दशक कथा!

Submitted by मी मधुरा on 21 September, 2019 - 14:29

एक प्रकार मध्यंतरी ट्विटर वर फेमस झाला होता. #sixwordsstory नावाने. शशक मध्ये अनेकजण लिहिते झाले आणि उत्तमोत्तम कल्पना, कथाबिज केवळ शंभर शब्दात बसवण्याचं काम मस्त केलं.

आपण आता नविन प्रयत्न करू.
बघू जमतय का?

काही महत्त्वाचे म्हणजे, इतक्या कमी शब्दात बसवतानाही अर्थपुर्ण लिहावे लागते.
दहा शब्दांत कथा!

उदाहरणार्थ,

१. मी: 'हाय'. ती: 'बाय'. The end of short love story!

२. पिस्तूल प्रेताच्या उजव्या हाती होतं? पण तो तर डावखुरा होता!

३. त्याने तिकडे कळवल्याचे कळले. मी यांना कळवून त्याचा निकाल लावला.

टीप: पहिली कथा कुठलातरी सोशल मिडिया वरचा विनोद आठवल्याने त्यावर लिहिली आहे. जोक आठवला तर योगायोग समजू नये. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मधुरा!

मी एक लिहिते.

कौरवांचा शेवटचा सैनिक तक्षक बोरात अळी बनून परीक्षितला चावायला निघाला!!!!

अजून एक जगद्विख्यात!

एक नगरात पांढऱ्या केसांची म्हातारी होती, ती बिचारी लहानपणीच गेली. Biggrin

मस्त धागा!

पकडता पकडता शेवटची बस सुटली...
...अन माझी मैना गावाकडेच राहिली...

मी त्याला मारलं.....
...कारण सगळ्यात आवडत्या माणसाचं बलिदान सात्विक असतं.

वरील दोन्ही कथा, सेक्रेड गेम्स इफेक्ट!!!

मस्त श्वेता, अज्ञातवासी, अक्कु!
अमेझिंग ट्विस्टस!!

अजून एक!

यंदा आरशातसुद्धा माझे प्रतिबिंब दिसत नाही. अपघातस्थळी जाऊन शोधावे का?

अक्कु, मस्त!
रागिणी Lol

यतिन, मन्या, सिमंतिनी छान प्रयत्न आहे. शब्द मोजून दहा घेतले तर उत्तम दशक बनतील. Happy

मी होतो, मी आहे, मी असेन - इति श्री कृष्ण उवाच!

Pages