कातरवेळ..

Submitted by मन्या ऽ on 27 September, 2019 - 23:27

कातरवेळ..

अंबरात नाना रंगाची
उधळण होते तेव्हा
अंतरी अनामिक अशी
चाहुल लागते

क्षणाक्षणाला मन
हिंदोळ्यापरी झुलते
तुझ्या आठवांनी
डोळा आसवांची गर्दी होते

रोज कातरवेळी
मना याद तुझी येते
तुझ्या आठवणींत
मन असे विरु लागते

मन माझे वेडे
तुझ्या स्वप्नी रंगते
तु दुर असला तरी
तुजपाशीच विसावते

(Dipti Bhagat)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजयदा,It means alot to me.. Happy Happy

श्रद्धा, यतीन प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! Happy

छान .

बोकलत,
डॉ.काका प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! Happy