घडते असेही काही

Submitted by _तृप्ती_ on 10 October, 2019 - 06:27

कधी, कुठे, कसे, घडते असेही काही...

माझे माझे म्हणता म्हणता
भरली ओंजळ, झाली रीती
नेशील सगळे वाहून तरी
नेशील कशी हातावरली नक्षी

न ओळखीचे शब्द, न कुठला गंध
तरीही, ओळखीचे वाटे भवताल
न हुंगताही, नवीन माती
बांधु पाही आपले बंध

शब्दांमधल्या अंतरामध्येच
लिहिली होती काही नाती
शब्दघन नव्हताच, तरीही
आभाळ उतरे दोन्ही उरी

कधी, कुठे, कसे घडते असेही काही

Group content visibility: 
Use group defaults