खडतर आयुष्य ! तीच-८

Submitted by रिना वाढई on 1 October, 2019 - 05:56

ती आणि अभय सोबतच परतले होते . तिला होस्टेल वर सोडून अभय हि निघून गेला . अभय आणि ती एकमेकांसोबत आनंदी होते. अभय आता लग्नाचे स्वप्न पाहू लागला होता . अभय साठी घरच्यांचे मुली बघणे चालू होते . तो तिला हे सांगत होता , कि एका वर्षात आपण लग्न करू ,पण ती अजून आपलं शिक्षण पूर्ण नाही झालं आणि अशातच घरी कस सांगायचं म्हणून अभय ला अजून काही दिवस थांबण्यासाठी सांगत होती .
सुरवातीला अभय ला तिचे म्हणणे पटत होते , म्हणून तो घरच्यांना काही ना काही कारणे देऊन मुली बघण्याचा कार्यक्रम थांबवला होता .
अभय चा भाऊ चांगल्या पदावर असल्यामुळे अभयसाठी मुलींचे स्थळ न सांगता येत होते .
काही दिवस टाळाटाळ झाली , पण अजून किती दिवस थांबायचे असे अभय ला वाटत होते .
तुला केव्हाही घरी सांगायचे तर आहेच ना मग आता लवकर सांगून टाक ना त्यांना , अभय वारंवार तिला म्हणायचा , पण तिच्या मनात भीती होती कि आपले प्रेम घरच्यांना कळेल काय ?
कारण अभय दुसऱ्या जातीचा होता आणि आजपर्यंत घराण्यात कधीही आंतरजातीय विवाह झालेला नव्हता .
आपण शिकून कितीही समोर गेलो तरी मुलीचं लग्न हे नेहमी आपल्या जातीमध्येच करतात हे खरं ... (आता साठी कदाचित लागू नाही होणार ).
तिची कधी हिम्मतच होत नव्हती घरी अभय बद्दल विचारायची.
काही दिवस अभय हि शांत होता , पण त्यानेही शेवटी आपले मन बदलले .
तुला नाही जमणार विचारायला तर राहू दे . तू का नाही घरी विचारात आहेस हे कळत आहे मला . तुला माझ्याशी कधी लग्न च करायचे नव्हते . तू माझ्यासोबत relationship मध्ये असून सुद्धा त्याला कधी विसरू शकली नाही . शेवटी तुझी इच्छाच पूर्ण होणार . तू त्याच्याशी कर लग्न . मला अजून घरच्यांना थांबवणे जमणार नाही . तो तिला एकदा फोन वर हे सगळं बोलत होता .
अभय नाही , असं काही नाही आहे मनात माझ्या . मी हिम्मत जुटवू नाही शकत आहे घरी सांगायची . तू आपल्या घरी सांगितलास काय ?
ती त्याला विचारत होती .
आता अभय ने सत्य काय ते बोलले होते .
हो . मी घरी सांगितले कि एका मुलीवर माझा प्रेम आहे आणि ती दुसऱ्या caste ची असली तरी मला तिच्याशीच लग्न करायचे आहे .
पण घरच्यांनी पूर्ण झटकून लावलं मला .
मग अभय तू मला घरी विचारात नाही म्हणून हे सगळं बोलून गेलास . किती रे तू , तू आधी तुझ्या घरच्यांना Convens कर, मग मला सांग . तुझ्या घरचे हो म्हणतील तर मी विचारणार घरी . ती अभय वर चिडूनच बोलली .
गोष्ट होती एक छोटीसी पण त्यांचा वादच खूप मोठा झाला होता त्यावेळेस .
तिला जाणवलं कि अभय ला आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन आपल्याशी लग्न करायचं नाही आहे आणि ती हि करू शकत नव्हती आपल्या घरच्यांचा विरोध पत्कारून .
दोघेही आता एकमेकांना दोष देत होते ,कि तुला नाही करायचं लग्न , तुला नाही करायचं लग्न .
आणि काहीच दिवसांत त्यांचे बोलणे बंद झाले होते . ती आतून खूप दुखावली होती , कारण आधीच तिने ज्याच्यावर एवढा प्रेम केला होता त्याने तिला स्वीकारलं नव्हतं ..
आणि अभय वर तीच प्रेम होत कि फक्त तो एक रिप्लेसमेंट होता , हे जरी अभय ला वाटत होत तरी ती त्याला विसरू शकत नव्हती .
आपण तर नाहीच म्हणालो होतो मग समोरून अभय ने च आपल्याला प्रेमात पाडलं आणि आता तो हि मला एकटीला सोडून जाणार ... हे विचार येऊनच ती अजून अस्वथ होत होती . कुठेतरी खूप मोठी चूक झाल्यासारखी वाटत होती तिला . अभय हा असा वागेल हा कधी विचारच केला नव्हता तिने .
म्हणजे त्याला नाही जमत आपल्याशी लग्न करायला तर ठीक आहे त्याने तसे स्वीकारून सांगायला पाहिजे पण या दिवसांत अभय तिच्याशी खोटं बोलू लागला होता आणि आपण असे वागण्याचे कारण तिलाच ठरवत होता .
त्याच्याशी ती आताही बोलते असे अभय ला वाटत होते आणि त्याच्या डोक्यात त्याच्या आणि तिच्याबद्दल संशयाचा किडा उत्पन्न झाला होता.
पूर्णतः जगणे सोडलेल्या व्यक्तीला ज्याने जीवन जगणे शिकवले , बेरंग झालेल्या आयुष्यात ज्याने सप्तरंग भरले ,आणि जगण्याची एक नवी उम्मीद घेऊन आता कुठे ती जगायला लागली होती तर त्यानेच असा घात केला होताn तिचा . अभय आणि तिच्यात चांगलाच वाद झाला होता त्याच्या संशयावरून , तिने रागाच्या भरात अभय ला म्हटले कि "यापुढे मला तुझ्याशी बोलायचं सोडून ,तुझा तोंड देखील बघायचं नाही आहे . " माझ्यासमोर येण्याची हिम्मत तू करू नकोस . कारण ज्याप्रमाणे तू मला बोललास ते शब्द माझ्या काळजाला टोचले आहे .
दोघांनीही एकमेकांना न बघण्याची शपथ घेतली आणि संपलं सगळं .
काही दिवसातच तिच्या घरी अभय च्या लग्नाची पत्रिका आली होती , त्यावेळी ती घरीच होती .
तेव्हा मात्र अभयने फोन केलाच तिला .
पत्रिका मिळाली का?
अभय ने अगदी सौम्य भाषेत विचारलं तिला .
हो मिळाली , पण पाठवण्याचा बळ कुठून आला रे तुला .
ती आपले भान हरपून बोलत होती अभय शी .
मला तर कळतच नाही जे आपल्यात होत ते प्रेम होत कि एक timepass !
अभय ला तिच्या timepass या शब्दाचा राग आला .
timepass तू केली असेल, मी मात्र निस्वार्थ प्रेम केलो होतो तुझ्यावर .
घरच्यांनी नाही म्हटलं त्याला मी काय करू .
आणि तुलाही लग्न करायचं नव्हतेच माझ्याशी .
हो अभय तुझी काही चुकी नाही .
घरच्यांनी नाही म्हटलं म्हणून तू मला काहीबाही बोलू लागला होतास .
नको तेवढा संशय घेत होतास , मी तुझ्याशी relationship मध्ये असताना एकदाही त्याच्याशी बोलली नव्हती , तरी तू माझ्यावर विश्वास नाही ठेवू शकलास .
मी आधीच एका धक्क्यातून सावरली नव्हती तोच तू माझा सहारा बनला होतास आणि आता अजून त्याच दरीत मला ढकलून दिलास .
तुम्ही सगळे मुलं असेच असता का रे ?
तुला आधीच सांगितली होती मी , मी त्याला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत नाही विसरू शकणार म्हणून . तेव्हा तुला काही खटकलं नव्हतं.
तिच्या तोंडातून शब्द सुद्धा अस्पष्ट निघत होते . ती घरी होती याची जाणीवही तिला नव्हती आणि ती फक्त रडत होती अभय शी बोलताना .
मी उद्या येणार आहे गावाकडे तेव्हा भेटतो तुला , अभय ला तिचे रडणे बघवत नव्हते . नको अभय आता समोर कधी येऊ नकोस तू माझ्या .
मी स्वतःला सावरू शकणार नाही .
तीने रडतच फोन कट केला .
तिला आता प्रेम या गोष्टीचीच चीड येऊ लागली होती . लोक प्रेम करतात म्हणे , हे असं प्रेम असते का ?सगळे मुलं सारखेच असतात , कोणाला कोणाच्या भावनांची कदर नसतेच या जगात . ती स्वतःच्याच विचारात हरवून गेली होती . तिच्यासाठी दिवस काय आणि रात्र काय . दोन्ही एकसारखेच भासत होते तिला . तरीही दिवसापेक्षा रात्रच जास्त आवडू लागली तिला , निदान या काळोखात आपले रडणे तरी कोणाला दिसणार नाही असे वाटायचे तिला . दुसऱ्या दिवशी सायंकाळी अभय आला . नेहमीप्रमाणे तिचे बाबा त्याला आत बोलावले , ती आपल्या खोलीमध्ये होती ,
बाबानी तिला अभय आला ये म्हणून बोलावून घेतलं .
ती बाहेर येऊन त्याच्यासोबत बसली . अभय तिच्या बाबांशी बोलत होता पण त्याचे डोळे फक्त तिलाच बघत होते . तिचे रडून लाल झालेले डोळे त्याच्या नजरेतून सुटले नव्हतेच . तिला त्याच्यासमोर बसने अवघड झाले होते , ती काहीतरी काम आहे म्हणून उठून आत निघून गेली .
अभय सुद्धा जास्त वेळ न थांबता गेला आणि जातानाच तिला एक message टाकला .
सॉरी !!!
हे सॉरी तू disserve नाही करत अभय ,तिने त्याला रिप्लाय दिला .
दोन तीन महिन्यानंतर अभयच लग्न होणार होत .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users