ठपाक ... एक शशक

Submitted by A M I T on 9 September, 2019 - 02:43

आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे सगळे जुळेच आहेत. पत्ता सांगताना आम्ही गमतीनं 'जुळेनगर' असा सांगतो.

आम्ही दोघीही जुळ्याच !
म्हणजे दिसायला अगदी हुबेहूब ! उंचीही तंतोतंत सारखीच.
पण डावं - उजवं असतंच ना शेवटी.
म्हणून मी तिची तरफदारी करणार नाहीए.
तिने एकाला जीवानिशी मारलंय.
बिच्चारा ! मरताना किती तडफडत होता तो !
कुठून आला होता कुणास ठाऊक !
गेल्या महिन्यात अंगठा तुटलेला असतानादेखील तिने हा पराक्रम करून दाखवला होता म्हणून जुळेनगरात प्रत्येकाला तिचा अभिमान वाटत होता. 'बहादूर' म्हणून तिची प्रशंसा होत होती.

"झुरळच तर होता. त्याचं काय एवढं मनाला लावून घ्यायचं." ती

मी तिच्याशी वाद घालणार, इतक्यात आम्ही दोघी मालकाच्या पायाला पकडून बाहेर हिंडून आलो.

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

Group content visibility: 
Use group defaults

कडक!!!

छान..

Lol