रुणुझुण
जपमाळ नारायण

तोचि होऊनी विठ्ठल
करी विठू गुणगान

विश्वात्मक तुका जाण
अवकाशी संकीर्तन
विठ्ठल नामाचं चांदणं
टाकी आकाश न्हाऊन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता आवडली.. Happy
माझ्या छोट्याश्या डोक्यात तुमची कविता वाचताना आलेल्या काही ओळी.. Happy

विठु नसे
तो कोणी जगावेगळा
भाव असे
तो मनी आगळा
विठुनामाचा तो
छंद सोहळा
देहु-आळंदी जमे
माझिया संतांचा मेळा

खूपच सुंदर कविता.
>>>>>>>>>>त्याच्या श्वासी रुणुझुण
जपमाळ नारायण
>>>>>>> वाह!