कुत्र्याच्या गमतीजमती

Submitted by रत्न on 17 April, 2019 - 05:26

माझ्या आजोळी मोत्या नावाचा कुत्रा होता. भटक्या लोकांकडून पिल्लू आणलेला. अतिशय इमानी कुत्रा. घरातल्यांसाठी अगदी मायाळू प्राणी तर बाहेरच्या लोकांसाठी तेवढाच डेन्जर. तो विशिष्ठ पद्धतीने भुंकू लागला तर घराकडे कोणी नवीन आले समजावे. एकदा तर त्याने चोरही पकडून दिले होते. आजोबांसोबत शेतावर वगेरे जायचा. धान्य टीपणार्या चिमण्या उडवायचा. आजोबा त्याला मुलासारखे जपत. त्याच्याशी गप्पा करत. कोणी आजारी पडले तर तो शेजारी बसून राही. आजोबांच्या शेवटच्या दिवसात त्यानेही खाणेपिणे सोडले होते. (तेव्हा तो दहा वर्षांचा होता) आजोबा निवर्तले, नंतर चारच दिवसात तो ही वारला.

लहान असताना त्याने गंमतच केली होती. झाले काय, तो चपला चावत असल्याने त्याला आजीने फटका दिला. तर घाबरुन कुंई करत तो कुठेतरी धावत निघून गेला. संध्याकाळपर्यंत शोधले, नंतर काळोख पडला पण तो कुठे दिसला नाही. दरम्यान आजोबांचे आजीला भरपूर ओरडून झालेले. सगळ्यांना वाटले हा दूर पळून गेला, परत यायचा नाही. रात्री नऊच्या सुमारास आजीला घरामागच्या रचलेल्या लाकडांमागे खुडबुड ऐकू आली. आजोबांना बोलावून ते विजेरी घेऊन पाहतात तर ते पिल्लू! त्यानंतर त्याला कोणीच मारले नाही. ओरडले की ही गोष्ट करु नये असे तो समजायचा Happy

तुमच्याकडे कुत्रा असेल, तर त्याच्या गमतीजमती, घटना, प्रसंग इथे लिहिता यावे यासाठी काढलेला धागा. त्यांच्या सवयी, training, घ्यावी लागणारी काळजी , vet appointments याबद्दल शंका इथे विचारल्या तरी चालेल

मायबोलीवर मला असा धागा सापडला नाही, असल्यास इथे सांगा
धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

परवा दत्ताच्या देवळाबाहेर कुत्रं भेटलं त्याला प्रेमाने बिस्कीट चा पुडा विकत घेऊन दिला.तर शहाणं 2 बिस्किटांना तोंड न लावता परत भुंकायला लागलं.मग मालक म्हणाला तो फक्त खव्याचे पेढे खातो.काय हे?डायबिटीस ओबेसिटी बीपी वगैरे प्रश्न येत नाहीत वाटतं भुभुज मध्ये.
अश्याच एका डोंगर पलीकडच्या कंपनीत गेले होते.नाश्ता एकदम भारी देतात.फुकट.फळं, पाव,चहा,कॉफी, इडली, मेदूवडा एकदम हॉटेल बुफे चा थाट.सिलेक्शन नाही झालं. पण जाम गहिवरून आलं.☺️☺️ इतका डोंगर रोज ओलांडून जायची मानसिक तयारी म्हणून बऱ्याच आधी प्रवासाला निघून आलेल्या गरीब बिचाऱ्या इंटरव्ह्यू कँडीडेट ना नाश्ता देत असतील.

मात्र फक्त घाबरवण्यासाठी एखादी छोटी छडी बरोबर बाळगावी लागते.>>>>> मग बरोबर! कशी मैत्री होईल भटके आणि लाडोबात? कारण भटक्यांना कैवारी नसतो ना! Light 1
काही कुत्रेमालक तर भटक्या कुत्र्याला दगड मारतानाही पाहिले आहे.

अनु, तुमच्या वरच्या प्रतिसादातील दुसऱ्या परिच्छेदाचा या धाग्याशी काय संबंध ते कळलं नाही. शशकसारखा काहीतरी गूढार्थ नक्की असणार.

असंबद्धच आहे.विषय डोंगराच्या पलीकडे असलेल्या कुत्र्यांवरून डोंगरापलीकडे असलेल्या कंपनीज वर वाहवत गेला.आता धरण बांधते. ☺️
(अवांतर: विषय कोणत्याही धाग्यावरून कुठेही वाहवत जाणं मायबोलीला नवीन नसावं.)

पाहुणचार घेण्यासाठी आधी डोंगर चढावा लागेल असं म्हणताहेत त्या.
मागच्या महिन्यात नाशिक बस डेपोमध्ये एक कुत्रा थांबलेल्या बसच्या पुढच्या चाकामागे आरामात बसला होता. बस चालू झाली, कुत्रा उठायची धडपड करू लागला, लोक चालकाला हाताने थांबायचा इशारा करत होते, पण त्या चालकाला कळलं की नाही कुणास ठाऊक पण त्याने बस नाही थांबवली आणि....कुत्र्याच्या अंगावरून बस गेली. कुत्रा वेडावाकडा झाला होता, रक्ताचा एक थेंब नाही, थोडावेळ जिवंत होता नंतर गेला बिचारा. एवढं विचित्र दृश्य होता, हळहळ वाटली पण काहीच इलाज नव्हता. नंतर सफाई कामगार येऊन त्या कुत्र्याला दोऱ्या बांधून फरफटत घेऊन गेले. असे किती कुत्रे हकनाक जात असतील.

मी अशा कुत्र्यांना ग्लुकोज बिस्किटांची लाच देतो. शहाण्यासारखी वागतात. Happy >
छान trick

एकदा दिवेआगरला गेलो होतो तेव्हा एका भुभुला सहज यु यु केल तर आल आन अस जाम चिकटल मला.> तो माणसाळलेला असेल आणि त्याला खाऊची, मायेची भूक असेल

Submitted by मीरा.. on 14 September, 2019 - 12:31
>
बापरे कुत्र्यांमध्ये ही जातीभेद पाळले जातात ऐकून आश्चर्य वाटले
पेट फ्रेंडली रेस्तराँ > ऐकावे ते नवलच..! एवढे शिस्तबद्ध प्राणी..!!

तर त्या एरियातली भटकी कुत्री ओरडून गोंधळ घालतात.> तुमच्या कुत्र्याच्या अंगावर वैगरे धावून येत नाहीत..?

mi_anu >
फक्त खव्याचे पेढे..! बापरे.. ! अतिलाडावलेला कुत्रा..!

Submitted by चंपा on 15 September, 2019 - 00:37> अरेरे Sad

माझ्या एका लांबच्या भावाकडे कोठला तरी हायब्रीड जातीचा कुत्रा आहे. एकदम वांड आहे. येणार्‍या जाणार्‍याला तोंड लावले नाही तर त्याला जेवण जात नाही. मी एकदा गेलो होतो ...त्याच्या पिंजर्‍याच्या जवळ होतो तर जाळीतून तोंड बाहेर काढून माझा चावा घेतला. (मी थोडा बेसावध होतो). घरचे पण त्याला वैतागले आहेत. फक्त माझा भाचा आणि वहीनी यांना तो आवरला जातो. (दर २-३ दिवसांनी या दोघांपैकी कोणाला तरी हलके चावतोच.). वहीनींचा हात त्याच्या चाव्याने भरला आहे. (त्याला रेबीजचे इजेक्शन दिले आहे) एकदा माझा मामे भाऊ बाहेरून आला तर त्याला उगाचच कडकडून चावला. त्यामुळे त्याने चिडून या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला जंगलात सोडायचे किंवा त्याचा निकाल लावायचा असा निर्णय घेतला तर त्याच्या सासूबाईंनी अकांड तांडव केले. (त्या ह्या कुत्र्याच्या जवळपास पण फिरकत नाहीत.) ट्रेनर ने सांगितले की हा कुत्रा या जन्मात काही ट्रेन होणार नाही. जनावरांचे डॉ. पण याला घाबरतात. त्याला घेऊन डॉ. जायचे म्हणजे आधी दोन तास त्याच्या तोंडाला कॅप घालायचा प्रोग्रॅम होतो. ह्या कुत्र्यामुळे समस्त कुत्र्यांविषयी सध्यातरी मला राग येतो. बहुतेक लांडग्याचा हायब्रीड असावा. दिसतो मात्र एकदम तगडा आणि अंगात ताकद खूप आहे. चिडला तर वहीनी आणि भाचा दोघांनाही आवरायला कठीण जातो.

तसे रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या अंगात पण खूप मस्ती असते. दिवसा घाबरणारी कुत्री रात्री तुमच्या मागे अशी लागतात की काय. माझ्या शेजार्‍यांच्या मागे एकदा गल्लीतले कुत्रे लागले होते. त्यामुळे घाबरून ते पळत असताना पडले आणि हात फ्रॅक्चर झाला होता. एकदा पहाटे मी कुठे तरी जात होतो आणि एक कुत्रे दुरवरून माझ्या कडे भुंकत येत होते. एवढ्यात रस्तावर एक ट्रक आला आणि कुत्रा उगाचच भुंकत त्या ट्रकच्या मागे पळू लागला आणि मागच्या चाकाखाली सापडला.

याउलट माझ्या लहानपणी कोकणात आमच्या घरी एक कुत्रा होता. एकदम गरीब आणि प्रेमळ होता. तो कुत्रा घरात एका लिमिटच्या आत यायचा नाही. फक्त हॉल मध्ये यायचा आणि बेडरूम किंवा किचनच्या दारातच थांबायचा. त्याचे खाणे जरी अर्धाफुट आत बेडरूम किंवा किचन मध्ये ठेवले तरी तो दारातच थांबायचा. उगाच पायाने ते ओढायचा प्रयत्न पण नाही करायचा. घरातल्या मांजरांबरोबर थोडी मस्ती करायचा. मांजर आणि त्याची पिल्ले याच्या अंगा खांद्यावर खेळायची. कधी तरी लबाड मांजर ह्याचे खाणे पळवून बेडरूम मध्ये शिरायची तर हा तिच्या मागे येऊन दारात घुटमळत थांबायचा. माझे दोन चुलत भाऊ एकदम लहान होते. ते ह्या कुत्र्याला एकदम त्रास द्यायचे. हा बिचारा तो त्रास सहन करायचा. फार गुणी होता.

आमच्या कॉलनी मधे एक कुत्री अशीच अ‍ॅग्रेसिव्ह झाली होती. मी माझ्या लहान बाळाला कडेवर घेउन खाली गेले होते, हातात तिचा पाळणाघरचा डबा. तर तो डबा पहाताच ही कुत्री तडक अंगावर आली. मी तो डबा खालीच फेकला. तो उघडला आणि ती त्यातील खाऊ खायला लागली.

@Anu .नरसोबाच्या वाडीतला सांगताय का? तिथली कुत्री पण पेढेच खातात..काही कुत्री तर पेढ्यांच्या पिशव्यापण पळवतात..नाहीतर मग मागे लागतात..

चाळीसगावाला माझा पुतण्या ज्या क्लासला जातो त्या बाईकडे ठीपक्यांचा कुत्रा आहे..गोमझी नाव त्याचं ...कसला गोड आहे सांगू..
आमची अशीच मैत्री झाली..

मी अधून मधूनच जातो चाळीसगावाला ...कधी मी वर्षातून जातो..
सहा महीन्यांनी जातो...पण जेव्हा पण जातो तो मला बरोबर ओळखतो..
विसरत नाही तो कधी..

पुतण्याला सोडायला गेलो की, बंगल्याबाहेर धावत येतो ..आनंदाने उड्या मारतो..फक्त वासाने त्याला कळत असावं मी आलोय ते..

परत जाईन तेव्हा नक्की फोटो काढून आणेन..

कुत्र्याला सांभाळणं म्हणजे 1-2 वर्षाचं मूल सांभाळण्यासारखं असतं. फक्त ते जन्मभर मुलच रहातं, वय वाढलं तरी समज लहान मुलांच्या एवढीच रहाते. त्यांना आपल्याला काय हवं ते व्यवस्थित कळतं, डिमांड करतात पण त्यापलीकडे फारसं समजवलेलं कळत नाही.

पावसाळा संपून महिना झाला तरी आमच्या बिगल बाळाचा रेनकोट टेरेसमध्ये लटकत होता. तो धुवून, वाळवून, घडी पुढच्या वर्षासाठी जपून ठेवायचा प्लॅन अंमलात आणायला आजचा दिवस उगवला. सकाळी मावशींनी धुतलेला रेनकोट त्याने पाहिला नव्हता, पण मी आता घडी घालताना पाहिल्याबरोबर तो लगेच घालण्यासाठी हट्ट चालू झाला. भुंकून आणि अंगावर आणि रेनकोटवर उड्या मारून थांबेल असं वाटलं पण 10 मिनिटं कर्कश ओरडून घर डोक्यावर घेतलं. शेवटी दुपारच्या वेळी शेजाऱ्यांना डिस्टर्ब नको म्हणून रेनकोट घालून दिला. आता गेले 15 मिनिटं बाळ रेनकोट घालून फिरतं आहे. आता बास, आता काढून ठेऊ म्हणून बकलला हात लावल्यावर गुर्र चालू आहे. आता टेरेसमध्ये उन्हात रेनकोट घालूनच पहुडला आहे. Lol

किती गोड Happy
आमच्या ठोंब्याने बागेत कुंपणाजवळची माती खोदून आरपार भुयार बनवले आहे. Uhoh आता बाहेर जाताना त्याला कुठे सोडायचे हा मोठा प्रश्न आहे आमच्या समोर. Sad

भुयारात बाहेरच्या तोंडाला एक आरसा लावून ठेवायचा म्हणजे तिकडून बाहेर सटकायला निघेल तेव्हा समोरच्या ध्यानाला पाहुन भुंकत बसेल आणि कंटाळा आला / भूक लागली की येईल परत माघारी घरातल्या आपल्या नेहमीच्या जागेवर Light 1

फोटो येऊद्या रेनकोटातल्या बाळाचा Happy। >>>> आज आणि उद्या लॅपटॉपला हात न लावण्याचा दिवस आणि मोबाईलवरून फोटो अपलोड होत नाही, पण फोटो नक्की टाकेन Happy त्याचं insta page तयार करायचं हे गेले दीड वर्ष तो घरी आल्यापासून ठरवते आहे, पण अजून काही जमलं नाही. शेअर करायला खूप गोडू फोटोज आहेत. Happy

इथे उपाशी बोका यांनी एक कविता दिली होती.
I want my children to have a dog
Or may be two or three
They'll learn from them more easily
Than they will learn from me.

A dog will teach them how to love,
And have no grudge or hate
I'm not so good at that myself
But a dog will do it straight

I want my children to have a dog,
To be their pal and friend
So they may learn that friendship
Is faithful to the end.

There never yet has been a dog
That learned to double cross
Nor catered to you when you won
Then dropped you when you lost.

- Martin Hale (I am not 100% sure about the poet.)

Submitted by उपाशी बोका on 17 April, 2019 - 18:23
-------------------
तिचे मराठी रूपांतरण करायचा हा प्रयत्न मूळ कवितेच्या जवळपासही नाही याची जाणीव ठेवून इथे देते आहे..

मनापासून वाटतेय नेहमीच..
की मुलांसाठी भूभूचे एक पिल्लू आणावे..
एक किंवा दोन की तीन ??
खूप काही शिकतील ना मुले त्याच्याकडून..
नक्कीच त्या संस्कारांपेक्षा जास्त, जे मी मुलांना देईन..

भूभू त्यांना शिकवेल प्रेम करायला
- न ठेवता मनामध्ये अढी किंवा तिरस्कार..
जे मलासुदधा नाही जमत बरयाच वेळेस,
पण ते करून देईल मुलांना हा साक्षात्कार.

ते होईल माझ्या मुलांचा सखा, सुहृद आणि मित्र
निरपेक्ष, निढळ आणि निखळ मैत्री कुठे शिकतील मुले इतरत्र??

कुत्री नसतात अशी कधीच,
वारा पाहून पाठ फिरवणारी,
यशात हक्क मागणारी आणि
अपयशात साथ सोडणारी..

म्हणूनच मनापासून वाटतेय की आणावे एक कुत्रे,
माझ्या मुलांच्या प्रत्येक क्षणात त्यांच्या बरोबर असणारे....

फार मस्त कविता Happy मीही तुमच्यापासून प्रेरणा घेतली धनवन्ती.
_____________
एक सच्चा इमानी मित्र, तुमच्यावर करतो जो प्रेम फक्त
असा कुतु सर्वांनी पाळावा, हा स्वर्गीचा आनंदठेवा

बाहेरुनी घरी आल्यानंतर एक जरी भुभु आला धावत
शेपूट हलवित मजेत दुडकत झेप त्याने घ्यावी मजवर

सार्‍या दिवसाचा शीण मिटावा घरी असावा असा विसावा
विसरुनी सारे हेवेदावे भुभुसंगे मी मुळी सदा खेळावे.

कधी ना हा रुसतो तुमच्यावर प्रेमच करतो अविरत निरंतर
आनंद देतो अवीट मजला प्रसन्न वाटे फार मनाला

एक सच्चा इमानी मित्र, तुमच्यावर करतो जो प्रेम फक्त
असा कुतु सर्वांनी पाळावा, हा स्वर्गीचा आनंदठेवा

Lol Lol Lol

Pages