या सामानाचे करायचे काय ?

Submitted by KulkarniRohini on 10 September, 2019 - 04:36

मी लग्न करून मुंबईत आले. माझं सासर औरंगाबाद पण नौकरी निमित्ताने माझे सासरे इकडे आले. लग्नानंतर 6 महिन्यांनी त्यांची बदली होऊन ते पुन्हा त्यांच्या जुन्या घरी राहायला गेले. आता तब्बल 8 वर्षांनी ते आमच्या सोबत राहायला आलेत. सध्या घर छोटं असल्याने आणि आवश्यक त्या सगळ्याच गोष्टी इकडेही असल्याने त्यांनी काहीच सोबत आणले नाही.
आता औरंगाबाद चा प्रश्न तिथे इतकं सामान आहे की काय करावं. सासूबाई ना काही केल्या ते सोडवेना. प्रेमाने घेतले असते सगळे आता विकू म्हणलं तर कवडीमोल ठरेल.
आपल्या पैकी कुणाला काही सुचवायचे असेल तर जरूर कळवा.

Group content visibility: 
Use group defaults

वनवासी कल्याण आश्रम बहुतेक सर्व वस्तू घेतात. सुस्थिती असलेल्या. जुन्या असल्यातरी चालतील. औरंगाबादेतच कोणी डिस्पोज ऑफ करणारे भेटले तर सोपे होईल. काही चांगले अँटिक असले तर इ बे वर विकता येइल. जुना सोर्‍या, तांब्या पितळेची भांडी आता परत फॅशन मध्ये आहेत.
ती साफ करून वापरता येतील.
खाली औरंगाबादेतील टॉप १०० स्क्रॅप डीलर ची लिस्ट दिली आहे तिथे फोन करा.

https://www.justdial.com/Aurangabad-Maharashtra/Scrap-Buyers/nct-10423431

आधी सामानाची नीट वर्गवारी करा. ज्या वस्तु पुढेही टिकणार आहेत अश्या ठेवा हवे तर. अमांनी सुचना दिल्या आहेतच. ज्या वस्तु तुम्ही आणी सासुबाई दोघींकडे आहेत त्या पाहीजे तर अंदाज लावुन दान करुन टाका. अंदाज लावा अश्यासाठी लिहीले की साधारण स्टील, कॉपर, लाकडी सामान टिकु शकते. चांगली क्रोकरी सुद्धा काळजी घेतली तर टिकु शकते.

कायम एकत्रच रहाणार आहात का हा

कायम एकत्रच रहाणार आहात का हा विचार करा.
पुढे मागे त्यांना किंवा तुम्हाला वेगळं रहावं असं वाटु शकेल.
किंवा त्या घरी येउन जाउन वैगेरे.
असलं घर त्यात समान तर सोपं जाईल.

> कायम एकत्रच रहाणार आहात का हा विचार करा.
पुढे मागे त्यांना किंवा तुम्हाला वेगळं रहावं असं वाटु शकेल. > +१. याआधी कधी एकत्र राहिला आहात काय? किती काळ? जर राहिला नसाल तर कमीतकमी २-३ वर्षतरी हे घर, समान आहे तसेच राहूदेत.

उतार वयात सामानाची भौतिक आवश्यकता बहुतांश वेळा भलेही नसली तरी ती एक मानसिक गरज असते. आयुष्यभर विविध प्रसंगाना तोंड देत जमवलेली आठवणींची पूंजी असते ती, त्यामुळे वयस्कर मंडळीना त्यांच्या सामानाचा मोह कायम असणार आणि त्यात गैर काहीच नाही. कदाचित नवीन पिढीसमोर ते भिडेखातर नको नको म्हणत असले तरी त्यांचे जुने घर विकुन एकत्र छोट्या घरात राहावा लागण्यासारखा बाका प्रसंग नाहीये तर ते सर्व त्यांच्या हयातीत जुन्या घरी तसेच राहिले तर अधिक बरे.

धन्यवाद. मी पण बराच विचार केला आणि सध्या तरी अंदाज घेतला तर असं आहे की ते वेगळे राहू शकणार नाहीत. सो मी असा मार्ग काढलाय की मुंबईत जो फ्लॅट आहे तो रेट ने आवश्यक त्या वस्तू सहित भाड्याने द्यायचा. औरंगाबाद चा फ्लॅट म्हणाले तर विकायचा आणि आम्ही तसेही पुण्यात शिफ्ट होणार आहोत तर पुण्यात 2bhk मध्ये राहायला जायचे.
तरी सुद्धा खूप सामान आणि त्याची वर्गवारी करावीच लागणार आहे. वनवासी कल्याण आश्रम आणि scrap delaler चा मार्ग उत्तम आहे.
या पर्यायात त्यांना पुन्हा वेगळे राहावे वाटले तरी मुंबई चा option आहेच आणि जर सोबत राहत असू तर चार पैसे भाड्याचे मिळतील.

. कदाचित नवीन पिढीसअर ते भिडेखातर नको नको म्हणत असले तरी त्यांचे जुने घर विकुन एकत्र छोट्या घरात राहावा लागण्यासारखा बाका प्रसंग नाहीये तर ते सर्व त्यांच्या हयातीत जुन्या घरी तसेच राहिले तर अधिक बरे.>> अगदी अगदी. माझ्या आईव डिलांना मी असेच हैद्राबादला टू बीएच के मध्ये घेउन आले. तिथे ते राहिले पण मन पुण्यातच होते. अगदी कंटा ळून जात. रागवत चिडत. सर्व वस्तू , सर्कल व नातेवाइ क पुन्याला सोडून आल्याने त्यांना फार विस्थापिता सारखे वाटा यचे. पुणे सोडणे त्यांना फार त्रासाचे गेले. मी आता विचार करते की पुण्यातच घर घेउन तिथेच त्यांच्या सोबत मी राहायला हवे होते. तिथे नोकरी केली ती इथे केली असती. नंतर काही वर्शांनी ते पुण्यातले घर काही मोबदला घेउन मालकांना परत दिले व एकेक वस्तू डिस्पोज ऑफ केली. हा पण एक ट्रोमाटिक प्रसंग होता माझ्यासाठी. माझे पण बालपण गेले वत्यांचे ४५ वर्शांचे जीवन. तुमच्या बाफ मुळे त्या सर्व आ ठवणी आल्या. एक भाउ येउन पार ट्युब लाइट फॅन पण घेउन गेला पन ते दोघे कसे आहेत एका
शब्दाने विचारले नाही. आईचा एक सोर्‍या तेव्ढा मी ठेवला आहे माझ्याकडे.

कदाचित नवीन पिढीसअर ते भिडेखातर नको नको म्हणत असले तरी त्यांचे जुने घर विकुन एकत्र छोट्या घरात राहावा लागण्यासारखा बाका प्रसंग नाहीये तर ते सर्व त्यांच्या हयातीत जुन्या घरी तसेच राहिले तर अधिक बरे.>> >>>> +१.

माझ्या आईचे पितळेचे ३ मोठे डबे मी का विकले याचा अजूनही पश्चात्ताप होत आहे.कारण जाडजूड डबे होते.राहिले असते बिचारे माळ्यावर.अजूनही तिची बरीच भांडी मुंबाई आणि चिंचवडच्या घरात आहेत.आई म्हणतेय की नंतर कुठल्याही आश्रमाला देऊन टाक.

एकेक वस्तू डिस्पोज ऑफ केली. हा पण एक ट्रोमाटिक प्रसंग होता माझ्यासाठी. >>>>> खरंच अमा, मलाही पुढे हेच करावे लागणार आहे.ते करणे किती त्रासाचे असेल याची जाणीवही आहे.माणूस काय काय जमवत जातो.यात मीही आलेच.