नवीन घराचे मराठी नाव

Submitted by Madhuri Parulekar on 15 July, 2018 - 07:01

मला घराला एक छान नाव सुचवा जे समुद्र आणि डोंगर ह्याच्या कॉम्बिनेशन मध्ये हवे

(मायबोलीकरांनी सुचवलेली घरांची / बंगल्यांची वास्तूची नावे इथे संकलीत आहे : वेमा)

Group content visibility: 
Use group defaults

कोपा कबाना

केप ऑफ गुड होप

अंजुना गोव्यातला बीच आहे. ज्याच्या मागे डोंगर आहेत.

सुनामी

सगर

सी मा. सी आणि माउंटन.

दर्यापहाड.
काला पहाड सारखं रहस्यमय वाटू शकेल.
किंवा सिंधुगिरी/ गिरिसिंधु. दर्याद्रि. समुद्राचल. अचलसागर
तरंगपर्वत.
सागरमाथा. (हे खरे तर माउंट एवरेस्ट चे नाव आहे)

डोंगर किनारा
समुद्र एक अडगळ
माउंटन बीच
डोंगराळ दर्या
समुद्री डोंगर

समुद्र आणि डोंगर यांच्या मधे शब्दश : = खाडीमुख
दर्या सागर बीच

कृपया पोस्टमन मंडळींना मराठी आणि इंग्लिश स्पेलिंग अपभ्रंश न होता सहज वाचता येईल असे नाव ठेवा ☺️☺️☺️

वर सुचवलेली नावं छानच आहेत.सागरमाथा विशेष आवडले.

दीपस्तंभ

दीपस्तंभ हा समुद्रात असलेल्या खडकावर असतो. मिनी टेकडीच म्हणा Wink . त्यामुळे डोंगर व समुद्र असा दोन्हीचा संबंध आहे.

टेमुद्र

संधी - टेकडी + समुद्र

नावाला तैमुर सारखे ग्लॅमर येईल Happy

जोक्स द अपार्टमेंट, हीरा यांनी मस्त नावे सुचवली आहेत.

एक कुतुहल
समुद्र आणि डोंगराच्यामध्ये नाव का हवेय?
घराचे लोकेशन तसे आहे का?

झाले का घराचे नाव फायनल?
नाव जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. शक्य असल्यास जरूर इथे सांगा.

आप्पा या नावाने घराचे नाव ठेवायचे आहे कृपया सुचवा नाही तर उत्तम आणि चंद्रकला असे आई वडिलांचे नाव आहे याचा वरून नाव सुचवा

आप्पा या नावाने घराचे नाव ठेवायचे आहे उत्तम आणि चंद्रकला असे आई वडिलांचे नाव आहे>>>>
..
उत्ताप्पा... ?

उत्ताप्पा... ? > Rofl

मी मतला लिहिणार होतो
नाहीतर
उद्रक

उंच

उत्तप्पा>> Lol

@विजय माळी, अजुन नावासाठी काही क्लु दिलेत तर बरं होईल..