पर्यायस्वातंत्र्य

Submitted by सामो on 23 September, 2019 - 11:49

द सब्बाथ ऑफ म्युचुअल रिस्पेक्ट - https://idealisticrebel.com/2014/12/04/the-sabbath-of-mutual-respect/

अमेरीकन समाज कितीही प्रगत वाटत असला, तरीही काही लोकांचे विचार हे प्रतिगामी आहेत हे देखील सत्य आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. विशेषतः विस्कॉन्सिन मध्ये 'रस्ट बेल्ट' भागातील एका खेड्यात रहाताना हे प्रतिगामी विचार अधिकच ठळकपणे लक्षात येत असत. उदा - गर्भपात करण्यास प्रतिबंध' असावा अशी एक विचारधारा मुख्यत्वे मला आढळली ती याच भागात. बसने जाता येता पोस्टर्स दिसत ज्याव अतिशय गोंडस , हसरं मूल/ कॅलेंडर बेबी चे चित्र असे व खाली लिहीलेले असे " तुम्हाला माहीत आहे काय माझ्या हृदयाचे ठोके कन्सेप्शनपासून, ३ र्‍या आठवड्या पासून चालू झाले." किंवा असेच अर्भकाचे गोड चित्र व खाली शीर्षक - " माझ्या कन्सेप्शनपासून, ५ व्या आठवड्यात मला स्मित करता येऊ लागले" - या आहेत अँटायअ‍ॅबॉर्शन संदेश देणार्‍या जाहीराती. एकदा बसमध्ये ४-५ टिनेजर मुलींचा एका मध्यमवयीन अगदी अशक्त स्त्रीशी मोठमोठ्याने वाद चाललेला ऐकला. इतक्या आवेशात त्या मुली तो वाद घालत होत्या की माझे लक्ष वेधल्याविना राहीले नाही. मुलींचा मुद्दा होता - 'गर्भपात हा समर्थनिय नाही. ते पाप आहे. एका लहान अर्भकाचा खून आहे.' ती स्त्री परोपरीने त्यांना सांगत होती की 'काही परिस्थितींत गर्भपात करणे टाळता येत नाही." शेवटी शेवटी तर त्या स्त्रीवर इतका शाब्दिक हल्ला होउ लागला - "मग तू केला आहेस का गर्भपात?" वगैरे. ती स्त्री उतरल्यावरती तो वाद थांबला. अमेरीकेत क्वचित प्रसंगी कुमारी मातादेखील पाहीलेल्या आहेत. ती आई स्वतःच एक लहान मुलगी असते आणि तिच्या कडेवर तिचे टॉडलर मूल दिसते असे दॄष्य पाहीलेले आहे.
.
खरे पहाता, स्त्रीला तिच्या शरीरावरती हक्क असलाच पाहीजे. 'मूल ठेवायचे की नाही' हा आयुष्यातील एक सर्वात मोठा निर्णय तिचा तिला घेता आलाच पाहीजे. सुदैवाने असे पुरोगामी किंवा समजूतदार विचार करणारेही लोक आहेत. या लोकांची विचारधारा ही 'प्रो चॉइस' म्हणजे 'पर्याय स्वातंत्र्य' म्हणुन ओळखली जाते. तर "पर्याय स्वातंत्र्य" या विषयावर वाचलेली माझी ही पहीली कविता जिच्याबद्दल मी काही मांडत आहे. इतक्या गंभीर विषयावर काव्यात्म टिप्पणी करणारी "द सब्बाथ ऑफ म्युच्युअल रिस्पेक्ट" ही मार्ज पियर्सी या कवयित्रीची कविता. "द मून इज ऑलवेज फिमेल" या पुस्तकातील बर्‍याच कविता आवडल्या. गर्भपाताचे समर्थन करणारी ही जास्त रोखठोक असल्याने समजली. मार्ज पियर्सी यांचे विचार स्त्रीमुक्तीवादी आहेत असे त्यांच्या बर्‍याच कवितांतून जाणवले. प्रसिद्ध कविंच्या , लेखकांच्या मतांनी, शब्दांनी समाज घडू शकतो. लोक त्यांचे साहीत्य वाचून विचार करतात. प्रसिद्धी हे समाजसेवेकरता उत्तम माध्यम बनू शकते.
.
"द सब्बाथ ऑफ म्युच्युअल रिस्पेक्ट" या कवितेची सुरुवातच पूर्वजांच्या पुण्यस्मरणाने होते.
In the natural year come two thanksgivings,
the harvest of summer and the harvest of fall,
two times when we eat and drink and remember our dead
under the golden basin of the moon of plenty.
थँक्स्-गिव्हींग हा सण सुगीच्या दिवसांत येतो. जेव्हा कणसे कापणीला आलेली असतात. दुकाना दुकानांमधून, कणसांचे घड विकायला येतात. बुजगावणी , तांबडे भोपळे यांची रेलचेल दिसून येते. काहीकाही धान्यांच्या ओंब्या टांगलेल्या व विकायला ठेवलेल्या असतात. तर हेमंतात दिसून येणार्‍या या सुगीच्या विपुलतेचे चित्रण पहील्या काही कडव्यात आढळते. कवयित्री पर्याय निवडीचे स्वातंत्र्य अगदी साध्या प्रसंगातून दाखविते. खाद्यपदार्थांची रेलचेल आहे व अनेक पौष्टिक पदार्थांतून आपण स्वतःला रुचणारे पदार्थ निवडतो. म्हणजे आपल्या शरीराला काय पौष्टिक असते ते आपण ठरवतो. हक्काने ठरवतो.
The blowing grasses nourish us, wheat
and corn and rye, millet and rice, oat
and barley and buckwheat, all the servicable
grasses of the pasture that the cow grazes,
the lamb, the horse, the goat; the grasses
that quicken into meat and cheese and milk,
the humble necessary mute vegetable bees,
the armies of the grasses waving their
golden banners of ripe seed.
विपुलताच आपल्याला निवडीचे पर्याय देते व आपण किती सहजतेने ते निवडतो. कवयित्री म्हणते, हॅबॉन्डिया ही समृद्धीची देवता. तिच्या कारकत्वाखाली जशी समृद्धी येते तसेच पर्यायनिवडीचे स्वातंत्र्यदेखील येते. पुढे कवयित्री हेच लहानसे स्वातंत्र्य विस्तारुन आयुष्यातील अतिमहत्त्वाचे व आयुष्याला कलाटणी देणारे निर्णय यांची तुलना करते, ते निर्णय सहजतेने घेण्याचे स्वातंत्र्य यावर टिप्पणी करते. उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला विवाहामधून मूल जन्माला घालावेसे वाटेल तर कोणा स्त्रीला तिच्या "लेस्बियन" जोडीदाराबरोबर, मूल दत्तक घ्यायला आवडेल, तर अन्य कोणा स्त्रीला एकटेपण आवडेल. आपण निवडलेल्या पर्यायाहून अन्य कोणी दुसरा पर्याय निवडला तर त्याचा मान राखण्याचे भान ही कविता देते, तसा मान राखावा असे आवाहन करते.
In another
life, dear sister, I too would bear six fat
children. In another life, my sister, I too
would love another woman and raise one child
together as if that pushed from both our wombs.
In another life, sister, I too would dwell
solitary and splendid as a lighthouse on the rocks
or be born to mate for life like the faithful goose.
Praise all our choices. Praise any woman
who chooses, and make safe her choice.
मूल हवे असताना होऊ न देणे जितके यातनामय आहे तितकेच नको असलेले मूल प्रसविणे व वाढविणे त्रासदायक आहे ही जाणीव कवितेत बोलून दाखविलेली आहे.
To bear children unwanted
is to be used like a public sewer.
To be sterilized unchosen is to have
your heart cut out.
अनेक देवता - हॅबॉन्डिया, आर्टेमिस, दिती, इनाना, शिन मू इतकेच काय आपल्या पणजा, खापरपणजा यांनी त्यांचे जीवन, आराम सर्व त्यागून नवीन वाटा चोखाळल्या, आपल्याकरता नवीन वाटा बनविल्या. त्यांनी खंबीरपणे आपल्याला सोपविलेला इतिहास, वारसहक्क, जाणीवा, नवे हक्क व कर्तव्ये यांचा परीपाक म्हणजे आयुष्यविषयक निर्णय सहजतेने घेता येणे. आणि ते स्वातंत्र्य ही आपण स्त्रियांची खरी समृद्धी अशा आशयाची ही कविता आहे.
Praise our choices, sisters, for each doorway
open to us was taken by squads of fighting
women who paid years of trouble and struggle,
who paid their wombs, their sleep, their lives
that we might walk through these gates upright.
Doorways are sacred to women for we
are the doorways of life and we must choose
what comes in and what goes out. Freedom
is our real abundance.
मला या कवितेत काय आवडले तर - स्त्रीस्वातंत्र्याबद्दलचे मार्जचे विचार, गर्भपाताबद्दलचा तिने घेतलेली भूमिका व आवाहन याची काव्यमय अभिव्यक्ती आवडली. या विषयावर कळलेली ही पहीलीच कविता.

Group content visibility: 
Use group defaults

भारतात विशेषतः हिंदू धर्मात पुनर्जन्म मानत असल्याने गर्भपात पुर्विच्या काळात पाप समजले जायचे. पण स्त्रीभ्रूणहत्या इतकी कॉमन झाली होती की कायदा करावा लागला. सुदाम मुंडे सारख्या डॉक्टरांनी पाडलेले गर्भ खाण्यासाठी कुत्री पाळली होती. गर्भपाताला विरोध सहसा आता राहिला नाही. भावना मागं पडून सोय, व्यवहार पाहिला जात आहे. रोमन कॅथॉलिक लोकांचा विरोध आहे असे ऐकून आहे.

तशा पोस्टर्ससारखाच एक विषय म्हणजे मांसाहार करु नका, डुकराचे, कोंबड्याचे चित्र टाकून हा अमुकतमुक. याला सुध्दा मुले बाळे आहेत. वगैरे वगैरे वर्णन करून भावनिक आवाहन करायचा प्रकार फेसबुकवर बऱ्याचदा पहायला मिळतो.

२०१७ मधली बातमी

• 1.6 crore abortions a year in India, 81% at home: Study
A total of 15.6 million (1.56 crore) abortions took place across India in 2015.

• 12.7 million (81%) abortions were medication abortions, 2.2 million (14%) were surgical, and 0.8 million (5%) were through other methods, probably unsafe.

• Abortions accounted for one-third of all pregnancies, and nearly half of pregnancies were unintended <- हे महत्वाचे वाटते. वर्षाला जवळपास ४.५ कोटी गर्भधारणा होतात, त्यापैकी २.२५ कोटी अनप्लॅन्ड असतात, आणि १.५६ कोटी गर्भपात होतात. म्हणजे भारतात दरवर्षी जवळपास ०.७५ कोटी मुलं जन्माला येतायत जी अनप्लॅन्ड होती. त्यापैकी किती अनवॉन्टेडदेखील होती कोणाला माहीत. माबोवरच एका लेखात वाचलं होतं की भारतात सध्या जवळपास ३.३ कोटी अनाथ मुलं आहेत जी रस्त्यावर राहतात.

• India’s abortion rate is 47 per 1,000 women of reproductive age.

• abortions are the third leading cause for maternal mortality in India.

छान लिहीलंय Happy

ॲमी>> पोस्ट्मधील आकडे चिन्ताजनक, ही परिस्थिती बदलायला हवी Happy

गर्भ पात म्हणजे हत्याच असे मला वाटतं .
निष्काळजी पना आणि आपल्या सोयीचं नाही म्हणून गर्भ हत्या करणे पटत नाही

> गर्भ पात म्हणजे हत्याच असे मला वाटतं .
निष्काळजी पना आणि आपल्या सोयीचं नाही म्हणून गर्भ हत्या करणे पटत नाही > असे वाटणार्यानी मग दरवर्षाला १.६ कोटी बायकांची अन्न वस्त्र निवारा औषधोपचार इ ची सोय करा आणि नंतर ती मुलं स्वतःच्या घरी नेऊन सांभाळा....
आताच वर्षाला जवळपास ३ कोटी नवीन लोकांची भर पडतेय भारताच्या लोकख्येत. त्याऐवजी ४.५ कोटी हवे आहेत का? तसं झालं तर काय होईल विचार करा....

ॲमी सहमत. अगदी plan करून मुलं जन्माला घातले तरी त्याला मोठं करताना आणि चांगला माणूस बनवताना आपण आजूबाजूच्या लोकांवर, समाजावर, निसर्गावर कितीतरी भार टाकत असतो. Unplanned मुल असेल तर बर्‍याचवेळा समाजावरचा भार वाढण्याची शक्यता असते. कारण आई-बाप तो भार स्वीकारण्यास सक्षम नसतात किंवा तयार नसतात. ते मुलं जर चांगला माणूस बनू शकले नाही तर मोठे होऊन समाजाच्या आणि निसर्गाच्या र्‍हासास कारणीभूत ठरू शकते.
गर्भाची हत्या करणं हे जर पाप वाटत असेल तर माणसाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निसर्गाचा होणारा र्‍हास हे सुद्धा पाप मानावं आणि मग कोणतं पाप करण जास्त बरं याचा विचार करावा.

लोकसंख्या वाढू नये हा उदात्त हेतू गर्भपात करण्या मागे खरेच असतो का?
गर्भ पात मुळे लोकसंख्या वाढीला आळा बसतो हा biproduct आहे .
गर्भ पताची कारणे.
मुल स्त्री जातीचे असणे आणि दुसरे कारण आहे
नकळत गर्भ धारणा होणे आणि चुकीच्या वेळी गर्भधारणा होणे ही आहेत .
लोकसंख्या वाढीला आळा बसावा म्हणून कोण्ही गर्भ पात करत नाही .
माझ्या पाहण्यात तरी असे उदाहरण नाही

गर्भपात करणाऱ्यांची जी काही कारण असतील ती असुदेत. आपल्याला काय करायचंय?

तुम्ही >गर्भ पात म्हणजे हत्याच असे मला वाटतं. निष्काळजी पना आणि आपल्या सोयीचं नाही म्हणून गर्भ हत्या करणे पटत नाही. > हे असे विचार लिहण्यामागे काय कारण होतं ते सांगा.

सर्व वाचकांचे आभार.
______________________
राजेश यांच्या विचारांचा विरोध. खंडनात्मक टिप्पणी - पाप असो वा पुण्य, स्त्रीला तिच्या शरीरावरती, आयुष्यावरती हक्क हा असलाच पाहीजे. आपण जातोय का तिचं मूल वाढवायला मग काय अधिकार आहे तिच्या वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा?

ज्या गोष्टीला फक्त स्त्री जबाबदार नसते पण होणाऱ्या परिणामाची शिक्षा एकटीने भोगणे हा न्याय नक्कीच नाही .
गर्भ पात मध्ये हा असा एकतर्भी न्याय केला जातो.
वर वर जरी वाटत असलं की गर्भपात करण्याचा हक्क हा स्त्री च्या फायद्याचा आहे पण नीट विचार केला तर माहीत पडेल तो स्त्री पेक्षा पुरुषांच्या जास्त फायद्या चा आहे .
गर्भ म्हणजे जीवच त्या बाबतीत दुमत असायचे कारण नाही .
वारंवार गर्भपात केल्या मुळे स्त्री च्या शरीरावर विपरीत परिणाम होतो हे पण सत्य आहे .
कसा ते डॉक्टर लोक व्यवस्थित सांगू शकतील .
गर्भ राहूच नये म्हणून काळजी घेणे हाच सर्वात उत्तम उपाय आहे .बाकी स्त्री च्या शरीरावर तिचाच हक्क असावा ह्या मताचा विरूद्ध माझे मत नाही .
माझ्या नजरेत आलेलं निसर्गातील उदाहरण .
आंबा पाड लागण्याच्या अगोदर कच्चाच तोडला तर त्या झाडाची उत्तम दर्जाची फळं देण्याची क्षमता कमी होते .

>>वारंवार गर्भपात केल्या मुळे स्त्री च्या शरीरावर विपरीत परिणाम होतो हे पण सत्य आहे >> असे मला वाटतं कोणी करत नसेल.
केस १- एखादी कुमारी माता असेल, तर शरीरातील कॅल्सिअम, खनिजे, व्हायटॅमिन्स तिला जाण्याऐवजी बाळाला जातील, या तिची वाढ खुंटेलच. परत मूल सांभाळायला तिचा मित्र थोडीच येणारे
केस २ - एखाद्या जोडप्याला मूल नको आहे, चुकूनमाकून राहीले, तर त्यांना पर्यायस्वातंत्र्य हवेच की. निजबाबदारीगर्भाच्या पालन-पोषणाची जबाबदारी स्त्रीकडे दिलेली आहे - हे मान्य आहे. त्यामुळे सकृतदर्शनी वाटते की स्त्री एकटीच त्रास भोगते आहे पण खरे पाहता, पित्यालाही मानसिक क्लेष होतातच. आनि ते क्लेष सहन करुनही काहीजण गर्भपाताचा निर्णय घेतात, तेव्हा त्यात काहीतरी तथ्य असेलच की.
केस ३ - लग्नापूर्वी सज्ञान स्त्रीला (कुमारी माता नव्हे) गर्भ राहीला, तर तिला हक्क नको, निर्णयाचा? का तिने 'सिंगल पेरेंटीग' झेपत नसतानाही मूल वाढवायचे?
केस ४ - गर्भातच काही डिफॉर्मिटी आहे, जी पुढारलेल्या विज्ञानाने आता कळू शकते. आता त्या मूलाला जन्म देणे बरे की न देणे?
__________________________________________
गर्भपात कोणालाच नको असतो. पण तो नाइलाजाने पत्करावा लागणारा पर्याय आहे.

केस ३ लग्नापूर्वी सज्ञान स्त्री कुमारी माताच आहे ना. जिचे लग्न झाले नाही ती कुमारी असे म्हणतात ना सामो?

माझ्या माहितीतील एका पुरुषाने दोन मुलींनतर मुलगा व्हावा म्हणून सहा वेळा बायकोचा गर्भपात केला होता. शेवटी तिची तब्येत ढासळली तेव्हा आम्ही लोकांनी दोघांना झापले. बऱ्याचदा स्त्रिया मुलगा नाही म्हणून दु:खी असतात, चान्स घेतात व अजून मुलीची भर पडते.

हा खुप सेंसिटिव विषय आहे. बर्‍याच राज्यात आता कायदे झालेले आहेत. त्यानुसार एम्ब्र्यॉनिक हार्ट्बिट्स सुरु झाल्यानंतर (६-८+ वीक्स) गर्भपात करण्याला कायद्याने बंदि आहे. या कायद्याच्या अनुषंगाने किंवा मातेच्या शारीरिक्/मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातुन हार्टबीट सुरु झालेल्या फीटसची हत्या विझा-वि जन्मलेल्या बाळाची हत्या; यातला फरक कोणी समजाउन देइल काय?

माझ्या सारख्या व्यक्तीला तरी स्वतःच मूल मला झेपणार नाही दुसर्‍या कोणी वाढवणं सहन होणार नाही.
मेडिकल गुंतागुंत असताना तरीही ते मूल जन्माला घालून त्याला रोज कणाकणाने मरताना पाहणं देखिल जमणार नाही
एकाद्या पुरुषाचं मला नको असलेलं मूल वाढवणं पण जमणार नाही.
त्यामुळे गर्भपाताला सहमती, बाकी दुनिया, नैसर्गिक साधनं, लोकसंख्या याच्याशी ह्या बाबतीत देणं घेणं नाही.

अरे बापरे अवघड विषय आहे एकूणच!
अ‍ॅमीशी शत प्रतिशत सहमत. बाकी आमच्या रेचेलचं no uterus, no opinion हे मत पटतं.

ओव्हरॉल, नको असलेली गर्भधारणा टाळणे यावर जास्त प्रयत्न व्हावेत. प्रोचॉईस वाल्याना पिडत बसण्यात जितका वेळ आणि पैसा प्रो-लाईफ वाले खर्च करतात तोच त्यांनी 'how to prevent pregnancies in the first place' यावर खर्च करावा असं वाटतं.

समाजात स्वतःच्या इच्छेने निर्णय घेण्याचा अधिकार सर्व स्त्रियांना नाही .
काही स्त्रिया ज्या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत ,स्वतःच्या अन्याय चा प्रतिकार करण्याची ज्यांची क्षमता आहे .
ह्याचा अर्थ हा नाही की सर्व स्त्रिया सक्षम आहेत .
कायदे हे कमकुवत ,कमजोर लोकांचे संरक्षण करण्यासाठी असतात .
गर्भपात हा
मुला मध्ये व्यंग असेल,संतती नियमन करणारी साधने अयशस्वी ठरली,बलात्कार मधून मुल राहिले .
तर कायद्या नी गर्भपात करण्याची भारतात परवानगी आहे फक्त गर्भ किती दिवसाचा असावा ह्या विषयी नियम आहे .
पण कसलेच निर्बंध न घालता खुलेआम गर्भपात करण्याला परवानगी देण्याची मागणी करणे योग्य नाही .
काही नियमन करावच
लागते आणि ते नियमन कायदा करतो फक्त तो लोकांच्या हिताचं असावा .
कायदा करताना चांगल्या वाईट परिणामाचा विचार केला जातो एकच बाजू न बघता सर्व बाजू नी विचार करून कायदे केले जातात .
जेणे करून कमजोर व्यक्ती वर अन्याय होवू नये .
नियमन करण्याला विरोध का ते नाही समजल

बऱ्याचदा मुल ठेवायचं नसतं, आनंदासाठी शरीरसुख घेताना मुल राहून जाते. मग जीवाची हत्या योग्य नव्हे म्हणून गर्भपात करत नाही. मग अनेक नकुशे मुलं व नकुशा मुली आयुष्यभर अवहेलना झेलत जगत राहतात.

माझे मत - गर्भपाताचा हक्क त्या मातेला हवा.
माय लाईफ माय चॉईस .. शक्य तिथे मी याच मताचा असतो.

एक पडलेला प्रश्न - अपघाताने गर्भ राहिला. आता त्या बाईला गर्भपात करायचा आहे पण तिच्या जोडीदार पुरुषाला जर ते "आपले" मूल हवे असेल तर काय करावे? त्याच्या भावनांचा विचार करावा का?

अजून एक शंका - जर गर्भ जगवायचा की नाही हा हक्क योग्य असेल तर मुलगा की मुलगी या चॉईसनुसार गर्भपाताचा निर्णय घ्यायचा हक्क का नसावा?
जर एखाद्या जोडप्याला एकच मूल हवे आहे आणि तो मुलगाच किंवा ती मुलगीच हवी आहे. हवे ते होईपर्यंत ते पुन्हा पुन्हा गर्भपात करायला तयारही आहेत. तर जे काही निसर्ग पदरात टाकेल ते गोड मानून घ्यायची त्यांच्यावर सक्ती असावी की चॉईस असला पाहिजे? जर त्यांना चॉईस दिला नाही आणि त्यांना नावडीचे झाले तर ते त्या अपत्याला आनंदाने सांभाळतील का हा प्रश्न आहेच...

जर आपल्या आजूबाजूचा समाज कोणाला स्त्रियांसाठी सुरक्षित वाटत नसेल तर आपल्या पोटी मुलगी जन्माला येऊ नये असे त्यांना वाटल्यास गैर ते काय? अश्या परीस्थितीत त्यांना तो चॉईसचा हक्क देणे योग्य नाही का?

>>>>>> जर आपल्या आजूबाजूचा समाज कोणाला स्त्रियांसाठी सुरक्षित वाटत नसेल तर आपल्या पोटी मुलगी जन्माला येऊ नये असे त्यांना वाटल्यास गैर ते काय? अश्या परीस्थितीत त्यांना तो चॉईसचा हक्क देणे योग्य नाही का?>>>> खरच बिनतोड सवाल आहे.
_____________________ अवांतर सुरू__________________________
अशाच एका बिनतोड सवालांचे कंपायलेशन मी पाहीले होते. खरं तर त्या दुव्याची वाचनखूण साठवायला हवी होती.-
एकच प्रश्न आठवतो - एक भाऊ-बहीण आहेत त्यांना शारीरिक संबंधांचा हक्क असावा की नसावा? नसल्यास का असू नये (विशेषतः तेव्हा जेव्हा दोघेही राजी आहेत.) मग काहीजण म्हणतील जवळच्या संबंधांतून राहीलेल्या गर्भात विकृती पैदा होउ शकते. तर त्यावर त्या लेखकाने म्हटले होते - जर दोघे मूल नहोउ द्यायची जबाबदारी उचलत असतील तर?
.
काही प्रश्न सटपटवून टाकतात. आपल्या सोशल कंडिशनिंगलाच हात घालतत त्यात्ला तो प्रश्न होता.
__________________ अवांतर समाप्त__________________
ऋन्मेष यांच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर कोणीतरी द्या. वाचते आहे.

> एक पडलेला प्रश्न - अपघाताने गर्भ राहिला. आता त्या बाईला गर्भपात करायचा आहे पण तिच्या जोडीदार पुरुषाला जर ते "आपले" मूल हवे असेल तर काय करावे? त्याच्या भावनांचा विचार करावा का? > जोडीदार ऑफर देऊ शकतो कि मी (अन्न-वस्त्र-निवारा-औषधोपचार-सरोगसीचे पैसे) हे सगळं देतो. नंतर मुलदेखील एकट्याने सांभाळतो. तू फक्त बाळ जन्माला घाल. ऑफर मान्य करायची की नाही ते बाई ठरवेल.

> अजून एक शंका - जर गर्भ जगवायचा की नाही हा हक्क योग्य असेल तर मुलगा की मुलगी या चॉईसनुसार गर्भपाताचा निर्णय घ्यायचा हक्क का नसावा? > लिंगसापेक्ष गर्भपात कायदेशीर असावा.
सध्या भारतात जो MTP कायदा आहे तो १९७१ चा आहे. तेव्हा सोनोग्राफी मशीन भारतात नव्हत्या. त्यामुळे सध्याचं जे २० आठवडे लिमिट आहे त्याचा आणि स्त्रीगर्भपाताचा काही संबंध नाही. गर्भाचे लिंग १५ आठवड्यातच कळते.

पण इतके दिवस गर्भ ठेऊन परतपरत गर्भपात करण्याऐवजी पुरुषाचे स्पर्मच वेगवेगळे करता यावेत आणि फक्त मेल स्पर्म इंजेक्ट करून गर्भधारणा होऊ द्यावी. ही सगळी प्रोसेस सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशी असावी.

> जर एखाद्या जोडप्याला एकच मूल हवे आहे आणि तो मुलगाच किंवा ती मुलगीच हवी आहे. हवे ते होईपर्यंत ते पुन्हा पुन्हा गर्भपात करायला तयारही आहेत. तर जे काही निसर्ग पदरात टाकेल ते गोड मानून घ्यायची त्यांच्यावर सक्ती असावी की चॉईस असला पाहिजे? जर त्यांना चॉईस दिला नाही आणि त्यांना नावडीचे झाले तर ते त्या अपत्याला आनंदाने सांभाळतील का हा प्रश्न आहेच...
जर आपल्या आजूबाजूचा समाज कोणाला स्त्रियांसाठी सुरक्षित वाटत नसेल तर आपल्या पोटी मुलगी जन्माला येऊ नये असे त्यांना वाटल्यास गैर ते काय? अश्या परीस्थितीत त्यांना तो चॉईसचा हक्क देणे योग्य नाही का? > उत्तर वरप्रमाणे.

Pages