नोकरी , प्रकल्प , इन्टर्व्ह्यु - २ लेख

Submitted by सामो on 3 October, 2019 - 14:27

डुक्कर आणि कोंबडी

प्रकल्प व्यवस्थापनामध्ये एक मजेशीर संकल्पना आहे. ती मला रोचक तशीच अचूक वाटते म्हणून येथे देत आहे तसेच काही लोकांना ही माहीती नवीन असण्याची शक्यता आहे म्हणूनदेखील येथे देत आहे.

कोणत्याही प्रकल्पामध्ये बरेच team members असतात. पैकी प्रत्येकाचा सहभाग तसेच commitment ची पातळी ही निरनिराळी असण्याची शक्यता असते. ही commitment पातळी २ प्रकारात मोडते - डुक्कर आणि कोंबडी. ते कसे हे खालील गोष्टीवरून लक्षात येईल.

एका शेतकर्‍याकडे, त्याच्या मळ्यावर एक डुक्कर व एक कोंबडी होती. या दोघांनाही आपल्या मालकबद्दल अतोनात प्रेम आणि आदर होता. दोघांच्याही मनात मालकासाठी काहीतरी चांगले करावे अशी इच्छा होती.
एकदा कोंबडी डुकराकडे आली व म्हणाली - "मला एक सुरेख कल्पना सुचली आहे. तू जर ती मान्य केलीस तर मालकाकरता आपण काहीतरी मस्त करू शकू." डुकराने पृच्छा केली "काय?" तेव्हा कोंबडी म्हणाली - "मालकाला नाश्त आवडतो पण बिचार्‍याकरता वेळ नसतो तेव्हा आपण दोघांनी मिळून उद्या त्याच्याकरता नाश्ता बनवायचा का?" डुकराला ही कल्पना रुचली. तेम्हणाले "जरूर. काय बनवू यात बरे?" कोंबडी म्हणाली - "हे बघ मी नाश्त्याकरता अंडी देऊ शकेन. तू ham देशील का? बघ बुवा आपण मस्त ham- अंड्यांचा नाश्ता मालकाला देऊ"
यावर विचार करून डुक्कर म्हणाले - "नाश्त्यामध्ये तुझा फक्त सहभाग आहे. माझे तर सर्वस्व पणाला लागते आहे."

प्रकल्प व्यवस्थापनामध्ये देखील काही लोक हे डुकरासारखे संपूर्ण committed असतात. प्रकल्प चालणे अथवा न चालणे हे त्यांच्या करता तारक अथवा मारक ठरते तर दुसर्‍या प्रकारचे म्हणजे कोंबडी प्रकारचे लोक हे committed नसतात तर त्यांचा फक्त प्रकल्पामध्ये सहभाग असतो.

स्त्रोत - http://en.wikipedia.org/wiki/The_Chicken_and_the_Pig
________________________________________
इन्टर्व्ह्यु पुराण

परवाचीच गोष्ट सांगते. एक इन्टर्व्ह्यु देण्याकरता पायपीट करत , जागा शोधत, घामाघूम अशी ठरलेल्या स्थळी पोचले. कितीही इन्टर्व्ह्यु आजतागायत दिले असले तरी प्रत्येक इन्टर्व्ह्युला अस्मादिकांना घाम हा फुटतोच. तरी बरं बेंचवर वगैरे नव्हते नाहीतर घाम फुटण्याबरोबर पोटही बिघडतं ; ) तर ते एक असोच.
.
मोठ्या, ऑफिसात आत गेले तर प्लश खुर्च्या अन ए सी ने स्वागत केले. काऊंटरवरती एक सुहास्यवदना होती. जिने माहीती घेऊन , आतमध्ये माझ्या येण्याची वर्दी दिली. आता वाट पहाण्याचा अवघड काळ समोर होता. परत एकदा स्वतःच्याच रेझ्युमे ची उजळणी करुन, जो की आता आठवेनासा झाला होता, मी कूल डाऊन होण्याचा प्रयत्न केला. पण जितका प्रयत्न अधिक, तितकी चलबिचल अधिकच वाढली.
.
शेवटी १५ मिनिटांनी एकदाचं आतून बोलावणं आलं. ही १५ मिनीटे मला युगांसारखी भासली होती तो भाग अलहिदा. दारावर टकटक करुन आत गेले तो ३ जणांचा पॅनल आसनस्थ होऊन माझ्याकडे पहाताना दिसला. जणू माझी प्रत्येक हालचाल अन अवघडलेपण टिपून त्यावरुन ते काही निष्कर्षच काढणार होते. पैकी एक जण बद्ध्कोष्ठ्पिडीत दिसत होता तर दुसरी बाई खुनशी दिसत होती व तीसरा नॉर्मल अन होयबा वाटत होता.
.
या मिस देखणे म्हणून त्यांनी मला आत बोलावून स्थानापन्न होण्याचा इशारा केला. औपचारीक ओळख झालयावरती बद्धकोष्ठ्पिडीताकडून नेहमीचा प्रश्न आला - हां तर थोडं तुमच्याबद्दल सांगा.

इतका रेझ्युमे समोर आहे तो काय पूजा करायला दिला का रे? वाचायला वेळ नाही मिळाला साल्या. पण उघडपणे पोपटासारखा एक्स्पिरीअन्स व स्पेशली त्यांना हव्या असलेल्या डोमेनचा एक्स्पिरीअन्स घडाघड बोलून दाखवला.
.
आता खुनशी मॅडमना जोर चढल्याचे दिसले - Where do you see yourself after 5 yrs?

काय ऑबसेशन असतं ५ आकड्याचं या लोकांना काय माहीत? फुगलेला बँक बॅलन्स आणि फुगलेले रिटायरमेन्ट पॅकेज मला दिसतय असे बाणेदार उत्तर द्यायचा मोह झाला किंवा मग तुझ्यासारखी खुर्ची उबवत असेन असे उत्तर द्यावे असे खूप वाटत होते पण वेळीच सावरुन म्हटलं - मी टेक्निकल लीड होऊ इच्छिते. यावर अपेक्षित प्रश्न आलाच की मॅनेजमेन्ट का नाही.

मी मॅनेजमेन्ट म्हटलं असतं तर टेक्निकल लीड का नाही हे विचारलच असतंं ना चिवड्यांनो? अरे या लहानपणीच्या शिव्या का आठवताहेत अचानक? असो Wink काहीतरी थातूर्मातूर कारण देऊन तो प्रश्नही टाळला.
.
पुढे सॉफ्टस्किलचे काही प्रश्न आले जसे- कंपनीचा फायदा होणार आहे पण थोडा अवैध किंव आनैतिक मार्ग स्वीकारावा लागतोय तर तुम्ही काय कराल?

कंपनीच्या फायद्याशी मला काय देणं घेणं ... च्यायला माझी कातडी बचावली की ऐष. मला पगार-बोनस-उन्नती मिळाल्याशी कारण.
पण उघडपणे - कंपनीच्या तत्कालीन तात्पुरत्या फायद्यासाठी मी कंपनीचे रेप्युटिशन लाँग टर्म धोक्यात घालणार नाही. यावर होयबा खूष झालेला दिसला तर खुनशी वार फुकट गेल्याने निराश झालेली वाटली.
.
होयबा गरीब वाटला. त्याने विचारले - "मिस जर तुमचा प्रकल्प वेळेआधी पूर्ण झाला तर रिकाम्या वेळेचा सदुपयोग तुम्ही कसा कराल?"

मला १००% खात्री आहे रे तू मग्गू असणार आणि मरुन मरुन प्रकल्प लवकरत लवकर पूर्ण करत असणार. पण मी तुझ्याइतकी सरळ नाय रे बाबा. उगा अपेक्षा फुगवु कशाला अन परत जर कामात चूका निघाल्या तर वरचा म्हणणार घिसाडघाई केलीत. पण थांब तुझ्या प्रकृतीला साजेसं उत्तर देते.
सर तसं झालं ना तर उत्तमच की. उरलेला वेळ सेल्फ-ग्रोथ्/अन्य प्रकल्पांना मदत आदि विधायक कार्यात रिसोर्सेस लावता येतील. : )
.
बरं एका प्रकल्पाला रिसोर्सेस ची गरज आहे कारण त्यांची डेड लाइन आलेली आहे व तुम्हालाही तुमचे रिसोर्सेस वापरुन स्वतःचा प्रकल्प पूर्ण करायचा आहे तेव्हा जर दुसर्‍या टीमलीडने तुमचे रिसोर्सेस उधार मागीतले तर काय कराल? ती रिक्वेस्ट कशी हँडल कराल? हा प्रश्न समजायला थोडा वेळ लागला. समजल्यावर मनात म्हटलं

फाट्यावर मारु ती रिक्वेस्ट
पण उघड तर असले भाव व्यक्त करता येत नाहीत म्हणून म्हटलं - माझ्याकडचे नवशिके रिसोर्स उधार देइन ज्यायोगे त्यांना अनुभव तर मिळेलच पण दुसर्‍या प्रकल्पाचे काम मार्गी लागेल अन रेनचेकच्या रुपाने, माझा वरचष्मा राहील.
.
पुढे बराच वेळ टेक्निकल डिस्कशन होऊन, नंतर वाटाघाटी होऊन इन्टर्व्ह्यु संपला.
.
आता फक्त वाट पहात आहे काय उत्तर येते याची. पण दर वेळेस इन्टर्व्ह्यु च्या स्ट्रेस मधून गेले की वाटते नको तो ताप परत परत. अन परत काही दिवसांनी परत इन्टर्व्ह्यु द्यायची उबळ येतेच. इन्टर्व्ह्यु-अ‍ॅडिक्ट झाले आहे दुसरं काय.
इति इन्टर्व्ह्यु पुराण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हाहा मस्त लिहिलंय खुसखुशीत..
मीही भरपूर interviews दिलेत.
कितीही प्रीपेर केल तरी interview म्हंटल की पोटात गोळा, छातीत धडधड असं सगळं व्हायचंच.
आता फक्त वाट पहात आहे काय उत्तर येते याची. >>तुम्हांला ऑल द बेस्ट
नक्की selection होणार.

पुढे सॉफ्टस्किलचे काही प्रश्न आले जसे- कंपनीचा फायदा होणार आहे पण थोडा अवैध किंव आनैतिक मार्ग स्वीकारावा लागतोय तर तुम्ही काय कराल?
>>> सामोजी मला सुद्धा असाच प्रश्न एकदा विचारला गेला होता. तेव्हा मी शेतकऱ्यांना लागणाऱ्या औषधी ( कीडनाशके, बुरशीनाशक, तणनाशके) विकणाऱ्या कंपनीचं मार्केटिंग करत होतो. एका प्रथितयश कंपनीचा मार्केटिंग हेड आणि मी एकाच ठिकाणी कॉटबेसीसवर शेजारी शेजारी रहात होतो. त्यानं मला त्याच्या कंपनीत जॉईन होण्यासाठी अॉफर दिली. तो म्हणाला मी तुझा इंटरव्ह्यू घेतो चल. असं म्हणून आम्ही एका चांगल्या हॉटेलमध्ये गेलो. त्यानं मला एकच प्रश्न विचारला, " समजा, एखाद्या शेतकऱ्याला पिकाच्या रोगावरील औषध माहिती नाही व त्याने तुला औषध विचारले. आणि आपली कंपनी ते औषध बनवत नाही. तर त्याला तू काय सल्ला देशील?"
मी मुळचा शेतकरी कुटुंबातील असल्यानं म्हणालो, " त्या शेतकऱ्याला इतर कंपनीचं योग्य औषध सुचविन."
तो म्हणाला "ठिक आहे, मला तुला माझ्या कंपनीत नोकरी देता येणार नाही."
मी म्हणालो " ओके, पण नोकरी न देण्याचं खरं कारण काय आहे, हे सांग."
तो काहीच बोलला नाही. नंतर नेहमी गाठ पडली की कारण तर सांग असं म्हणून मी त्याला पिडत असे. पण तो कारण सांगत नव्हता. न जाणो मला इतर ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देता येईल असे त्याला वाटत असावे.
मी कोणताही रोग कीड असला आणि आपल्याकडं योग्य उत्पादन नसलं तरीही कंपनीचं औषध शेतकऱ्याच्या गळ्यात मारावं हेच उत्तर त्याला अपेक्षित होते.

धन्यवाद रुचा
@वाटाणे - बापरे हा तर सरासर भ्रष्टाचार झाला. पण त्याला बेनेफिट ऑफ डाउट देता येइल. त्याच्या मनात काहीतरी वेगळे असू शकेल

वेगळं काय असणार? - हाउ कॅन एनीवन बी सो कॉन्फिडंट अबाऊट समवन एल्स स थॉट्स?
- त्यांना असं पहायचं असू शकेल की तुम्ही मुद्दा वळवून आपल्या कंपनीच्या उत्पादनावर कसा आणता?
- शेवटी मार्केटिंग म्हणजे टकल्याला कंगवा विकायचा असतो बरोबर वाटाणे? जर त्याच्या शेतामध्ये तुम्ही म्हणता "ती" कीड पडलेली नसेल, तरी कदाचित तुम्ही त्यला सजग करु शकला असता की बाबा रे अमचे औषध तरी ही लागेलकधी ना कधी लागेल.
-
-
अनेक पर्याय आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती.
जर एकच प्रश्न विचारला असेल तर त्याला त्या एकाच प्रश्नातून मार्केटिंग स्किल जोखायचे असतील. नीड नॉट बी - आपलेच औषध त्या कीडवर गळ्यात मारा.
_____________________
मला हे कळत नाही आपल्याला दुसर्‍याच्या मनातलं कळतं, त्याचा हेतू संपूर्ण कळतो असं का वाटतं?

तसाच एक प्रसंग मार्केटिंग वाल्यांची मानसिकता दाखविणारा.
एकदा आमचा रिजनल मॅनेजर आणि मी एकदा त्याच्या घरी गेलो होतो. काही बॅनर्स वगैरे जड सामान वर नेण्यासाठी मी ड्रायव्हर ला मदत केली. ड्रायव्हर खाली गेल्यावर साहेब मला म्हणाले, हे असं परत वागू नका. ड्रायव्हर चे कामच आहे हे. आपण आपल्या पोस्ट नुसार वागायचं नाही तर हे लोक गैरफायदा घेतात.
मी ठिक आहे म्हटले. मनात विचार आला ड्रायव्हर चं काम गाडी चालवणं आहे.