मुलीसाठी नावं सुचवा..!!

Submitted by PankajSaner on 20 September, 2019 - 07:14

मायबोलीकर नमस्कार..!

अनंत चतुर्दशी ला आमच्या घरी लक्ष्मी च्या रूपाने कन्या रत्नाचा जन्म झाला..!

कृपया सगळ्यांनी बाळासाठी दोन अथवा चार अक्षरी नावं सुचवा..!!
(गणपतीशी निगडीत असतील तर उत्तम)
उदा. रिद्धी, सिद्धी, पारिजात इ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन
पण जरा सर्च माराल तर बरेच धागे सापडतील आणि भरपूर करमणूक आणि अर्थातच मदतही होईल

अभिनंदन!!

विद्या, कीर्ति, विभावरी, देवसेना, अनाहता, मनोरक्षा, कनकाभा - देवी सहस्रनामातील ही नावे आहेत Happy
मला स्वतःला विभावरी व अस्मि, रिया, वृंदा ही नावे खूप आवडतात. वृंदा ला एक नाद आहे. विभा ला ऑलमोस्ट स्वतः ची झळाळी (आभा) आहे Happy
रिया ला नाद आहे असे मला वाटते.

मनोरक्षा एक फार शुभ नाव वाटते.

अनन्तचतुर्दशी हा अनन्तव्रताचा दिवस असतो. गणपतीपेक्षा श्रीविष्णु-लक्ष्मीशी अधिक संबंधित. अनंतपद्मनाभ श्रीविष्णु हे शेषनागावर योगनिद्रेत पहुडले असल्याच्या स्थितीत त्यांची पूजा केली जाते. कलशरूपात लक्ष्मीचीही पूजा करतात. तेव्हा श्रीविष्णु-लक्ष्मीशी संबंधित नावही उचित ठरेल. रमा, सारा ही नावे सध्या लोकप्रिय आहेत. रमा ह्या नावाला पुन्हा उजाळा मिळाला आहे.