काजुकतली / मँगो कतली (फोटोसह)

Submitted by डॅफोडिल्स on 23 November, 2011 - 01:15
mango kaju katali
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पिठी साखर १ वाटी
काजू पावडर २ वाट्या
दुधाची घट्ट साय २ चमचे
पाणी पाव वाटी
तुप १ चमचाभर

क्रमवार पाककृती: 

कढई किंवा जाड बुडाचे पातेले तापायला ठेवावे.
काजूची पुड केली नसेल तर करुन घ्यावी. तयार पुड दोन वाट्या भरायला हवी.
कढईमध्ये एक वाटी साखर, दोन चमचे साय व पाव वाटी पाणी घालून साखरेत साय एकत्र होईल असे मिसळावे. गॅस मिडीयम हाय वर ठेउन सतत ढवळत रहावे.
साखर वितळेल व बाजुने बुडबुडे यायला सुर्वात होईल मग लगेच त्यात काजु पावडर घालून मिश्रण ढवळावे. मिश्रण गोळा व्हायला लागले की लगेच गॅस बंद करुन कढई खाली उतरवावी.
ताटाला किंवा पोळपाटाला तुप लाउन भरभर गोळ्याची पोळी लाटावी. हवा असल्यास चांदीचा वर्ख लावावा. मग लगेच धारदार सुरीने हव्या त्या आकाराच्या वड्या कापाव्या Happy

शंकरपाळ्याच्या आकारत कापताना कडेचे तुकडे उगाच अर्धवट पडतात. म्हणून ह्या साध्या सोप्या चौकोनी Happy

वेरिएशन म्हणून आंबा कतली करता येईल बच्चा पार्टी ला आंबे आणि काजूकतली दोन्ही खूप आवडीचे. एकत्र करुन फार सुन्दर कॉम्बिनेशन आंबाकतली होते.

मी वरिल दिलेल्या प्रमाणात एक वाटी साखरे ऐवजी एक वाटी आंब्याच्या फोडींचा गर वापरला. बाकी क्रूती सेम. एक आंबा काजू चा गोळा आणि एक फक्त काजू कतलीचा गोळा असे दोन्ही एकावर एक ठेउन भरभर लाटायचे. नेहमी प्रमाणे कापायचे. छान दोन रंगाची काजूकतली बनते.
फ्रेश आम्बा नसेल तर फ्रोझन पल्प वापरता येईल.

mangokajukatali_small.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाउ तसे/ आकारानुसार लहान मोठे बनवू तसे. :)
अधिक टिपा: 

कोणतीही बर्फी किंवा वड्या बनवताना मिश्रणाचा गोळा होत आला की चमचाभर पिठीसाखर भुरभुरवायची आणि पटकन मिक्स करुन मग वड्या थापायच्या/लाटायच्या. असे केल्याने वड्या/ बर्फी चिकट न होता एकदम खुटखुटीट होते.

काजू सादळलेले(मउ) असतील तर काजु पावडर निट होत नाही.
काजु पावडर बनवताना मिक्सर फर्स्ट स्पीड वर किंवा ईंच वर चालवावा एक एक मिनिटाच्या गॅप ने. दोन ते तिन मिनिटात चांगली सपीट पावडर बनते.

माहितीचा स्रोत: 
बहीण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज पुन्हा एकदा केल्या. काजू पूड किंचित रवाळ झाली, अगदी सपीठी नाही. पण तरी सुरेख झाली आहे कतली. फोटो आहे, नंतर देते.

Pages