दशक कथा!

Submitted by मी मधुरा on 21 September, 2019 - 14:29

एक प्रकार मध्यंतरी ट्विटर वर फेमस झाला होता. #sixwordsstory नावाने. शशक मध्ये अनेकजण लिहिते झाले आणि उत्तमोत्तम कल्पना, कथाबिज केवळ शंभर शब्दात बसवण्याचं काम मस्त केलं.

आपण आता नविन प्रयत्न करू.
बघू जमतय का?

काही महत्त्वाचे म्हणजे, इतक्या कमी शब्दात बसवतानाही अर्थपुर्ण लिहावे लागते.
दहा शब्दांत कथा!

उदाहरणार्थ,

१. मी: 'हाय'. ती: 'बाय'. The end of short love story!

२. पिस्तूल प्रेताच्या उजव्या हाती होतं? पण तो तर डावखुरा होता!

३. त्याने तिकडे कळवल्याचे कळले. मी यांना कळवून त्याचा निकाल लावला.

टीप: पहिली कथा कुठलातरी सोशल मिडिया वरचा विनोद आठवल्याने त्यावर लिहिली आहे. जोक आठवला तर योगायोग समजू नये. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नगरात पांढऱ्या केसांची म्हातारी होती, ती बिचारी लहानपणीच गेली. >>>> Proud महाश्वेता, माझ्या भाच्याने तो लहान असतांना हे सांगुन माझी वाट लावली होती. Lol एक मिनीट तर मला समजलेच नाही की म्हातारी लहानपणीच कशी जाते Biggrin

मधुरा,अगं ते दशकच आहे.. >> +१०.
मोजता मोजता माझा आर्यभट्ट झाला...दशकाऐवजी हाती फक्त शून्य उरले... (- हे घे अजून एक दशक!)

'कुठे आहेस'
'कार चालवतीये'
'रेड कलरची कार आहे तीची'
धडाम्म!!

मस्त सुपु, भन्नाट!

एक विनोदी दशक....

मनाच्या कोंदणात..... प्रत्येक अणुत, रेणुत..... तू होतास. आता दुसरा आहे! Lol

I love too
अरे परत कशाला.
चुकुन तुला सेंड झाल.

>> I love too
अरे परत कशाला.
चुकुन तुला सेंड झाल.>> LOL
_______
>> मनाच्या कोंदणात..... प्रत्येक अणुत, रेणुत..... तू होतास. त्यामुळेच ढोली होते!>> हाहाहा मस्तच.
_____________
>> मेल्यावर चित्रगुप्त म्हणाला काय मग कसं वाटलं स्वर्गातून इकडे आल्यावर?>> जमलय

पण जाताना! Lol

ती त्याला मेसेज करत होती..पण तो मात्र झोपला होता..

Pages