इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Beloved वाचून झालं गेल्या महिन्यात. अतिशय आवडलं. हे असलं काहीतरी वाचायची क्रेविंग बरेच दिवसांपासून होत होती बहुतेक. ते मिळालं. नतमस्तक झाले टोनी मॉरिसनपुढे

आता गुडरीड्सवरचे रिव्ह्यू- त्याखालच्या चर्चा, (त्या चर्चा बहुत रोचक वाटल्याने मग) स्पार्कनोट्स-लिटचार्टस-श्मुप वगैरेदेखील वाचतेय. क्लासिक समजून घेण्यासाठी हे वापरलंय का इतरकोणी? मी पहिल्यांदाच वापरतेय.

‘द न्यू यॉर्क टाइम्स’ अमेरिकेतील गुलामगिरीचा निर्घृण इतिहास जगापुढे आणू पाहत आहे... म्हणून गुलामगिरीबद्दलचे काही लेख वाचणार आहे आणि Margaret Garner बद्दलदेखील अधिक माहिती मिळवणार आहे. सगळाच हादरवणारा, लज्जास्पद, दुःखी करणारा इतिहास...

द बॉईज सिरीज बघितली, मस्त आहे, सिरीजचा विषयच वेगळा आहे, सुपर हिरोज सुद्धा वेड्यासारखे वागतात, त्याला प्रतिकार करणारी साधी माणसं आहे, या दोघांमधला संघर्ष आहे. सिरीज विटी, विनोदी, ट्विस्टी ड्रॅमॅटिक आहे, याचा दुसरा सीजन बघेन.

फ्लीबॅग सिरीजचा दुसरा सीजन बघितला. ही सिरीज फिल्म स्कूल मध्ये दाखवता येईल, कसदार लेखन कसं करावं, हे या सिरीज वरून शिकवता येईल. इट्स दॅट ग्रेट. सिरीज मधले जे मोनोलॉग आहेत ते दोनदा, तीनदा बघितले तरी मन भरत नाही. प्रत्येक सिन, मन लावून, अगदी प्राण ओतून तयार केला आहे असं वाटतं राहतं. पहिल्या सीजन पेक्षा दुसरा सीजन अधिक चांगला आहे. सो फार.. बेस्ट सिरीज ऑफ द इयर

१. फायनली, फायनली, द लव्हली वाइफ वाचून झालं, यातला पहिला चॅप्टर कमाल होता, येकदम खतरनाक, त्या एकाच चॅप्टर मध्ये मल्टीपल ट्विस्ट होते, त्यामुळे हे पुस्तकं वाचायला घेतलं.

२. या पुस्तकातील नायकाची बायको सीरिअल किलर आहे, मग नायक म्हणजे तिचा नवरा, तिला मारायला माणसं पुरवतो, कारण तेच ते प्रेम. अजून असं प्रेम आपल्याकडे होतं नाही.

३. हे पुस्तकं वाचताना स्टील हाऊस लेक या पुस्तकाची, अन त्या सिरीजची आठवण झाली कारण यात, नायिकेचा नवरा, सीरिअल किलर असतो, हे पुस्तकं खूप आवडलं होतं, माय सिस्टर द सीरिअल किलर, ते ही याचं प्रकारातलं असावं, असा कयास, पण मी वाचलं नाहीये. बिफोर शी न्यू हिम, मध्ये शेजारी सीरिअल किलर होता, थ्रिलर आणि मिस्ट्री जॉनर मध्ये जवळची व्यक्ती सीरिअल किलर असणं हा एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे, या ट्रेंडची खूप पुस्तकं पुढे येतील.

४. माय लव्हली वाईफचं कथानक विचित्र आहे, सरळ सोपं असं काही होतं नाही, त्यामुळे पुढे काय होणार ते कळत नाही, मग काहीही होतं, मागच्या पानावर हसणारी व्यक्ती आहे, तिचा पुढच्याच पानावर खून होतो. यात खुनांचं वर्णन ए, भयंकर ए, पण मला वाचवलं नाही. एकंदरीत खूप खून होतात, पुस्तकं फार खुनी आहे.

५. यात एक मोठा चांगला ट्विस्ट आहे, आधी ओळखता आला नाही, पण तो ट्विस्ट ऐंशी टक्के पुस्तकं वाचून झाल्यावर येतो, मग कथानक वेगवान होतं, पण पुस्तकाचा शेवट आनंदी आहे.

६. ज्यांना खून, सीरिअल किलर वाचायला आवडतात, त्यांना आवडेल, मध्यंतरी कथानक संथ होतं, यात विनोदाचा फायबर नसल्यामुळे पचायला अजून जड जातं. यावर सीरिज येणार नाही, कारण एकंदरीत विषय फार भयानक आहे.

गेल्या आठवड्यात मार्गारेट ऍटवूडचे The Testaments (The Handmaid's Tale #2) आणि स्टिफन किंगचे The Institute बाजारात आले आणि अर्थातच वाचकांच्या त्यावर उड्या पडल्यात.
रूथ वेअरचे The Turn of the Key देखील बरेचजण वाचताना दिसताहेत.

Lolita हे ज्या खऱ्या गुन्हयावर बेतलेले होते त्यावरच आधारित Rust & Stardust हे नाव कळाले, वाचायचा विचार आहे.

बाकी Beloved संबंधीत माहिती शोधताना The Fugitive Slave Margaret Garner and Tragedy on the Ohio हा एक अतिशय चांगला लेख सापडला. मस्ट रीड.

50 SHADES AND MORE: 11 PUBLISHED FAN FICTION BOOKS
City of Bones फॅनफिक आहे माहित नव्हतं, आणि अबब Twilight चे इतकेसारे फॅनफिक होते जे पुस्तकं म्हणून प्रकाशित झाले :-O. यापैकी About मालिका डाऊनलोड केली आहे.

आणि चैतन्य तुझा आवडता Blake Crouch (Wayward Pines series, Dark Matter, Recursion) आणि पाचजण Andy Weir (The Martian), N.K. Jemisin (The Fifth Season), Veronica Roth (Divergent ), Paul Tremblay (A Head Full of Ghosts ), Amor Towles (A Gentleman in Moscow) यांच्या प्रत्येकी एक लघुकथाचे Forward नावाचे पुस्तक आले आहे.

बाकी मी Codename Villanelle हे छोटेसे पुस्तक वाचले, Killing Eve ही मालिका यावरून बनवली आहे.

१. धन्यवाद ॲमी, या फॉरवर्ड पुस्तकाबद्दल काहीच माहित नव्हतं.
बरं ब्लेक क्रोच यांचं, रिकर्जन पुस्तकं अर्ध्यावर वाचून सोडलं कारण कथानक खूप अवघड आहे, कळतच नव्हतं. कथानकाची संकल्पना खूप छान आहे, आपल्या मेमरीज/ स्मृती ह्या खऱ्या नसून खोट्या आहेत, मग आपलं खऱ्या स्मृती काय असाव्यात? मग खऱ्या स्मृती जर वेदनादायक असतील तर त्या बदलाव्यात का? भूतकाळ जर राहता आलं तर नवीन स्मृती तयार करता येतील का? असं काहीसं कथानक आहे, मांडणी छान होती, ट्विस्ट मस्त होते, पण काही गोष्टी अजिबातच कळत नव्हत्या, म्हणून त्या दोनदा, तीनदा वाचायचा प्रयत्न केला, पण समजल्याच नाहीत, पण ज्यांना साय फाय अवघड कथा आवडतात, त्यांना वाचायला आवडेल.

२. टर्न ऑफ द की वर वाचू का नको म्हणून फार रिसर्च केला, अजून रिसर्च चालूच आहे.

३. किलिंग इव्ह मला बघायची होती, एमी नॉमिनेशन पण मिळालं आहे, पण सिरीज हॉटस्टार वर आहे, कोडनेम व्हिलनेल पुस्तकं कसं आहे?

> सुपर हिरोज सुद्धा वेड्यासारखे वागतात, त्याला प्रतिकार करणारी साधी माणसं आहे, या दोघांमधला संघर्ष आहे. > चांगला वाटतोय विषय पण सुपरहिरोजमधे फार रुची नसल्याने बघेन असे वाटत नाही.

फ्लीबॅग बघायच्या यादीत आहेच.

स्टील हाऊस लेक, माय सिस्टर द सीरिअल किलर नावं ऐकली आहेत पण अजून पुस्तक वाचली नाहीत. Before She Knew Him ठिकठिकच होतं. My Lovely Wife एक चॅप्टर वाचून बाजूला ठेऊन दिलेलं.

रूथ वेअरची पहिली दोन पुस्तकं मी वाचली आहेत In a Dark Dark Wood आणि Woman in Cabin 10. मला ठीकच वाटलेली. पण ती फार पॉप्युलर आहे (खासकरून बायकांमधे).

Codename Villanelle पुस्तक ठिकठिक आहे. ऍक्चुली ही पुस्तकमाळ आहे. Killing Eve दोन्ही सिझन माझ्याकडे आहेत, ते मी बघणार Proud तिसरा सिझन बनतोय.

स्टिफन किंगचे The Institute कोणी वाचलं तर प्लीज इथे सांगाल का कसं आहे ते? एकूण storyline पाहता त्याच्याच Firestarter सारखं काहीतरी वाटतंय.

मेड इन हेवन बघून झालं, टोटा सिरीज ए, असलं बेधडक लिहलंय, दाखवलंय. तजेलदार वाटलं. भरपूर पात्रं हेत, ट्विस्ट ऐत, सिरीज संपल्यावर मनाची काही कवाडं उघडली गेली, तरी आत कुठेतरी एम्प्टी वाटलं. प्रत्येक एपिसोडवर लिहिण्यासारखं बरंच काही आहे, सिरीज क्लासिज्मवर आहे, गली बॉय सुद्धा यावरच होता.

शेक्सी सीन्स तुफान आहेत, असले सीन्स अंगावर आले. मधूनच कधीही येतात, पण अभिनंदन करावंसं वाटतं की, यात शिव्या नाहीयेत, कूल शिव्या ऐकून, बघून कंटाळा आला होता, यात नाहीयेत.

डिटेलिंग खूप आवडलं, प्रत्येक सीन किंवा सवांद सुद्धा, विचार करून लिहिला गेला असावा असं वाटतं.दुसरा सीजन लगेच यायला पाहिजे. आय नीड इट. मस्ट वॉच.

मेड इन हेव्हन >>> मिर्झापूर, पवित्र खेळ

सिरीज क्लासिज्मवर आहे, गली बॉय सुद्धा यावरच होता.

क्लासिजमपेक्षा वेडिंग इंडस्ट्रिवर आहे असं मला वाटलं. बँड बाजा बारात मुव्हीची अनेकदा आठवण आली.

शेक्सी सीन्स तुफान आहेत, असले सीन्स अंगावर आले. मधूनच कधीही येतात -

नायिकेच्या गे पार्टनरचे गे सेक्स सीन्स इतके का दाखवले आहेत? मी ते तत्परतेने फॉरवर्ड करत गेले पण अशा सीन्ससाठी मार्केट आहे का प्रेक्षकांचं? की झोया स्वतः LGBT आहे म्हणून हे सर्व प्रमोट करत आहे? आय मिन ओके व्ही गेट इट झोया, व्ही रिस्पेक्ट ऑल चॉईसेस पण आवरा तो प्रकार दाखवणं आता.

एनीवेज मला ती नायिका दीपिका वगैरे पेक्षा हजारपट चांगली अभिनेत्रि वाटली.

नाही This is Us नाही बघितली. रनिंग आहे ना? मग पूर्ण संपल्यावर बिन्ज करेन.

हो रनिंग आहेच पण असं काही सस्पेन्स रहस्य आहे असं नाही त्यामुळे बघू शकतेस तू आधीही.
अर्थात यात बाळंतपण प्रेग्नन्सी बाळं पालकत्व यावर बराच फोकस आहे सो तो तुला नावडता ट्रिगर असेल तर आवडणार नाहीच.

पण रेस रिलेशनबद्दल इंटरेस्ट वाटेल. बेसिक गोष्ट अशी आहे की-

एका जोडप्याला तिळं होणार असतं. पण एक मुलगा मृत जन्माला येतो. दुसरा मुलगा व मुलगी ठीक असतात. त्याच हॉस्पिटलमध्ये त्याच दिवशी
जन्मलेलं एक अनाथ काळं बाळ पण आलेलं असतं. त्याच्या आईबापाचा पत्ता नसतो. हे जोडपं त्या मुलाला आपलं तिसरं मूल म्हणून घरी आणतात. पुढे या कुटुंबाची स्टोरी आहे. एक आई बाप जुळे बहीण भाऊ आणि त्यांचा तिळा कृष्णवर्णिय भाऊ.

१. हो.. मेड इन लव्ह मधली, नायिका, शोभिता खूप छान आहेत, तिची जॉ लाईन सुरेख आहे, असं माझा मित्र म्हणाला, बाकी मावझा. ती नेटफ्लिक्सच्या बँड ऑफ बार्ड्स पण आहे.

२. प्राईमवर अनडन नावाची सिरीज बघतोय, डोक्यावरून जातेय, बहुतेक साय फाय आहे, पण गुंतागुंतीची आहे, तीन चार एपिसोड बघून झालेत, पण या सिरीजचं एनिमेशन बघायला भारी वाटतेय, पूर्ण सिरीज बघेनच

मी शक्यतो चालू असलेल्या मालिका बघत नाही. पूर्ण संपल्या की मगच बिन्ज करत असते.

आयेमडीबीवर याचा जॉन्र Comedy,
Drama, Romance असा दिसतोय. त्यामुळे जेव्हा बघायला चालू करेन तेव्हा त्यादृष्टीनेच बघेन.

A heartwarming and emotional story about a unique set of triplets, their struggles, and their wonderful parents. चांगली वाटतेय कथा.

Masters of Sex बघतं आहे का कोणी? सुरुवातीचे काही भाग नुसतं सेक्स आणि सेक्स पाहून आपण ही मालिका कंतीन्यू करावी का हे ठरत नव्हतं. पण एका मित्राने सांगितलं की नेटाने बघ, पुढे बरीच उपकथानक आहेत ज्यामध्ये मानवी मनाचे वेगवेगळे पदर उलगडत जातात. मग सिझन 1 संपता संपता मला सिरीज आवडून गेली. 1950 की 53 मधलं कथानक आहे. तेव्हाची अमेरिका पहाताना 50 -60 वर्षात संस्कृती, तंत्रज्ञानात केवढा प्रचंड बदल झाला आहे ते पाहून आश्चर्य वाटतं. होमोज बद्दल अमेरिकेत केवढं अज्ञान होतं, लेडी डॉक्टरला मिळणारी दुययम वागणूक, फर्टिलीटी ट्रिटमेंट आणि त्या संदर्भातले इश्युज हे आणि बरच काही छान हाताळलं आहे. काही सीन्स ग्रोस आहेत, पण व्यक्तींमधले परस्पर संबंध आणि भावभावना छान दाखवल्या आहेत. कथानक आणि प्रसंग चित्रीकरणाबद्दल माझ्या टिपिकल भारतीय तक्रारी आहेत, पण तरी बरेच विषय छान हाताळले आहेत.

आज सिझन 2 पहायला सुरुवात केली.

A heartwarming and emotional story about a unique set of triplets, their struggles, and their wonderful parents. चांगली वाटतेय कथा.

हो छान आहे. (म्हणूनच तुझ्या मागे लागले आहे की बघ लवकर).
या मालिकेत दर्जेदार संगीत, कविता, गाणी यांची रेलचेल आहे, त्याबद्दल विचार मांडले आहेत. Mandy Moore स्वतः गायिका आहेच. तिचं moonshadow सॉंग भारी आहे. आपली ती डेझी जोन्स आणि आता धिस इज अस यामुळे मी जुने पॉप, कंट्री म्युझिक शोधून ऐकायला लागले आहे. (एरवी मराठी किंवा हिंदी गाणी मी जास्त प्रिफर करते.) धिस इज अस चा म्युझिक कंपोझर देशी आहे सिद्धार्थ म्हणून आणि त्याच्या बँडचं नाव गोल्डस्पॉट आहे. (ते भारतात पूर्वी ऑरेंज ड्रिंक मिळायचं गोल्डस्पॉट त्यावरून नाव ठेवलंय म्हणे.)

A heartwarming and emotional story about a unique set of triplets, their struggles, and their wonderful parents. चांगली वाटतेय कथा.>>+१
इथे वाचून मीही पहिला भाग पाहिला, चांगला वाटला.

12nd.PNGफ्लीबॅगने चार एमी अवॉर्ड्स जिंकले. त्यात बेस्ट कॉमेडी सिरीज हा अवॉर्ड पण मिळाला

कभी कभी लगता है अपुनिच भगवान है, असं काही नाहीये. मी भारी, मला कळतं किंवा फार तर एमी अवॉर्ड्स वाले हा धागा फॉलो करतात असं ही म्हणणार नाही. मुळात मला ना.. मोठेपणा आवडतच नाही. पण असा मोठे पण मिळाल्यावर अवघडल्यासारखं वाटतं, बाकी काही नाही

Rofl Rofl
फ्लिबॅगचा पहिला सिझन मिळत नाहीय मला त्यामुळे कधी बघेन माहीत नाही Sad

लिमिटेड सिरीज मुख्य अभिनेता Jharrel Jerome — When They See Us हा भारीय मनुष्य. Mr Mercedes मधे बघितलाय याला.

लिमिटेड सिरीज मुख्य अभिनेत्री Michelle Williams— Fosse/Verdon ही पण भारीय. Brokeback Mountain मधे फार आवडलेली.

लिमिटेड सिरीज सहअभिनेत्री Patricia Arquette — The Act याच्याबद्दल मागील पानावर कुठेतरी लिहलं होतं.

ड्रामा सिरीज मुख्य अभिनेत्री Jodie Comer — Killing Eve ही पण भारीय.

बाकी Chernobyl ला मालिका, दिग्दर्शन, लेखन सगळेच मिळण्याऐवजी When They See Us लादेखील काहीतरी मिळायला हवं होतं हेमावैम.

बाकी तू कोथरुडात रहात असशील तर वॉटरमार्क फिल्म क्लब जॉईन करायचाय का बघ. पहिले ४ सिनेमा फुकट आहेत.
===

सनव,
जेव्हा ड्रामा बघायची इच्छा होईल तेव्हा नक्की बघेन This is Us. सध्या Killing Eve मूड आहे Lol

> धिस इज अस चा म्युझिक कंपोझर देशी आहे सिद्धार्थ म्हणून आणि त्याच्या बँडचं नाव गोल्डस्पॉट आहे. (ते भारतात पूर्वी ऑरेंज ड्रिंक मिळायचं गोल्डस्पॉट त्यावरून नाव ठेवलंय म्हणे.) > सिद्धार्थ माहित आहे, म्हणजे आता परवाच कळाला, HIMYM मुळे If The Hudson Overflows by Goldspot
===

मी विकांताला Reservoir Dogs बघितला. ठीक वाटला, फार प्रभावीत नाही झाले (काटें फार पूर्वीच बघितल्यामुळे असेल कदाचित).
आणि Before Sunrise बापरे बोअर आहे Sad म्हणजे सुरवातीला बरा वाटला, काही डायलॉग पॉज करून, सबटायटल्स वाचत, त्यावर विचार करावा वगैरे होते. पण असं कोण बोलतं खऱ्या आयुष्यात eyeroll. शेवटची वीस मिनीटं तर प्रॉपर बोअर झाला...

१. अरे वा, मस्तच, वॉटरमार्क फिल्म क्लब चांगली संकल्पना आहे.

२. रिझरवायर डॉग्ज मस्त होता, कांटे नंतर माहित झाला, हिंदीतून बघितला होता कारण तेव्हा सीडी लायब्ररी मध्ये हिंदीतून होता, डीव्हीडी एक्सप्रेस नावाची सीडी लायब्ररी होती, आता आठवलं, किती वर्ष झाली ना, कसा वेळ जातो कळतंच नाही.

३. अरे हो, वन्स अपॉन टाईम इन हॉलीवूड बघितला, खूप अपेक्षा घेऊन गेलो होतो, बराच मोठा आहे, विनोदी आहे, कॅप्रिओ व पिट मुळे बघायला मजा आली, पण बाकी काही नाहीये, दुसरे कोणी अक्टर्स असते तर कंटाळवाणा झाला असता. या चित्रपटात कथानक नाहीये, फक्त पात्रं आहेत, सवांद आहेत, त्यांचं दैनंदिन जीवन, इच्छा आकांशा अँड ऑल, एवढा प्रभाव पडला नाही.

४. बिफोर सनराईज, बिफोर सनसेट, बिफोर मिडनाईट तिन्ही आवडले होते, मस्त होते, मला वाटायचं असं काहीतरी माझ्या बाबतीत होईल, पण अजून तरी झालं, मग त्याच दिगदर्शकाचा बॉयहूड खूप आवडला होता, त्याची ती शैली आहे, साधं सरळ, नेमकं दाखवण्याची. आय लाईक इट

ॲमी, रिझर्व्हायर डॉग बद्दल माझे पण सेम मत. तश्या धाटणीचं खुप पाहिलंय याआधी.

चांगला सायको थ्रिलर(हॉलिवूडचाच असे नाही कोरीअन वगैरे चालेल) सुचवा ना..

कोणी जर एक वर्षाचं हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन मला दिलं, तर त्यांना माझी नवीन स्वलिखित, अप्रकाशित रहस्यकथा पाठवेन.
दानशूर व्यक्ती हॉटस्टारचा आयडी अन पासवर्ड chaitanyaras@gmail.com या माझ्या आयडीवर पाठवू शकता.
धन्यवाद Happy

धिस इज अस फक्त पालकत्वाबद्दल नाहीए. पालकत्वाचेही अनेक कंगोरे आहेत.
व्हाइट कपलने काळ्या मुलाला वाढवताना त्यांच्या anxieties , पुढे तीनही मुलांपुढे येणारे पालकत्वातले प्रश्न
पण याशिवायही बरंच काही आहे. ते इथं सांगणं कदाचित स्पॉयलर ठरेल. Amy, तुम्हांला ज्यांच्याबद्दल हळवा कोपरा आहे, असेही मुद्दे आहेत.
फक्त त्या कपलच्या भूतकाळातही मालिका जाऊ लागली तेव्हा आता पुरे असं आधी वाटलं कारण माझं मन त्या तीन मुलांच्या वर्तमान आणि भविष्यात अधिक गु़तलं होतं.
पण भूतकाळातला तो प्रवासही रोचक आहे.
बहुतेक एपिसोड दोन काळांत चालतात.
त्यामुळे पहिल्या दोन एपिसोड्स्मध्ये मुलांच्या जन्माची कहाणी आहे आणि त्यांचे तिशीतले वाढदिवसही आहेत.
खरं तर हे मोठे तिघे, तीच तान्ही बाळं आहेत हे मला पहिल्या एक की दोन एपिसोडमध्ये लक्षात आलं नव्हतं.
आमेरिकन समाजजीवनाचे अनेक पदर या मालिकेत येतात.

Six feet under ही मालिकाही मी रेकमेंंड करीन. फक्त यात खूप सारी weird characters आहेत किंवा characters खूप weird वागतात. इतकं की त्यातलं एक गे कपल सर्वसामान्य वाटू लागतं.

धिस इज अस चा म्युझिक कंपोझर देशी आहे सिद्धार्थ म्हणून आणि त्याच्या बँडचं नाव गोल्डस्पॉट आहे. (ते भारतात पूर्वी ऑरेंज ड्रिंक मिळायचं गोल्डस्पॉट त्यावरून नाव ठेवलंय म्हणे.) > सिद्धार्थ माहित आहे, म्हणजे आता परवाच कळाला, HIMYM मुळे If The Hudson Overflows by Goldspot
===
ओह तुझ्या HIMYM मध्ये पण आहे का सिध्दार्थचं म्युझिक. सहीच! मला असं झालं की अरे या मालिकेचं म्युझिक इतकं भारतीय का साऊंड करतंय? भारतात आपल्या लोकांनी ही गाणी चोरली आणि मग मी ती गानावर ऐकली असं झालंय का? मग सिध्दार्थ खोसला आणि गोल्डस्पॉट ही अस्सल भारतीय नावं ऐकल्यावर जरा कोडं उलगडलं. अफाट आहे पण मालिकेचं म्युझिक. एपिसोड्स एकदम अजून भारी वाटतात त्यामुळे.

भरत, पोस्ट आवडली.

फक्त पालकत्वाबद्दलच आहे असंही नाही. प्रत्येकाची जर्नी बघायलाही आवडतंय. प्रत्येक व्यक्ती जशी आहे तशी का आहे हे त्याच्या/तिच्या बॅकस्टोरीमधून छान उलगडून सांगितलंय. फ्लॅशबॅक्स तर मला खूप आवडले कारण मुळात मला जुना काळ मालिकेत बघायला आवडतो. आणि या लोकांचं डिटेलिंग , निर्मितीमूल्य उच्च आहेत. तो तो काळ जबरी उभा केलाय, आपणही टाईम ट्रॅव्हल करतोय असं वाटतं.
कालच २००८ हॅलोविनमधला एक एपिसोड पाहिला तर रँडॉलच्या फ्रिजवर ओबामा- बायडेन वाला स्टिकर होता. किती बारिक सारिक गोष्टी असतात या.
यावेळी emmys नाही भेटलं पण धिस इज अस ला एकपण.

Six feet under ही मालिकाही मी रेकमेंंड करीन. फक्त यात खूप सारी weird characters आहेत किंवा characters खूप weird वागतात. इतकं की त्यातलं एक गे कपल सर्वसामान्य वाटू लागतं.>>+१

मनोज वाजपयी यांची फॅमिली मॅन सिरीज चांगली आहे, पाच सहा एपिसोड बघून झाले, कमाल आहे, पुढच्या वर्षी एमी अवॉर्ड नॉमिनेशन मिळेल असं मी म्हणत नाहीये, पण छान आहे, संकल्पना वेगळी, सादरीकरण छान आहे, सवांद मस्त, शिव्या आहेत, पण ठीके खपवून घेतल्या, ग्राफिक वाह्यात व्हायलंट अजून काही दाखवलं नाहीये. त्यामुळे अजून एक प्लस वन. शेक्सि सिन एक का दोन आहेत, वय झालंय त्यामुळे पटकन आता आठवत नाहीत,

दोन सिक्वेन्सच्या मध्ये वाईड अँगल लॉन्ग शॉट घेतलेत, ते फारच सुरेख आहेत, काश्मीर किंवा सीरियाचा जो भाग दाखवला आहे ते पॉज करून बघावेत इतके छान आहेत

सवांद मजेशीर आहेत, फॅमिली फ्रेंडली विनोद आहे, दुसऱ्या का तिसऱ्या एपिसोड मध्ये मस्त शेर आहेत, ते मी पाठ करणारं आहेत, असंच कुठेतरी शायनिंग मारायला उपयोगी पडतात.

लेखन खूप छान आहे, ट्विस्ट खूप चांगले आहेत. धर्म आणि आतंकवाद याबद्दल कथानक लिहिणं खरं तर खूप अवघड आहे, आतंकवाद कसा तयार होतो, खत पाणी कसं घालतात, हे विचार करून मांडलं आहे. ते एकसुरी होतं नाही, इथेच लेखकाचं यश आहे. दुसरं म्हणजे त्यांचा खात्मा करणारे इंटेलिजंट ब्युरोचे लोकं, त्यांचं सुद्धा दैनंदिन जीवन दाखवलं आहे. त्यात परत अँटी नॅशनल लोकं नेमके कसे ओळखणार? त्यांच्यासाठी शिक्षा काय असावी? हे अवघड प्रश्न यात मांडले आहेत.

चौथ्या का तिसऱ्या एपिसोड मध्ये वन शॉट लॉन्ग चेस ऍक्शन सिक्वेन्स आहे, मला वाटतं दहा पंधरा मिनिटे एवढा मोठा आहे, मी दोन वेळा बघितला, एवढा भारी जमून आला आहे

देशकार्य ठीक आहे, पण पोरांचा अभ्यास कोण घेणार? असं म्हणणारी यात बायको आहे, अशा प्रकारचं आधी बघायला मिळालं नाही, हे यात नावीन्य आहे.

सिरीज आवडली, थँकफुली सेक्स, गोअर नाहीये, आय वॉज हॅप्पी. सेर्क्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीजनच्या दसपट चांगली आहे. ही सिरीज खरं तर पुढे जाऊन मोठी होईल, मार्क माय वर्ड्स.

Pages