शब्दधन - सोळा आण्याच्या गोष्टी - शतशब्द कथा स्पर्धा!

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

shashak1.jpg
---
रहस्य हा विषयच उत्कंठावर्धक आणि रसपूर्ण! मग गीतारहस्य असो अथवा भारत वर्षाच्या एकुलत्या एक नर्मदा नदीचे उलट्या दिशेने वाहण्याचे रहस्य असो. संपूर्ण विश्व कैक रहस्यांनी भरलेलं आहेत.
मनात धडकी भरणारी रात्रीच्या वेळची मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात दिसणारी सावल्यांची हालचाल...... मग त्या अगम्य, अतर्क्य, अनामिक भीतीने अंगावर सर्रकन येणारा काटा असेल किंवा एखाद्या व्यक्तिरेखेच्या माहिती नसलेल्या अनभिज्ञ बाजूचे, व्यक्तिमत्त्वाच्या अनोळखी पैलूचे दर्शन असेल.... सारेच रहस्यमय! लिहिताय ना मग? आम्ही आतूर आहोत. आम्हालाही वाचायची आहे रहस्यकथा; तुमच्या लेखणीतून उतरलेली.

इथे मात्र आपले शब्दधन जरा काटकसरीने वापरू. केवळ शंभर शब्दांत तुम्हाला रहस्यकथा लिहायची आहे.

फेसाळत्या नदीलाही बांध असतात. मग स्पर्धा त्याला अपवाद कशी असेल?

तर नियम साधे सोप्पे आहेत:

१. कथा मराठी भाषेत असावी.
२. भाषा शक्यतो शुद्ध असावी.
३. असभ्य शब्द, शिवीगाळ नको.
४. कथा अर्धवट, अनाकलनीय, अतार्किक नको.
थोडक्यात, रहस्य मांडणी आणि त्याची उकल असे दोन्ही साधले गेले पाहिजे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या :
१. प्रवेशिका पाठवण्याकरिता 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
२. 'मायबोली गणेशोत्सव २०१९' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
३. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१९ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
४. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे - {सोळा आण्याच्या गोष्टी} - {प्रवेशिकेचं नाव} - {तुमचा आयडी}"
५. प्रवेशिका ०२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१९ या वेळेत पाठवता येतील.
६. या स्पर्धेचे परीक्षण संयोजक मंडळ करणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>
५. प्रश्न विचारला की धागा गायब करणे. मग तो प्रश्न उडवुन धागा परत आणणे. त्या धाग्यातला मतदानाबद्द्लचा नियम गायब करणे, पण बाकी सगळीकडे तसाच ठेवणे, आणि त्या धाग्यात निवड कशी करणार हे गुलदस्तात ठेवणे आणि यासगळ्या बद्दल शून्य स्पष्टीकरण देणे. जो प्रश्न एका उत्तरात निकाली निघाला असता त्या साठी पूर्ण गणेशोत्सवात वातावरण तापत ठेवणे. ही संयोजकांची कसली स्टॅटेजी आहे कोणास ठावुक!
<<<

या मुद्द्याला पूर्ण अनुमोदन. संयोजकांनी स्पर्धेचे नियम मंडळातील बहुमताने ठरवले असतील असं गृहित धरता - त्यांना नियम ठरवायचा अधिकार आहेच, पण लोकांच्या शंका/प्रश्नांचा अनुल्लेखाने अपमान केलेला पटला नाही. ते नियम ठरवण्यामागची विचारप्रक्रिया वाचकांना विश्वासात घेऊन स्पष्ट करायला हवी होती. नव्हे, अजूनही करावी.

>>> बदल करायचा नाहीये याची कातडीबचावू पोस्ट लिहायला मदत हवी असेल तर संपर्कातून कळवलंत तर मी ही मदत करेन
Lol

अमितने लिहिलेल्या कातडीबचाऊ उत्तराचं मुद्रितशोधन करून हवं असेल तर मी मदत करेन. Proud

अमितव, धागा गायब करणे आणि प्रतिसाद उडवणे या पॉवर संयोजक आयडीला असतात का?
मला वाटतं नसाव्यात. म्हणजे admin/webmaster यांनी प्रकरणात हात घातला आहे.
तशा पॉवर असतील तर ५ साठी +१.

पोस्टमधील आधीच्या भागाला unconditional +१

अजून एक मुद्दा मी नंतर मांडण्यासाठी ठेवला होता पण आता मांडून घेतो.
संयोजकांना स्पर्धा/ऊपक्रम आयोजित करतांना मायबोलीच्या लेखन/वाचन सवयींचे थोडेसे पुर्वाकलन असावे किंवा नसल्यास त्यांनी जुन्या संयोजन समित्यामधील लोकांची मदत घ्यावी हे होत नाही का?

ऊदाहरणार्थ ही स्पर्धा - शब्दधन - कथा स्पर्धा - चंद्र अर्धा राहिला

मायबोलीवर सायफाय कथा लिहिणारे असे कितीसे लेखक आहेत? त्यात असा कॉम्लिकेटेड पुर्वार्ध देऊन ऊत्तरार्ध लिहायला सांगणे फारच आगाऊपणाचे वाटले. हे मंडळातल्या कुणाला तरी सुचलेली कथेची आयडीया कथालेखकांच्या गळी ऊतरवणे आहे. बाकीच्या कथालेखकांचे माहित नाही पण लेखक म्हणून मी दुसर्‍याचे एवढे स्पेसिफिक कथाबीज घेऊन अशी कुठलीही कथा लिहिणार नाही.
कल्पना खरंच चांगली होती. कथेमध्ये एलियन आणि चांद्रयान हवे असा साधासा क्रायटेरिया दिला तर नक्कीच प्रयत्न केला असता पण पूर्ण पार्श्वभुमी देऊन कथा पुर्ण करा म्हणणे लेखकांची मानसिकता न कळाल्याचे लक्षण आहे.
विकिपिडीया वरून माहिती घेत चालू सिरिअलचा एपिसोड लिहिण्यासारखे झाले हे... STY लिहायचा असेल तर गोष्ट वेगळी आहे ते मजेमजेत लिहिले जाते.

मागच्या वेळीही अशी एक अद्वितीय स्पर्धा/ऊपक्रम होती जिला शून्य प्रतिसाद मिळाला.. ह्या स्पर्धेचीही तसेच झाले तर (होऊ नये ही सदीच्छा!) मला नवल वाटणार नाही.

भरत, धागा अप्रकाशित करण्याचे अधिकार असतात. प्रतिसाद उडवण्याचे नसतात. असं मला बरोबर आठवत असेल तर वाटतं.
आणि ही < अंडर लाईन स्टार्ट्स > खाजगी जागा आहे < अंडर लाईन एंड्स > हे वारंवार मला सांगितलं गेलं आहे सो मनावर एकदम बिंबलं आहे माझ्या. सो या जागेवर जे जे होते त्याची अंतिम जबाबदारी जागा मालकाचीच आहे. प्रतिसाद त्यांनीच उडवला आहे. ते ही ठीकच.
पण एका ओळीत स्पष्टीकरणाने जो विषय संपला असता तो आता तरी संपवा अशी कळकळीची संयोजकांना आणि खाजगी जागा मालकांना विनंती.
थंडा करके खाओ अ‍ॅटिट्युड माझ्या डोक्यात जातो. असं करायला काही हे राजकारण नाही. चटकन काय आहे ते सांगितलं असतं, किंवा आम्ही बहुमताने हे ठरवलं आहे आणि आम्हाला हे असं असं करायचं आहे इतकं जरी सांगितलं असतं तरी मी ताणलं नसतं. संयोजकांचा निर्णय अंतिम याचा आदर करुन मत मांडून गप्प बसलो असतो. आज ५ दिवस झाले तरीही ढिम्म हालचाल नाही याचं दु:ख वाटतं.
असो.

अमित +१
संयोजक मंडळातले सदस्य एक मायबोलीकर वाचक म्हणून वेगळे आणि परीक्षक म्हणून वेगळे असे आहे का?
कारण संयोजक मंडळातल्या काही सदस्यांनी स्पर्धेतल्या कथांवर मायबोलीकर वाचक म्हणून "ही छान आहे, नाही आवडली, कळली नाही" असे प्रतिसाद ऑलरेडी दिले आहेत. मग आता परीक्षक म्हणून काम करतांना ते कथेचा हॉलिस्टिक रिव्यू कसा करू शकतील जर त्यांचा व्यू ऑलरेडी बायस्ड आहे.
संयोजन मंडळातील सदस्यांनी असे मतप्रदर्शन करणे कसले लक्षण असते? चालू स्पर्धेत मंडळातील सदस्यांनी असे मतप्रदर्शन न करण्याबाबत सदस्यांमध्ये काही बोलणी झाली नाही का?

धागा अप्रकाशित करण्याचे अधिकार संयोजकांना असतील तर ते आधीचा पूर्ण धागाच अप्रकाशित करून मग त्याच कन्टेन्ट चा नवा धागा काढू शकतातच. त्यावर आधीचे प्रतिसाद अर्थातच दिसणार नाहीत. प्रतिसाद उडवायची गरज काय?!
बाकी - लोकांच्या शंका/प्रश्नांचा अनुल्लेखाने अपमान केलेला पटला नाही. ते नियम ठरवण्यामागची विचारप्रक्रिया वाचकांना विश्वासात घेऊन स्पष्ट करायला हवी होती. नव्हे, अजूनही करावी.>>>> याला +१११!!

शशक कथा प्रकाराचा मूलभूत नियमच शंभर शब्दांची कथा असा आहे
तरीही काही सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंकेचे निरसन करण्यासाठी पुढील स्पष्टीकरण देत आहोत:

"नावातच उल्लेख असल्यानुसार शतशब्द कथा या कथा लेखन स्पर्धेला १०० शब्दांची मर्यादा बंधनकारक आहे.
विरामचिन्हे, शीर्षक आणि लेखकाचे नाव यात मोजले जाणार नाही.
कथेच्या धाग्यात वरील अपवादा व्यतिरिक्त अन्य काहीही लिहिलेले असल्यास ते सर्व कथेचा भाग मानण्यात येईल.
एकूण हे सर्व शब्द जर १०० पेक्षा कमी/जास्त होत असतील, तर ती कथा १०० शब्दापेक्षा कमी/जास्त मानण्यात येईल आणि म्हणून स्पर्धेतून बाद होईल"

नियमांमध्ये शंभर शब्दांमध्ये म्हटलं आहे, मग शंभर किंवा त्यापेक्षा कमी असं मानून बऱ्याचश्या कथा लिहिलेल्या आहेत. मग सगळ्या बाद होणार का? की सगळ्यांनी सरसकट संपादन करून शंभर शब्द करायचे आहेत? या आधीच्या स्पर्धांमध्ये संपादन करायला परवानगी नसे म्हणून विचारते आहे.

माझ्यामते शंभर किंवा कमी शब्द चालावे. शंभरहून जास्त नको हे मान्य.

"शंभरपेक्षा कमी/अधिक शब्दांच्या कथेला शशक म्हणता येणार नाही.... मंडळाने दिलेल्या मुदतीच्या आधी तुम्हाला गरज भासल्यास कथा संपादित करू शकता"

माननीय संयोजक,
स्पंदन - गझल स्पर्धा गणेशोत्सोव २०१९ ह्या ऊपक्रमात समाविष्ट आहे की नाही ह्याबद्दल एकदा आपले मत सांगण्याची कृपा कराल का?

ही स्पर्धा जाहीर झाल्यानंतर मी ३ तास खर्ची करून गझलेची बाराखडी धागा अभ्यासला. २००८ साली मायबोलीच्याच "गझलेची कार्यशाळा" ऊपक्रमात सहभागी होतो तेव्हाचे माझे नोट्स शोधून काढले. बाराखडी आणि गझल स्पर्धेच्या धाग्यावर दिलेल्या माहितीत जी तफावत अढळली त्यानुसार स्पर्धेच्या धाग्यावर शंकानिरसन होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रश्न विचारले. स्पर्धेसाठी गझल लिहायचा प्रयत्न देखील सुरू केला.

पण गझल स्पर्धेचा तो धागा अचानक गायब झाला. गणेशोत्सोवाच्या मुख्य पानावर स्पर्धेचा दुवा होता म्हणून मला वाटले की काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम झाला असावा. तर त्याबद्दल तुमच्याकडे आधी विचारणा आणि नंतर पाठपुरावा केला. तुम्ही एका शब्दानेही काही स्पष्टीकरण वा माहिती न देता स्पर्धेची माहिती बदललेला आणि माझा प्रतिसाद ऊडवलेला धागा आणलात. गणेशओत्सोवाच्या मुख्य पानावरचा स्पर्धेचा दुवा आणि बदलेला स्पर्धेच्या धाग्याबद्दल तुम्हाला विचारणा करूनही तुम्ही त्याबद्दल मूक धोरण स्वीकारले.

हे पुन्हा ऊगाळण्याचे कारण की आता तुम्ही मुख्य पानावरून स्पंदन -गझल स्पर्धा हा दुवा काढून टाकला आहे. ह्याचा अर्थ ही स्पर्धाचालू गणेशोत्सवाचा भाग नाही. परंतू तुम्ही ह्या गझल स्पर्धेचा धागा अजूनही प्रकाशित ठेवला आहे.
स्पर्धकांनी अणि वाचकांनी ह्याचा नक्की अर्थ काय समजायचा?

तुम्हाला स्पर्धकांच्या होत असलेल्या गैरसोयीची आणि त्यांच्या वेळेच्या अपव्ययाची तमा नाही आणि फक्त सिलेक्टिव स्पर्धकांना ऊत्तरे द्यायची आहेत हे लक्षात आले. पण गझल स्पर्धा अस्तित्वात आहे की नाही आणि ईच्छुकांनी स्पर्धेसाठी गझल लिहायची की नाही तेवढे एका शब्दाने स्पष्ट केले तर बरं होईल.
प्रश्न विचारल्यानंतर प्रतिसाद, दुवे, धागे ऊडवून झाले आता प्रश्न विचारणारा आयडी ऊडतो की काय ते बघायचे बाकी आहे.

कळावे ही विनंती.

नेहमीच्या शिरस्त्याला झुगारून यंदा संयोजक परीक्षण करणार हे स्विकारले, असतील त्यांची न सांगण्याजोगी कारणे म्हणत.

आता संयोजक स्पर्धेत भाग घेताना दिसताहेत. स्वतःचे परीक्षण ते स्वतःच कसे करणार आहेत?

अनुल्लेखाने मारणे म्हणजे काय ह्याचे मस्त उदाहरण आहे ही स्पर्धा. इतक्या वर्षाच्या अनुभवाने हे जमतच असेल अडमीन वेमाना.
संयोजक मंडळी, खऱ्या आयडीने प्रतिसाद देतायत, धागा काढतायेत म्हणून पब्लिक बोलतंय, पण समजा त्यातील कोणी त्यांच्या ड्यु ने प्रतिसाद दिला किंवा धागा काढला आणि जिंकवल आपल्याच ड्यु ला तर कसे म्हणता Proud
मज्जाच नै का, त्यापेक्षा या ला पण गम्मत खेळ जाहीर करा, हकानाका

मज्जाच चालू आहे.
इथल्या काही मंडळींनी तर स्पर्धा नोबेल पारितोषिकासाठी घेण्यासारखं रान पेटवलय. काही क्रांतीवीर तर अनाकलनीय कथा टाकून उपोषणाला बसल्याचा आव आणतायेत.
नसेल पटत तर सोडा ना, उगीच काय पिच्छा पुरवायचा. कथा स्पर्धेसाठी नाही असा मानभावीपणा करायची गरज काय?
आणि संयोजक प्रत्येकाला उत्तर द्यायला बांधील नाहीत किंवा कुणाच्या घरचे नोकर नाहीत.
मतदानपद्धती? व्हॉट अ जोक. का? तुमच्या कंपूचा डोमीनन्स इथे दिसत नाहीये म्हणून, की विपु आणि संपर्कातून प्रचार करता येत नाहीये म्हणून?
जे होतंय चांगलं होतंय.

इथल्या काही शशक वाचून मी गोष्टी वाचतोय कि कोडी सोडवतोय तेच कळत नाहीये. "ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ" चा फील येत राहतो या शशक वाचताना. माझा भावनांक आणि बुध्यांक कमी असल्यानेही होत असेल असं. "गावांची नावे ओळखा" हा धागा तर फार किरकोळ वाटायलाय.

काही कथा 'जरा जास्तच' क्लिष्ट आहेत आणि कथेपेक्षा कोडी सोडवा जास्त वाटताहेत मान्य. पण त्याच कारण
• वाचकाचा भावनांक/बुद्धयांक कमी आहे किंवा
• समजावून सांगावी लागतेय-स्पष्टीकरण द्यावं लागतेय म्हणजे कथा(/लेखक) गंडला आहे
ही दोन्ही नाहीत/चुकीची आहेत.

• आपण ज्या वाचकांसमोर कथा प्रेझेंट करणार त्यांच्या आकलनक्षमतेचा थोडाफार विचार लेखकाने करावा अशी अपेक्षा ठेवण्यात अजिबात काही चूक नाही
• साधेपणात सौंदर्य असते हेदेखील मान्य
• पण म्हणून लेखकाने नवीन प्रयोग करूच नयेत असे नाही
• किंवा आम्हाला खिजवायला, तुमच्यापेक्षा मी भारीय हे दाखवायच्या एकमेव उद्देशाने लेखक हे करताहेत असही नाही

लेखकांना लिहायचं ते लिहूदेत. वाचकांना समजत नसेल/रोचक वाटत नसेल तर ते त्या लेखकाचं लेखन वाचणं सोडून देतील.
कोणी सांगावं यासगळ्यातून कदाचीत प्रगल्भ वाचक निर्माण होतील किंवा साधंसोपं लिहणारे लेखक निर्माण होतील किंवा दोन्ही होईल किंवा दोन्ही होणार नाही Lol Lol

गावांची नावे ओळखा धागा मी उघडलादेखील नाही.

इथे लिहिण्यास उशीर झाल्याबद्दल सर्वप्रथम क्षमस्व. तसेच काही बदल करताना आमच्याकडून मुख्य पानावरून गझल स्पर्धेचा दुवा गेला त्याबद्दलही दिलगीरी व्यक्त करतो. तो पुन्हा दिलेला आहे.
दरवर्षी कार्यक्रम ठरवताना त्यावेळचे संयोजक मंडळ एकंदर उपक्रम्/स्पर्धा / परीक्षण याबद्दल चर्चा करून निर्णय घेत असतात. यंदा त्यात काही बदल केले आहेत. त्यावरून इथे बरीच चर्चाही झाली. सर्वांना विनंती आहे की चर्चा थांबवून मायबोलीच्या अपल्या या उपक्रमात नेहेमीप्रमाणे जोरदार भाग घ्या.

अॅमी +१
काही कथा 'जरा जास्तच' क्लिष्ट आहेत आणि कथेपेक्षा कोडी सोडवा जास्त वाटताहेत मान्य. >> अजून एक कारण-
कथा स्थलकालसापेक्षच असतील असे नाही. वाचक जर कथेच्या मूळ कल्पनेशी / संदर्भांशी परिचित नसेल तर ते संदर्भ उलगडून सांगितल्याशिवाय कथेचे आकलन होणार नाही. तेव्हा माझा भावनांक/बुद्धयांक कमी आहे हा न्यूनगंड कोणत्याही वाचकाने ठेवू नये. नाही तरी जगी ‘सर्वज्ञानी’ असा कोण आहे ? Happy
विविध कथांवरच्या चर्चा वाचताना मला तरी मजा वाटली.

Submitted by Admin-team on 9 September, 2019 - 03:10 >> Too late, too little, पण तरिही आपल्या विनंती आणि सुचनेचा आदर आहे.

दरवर्षी कार्यक्रम ठरवताना त्यावेळचे संयोजक मंडळ एकंदर उपक्रम्/स्पर्धा / परीक्षण याबद्दल चर्चा करून निर्णय घेत असतात. यंदा त्यात काही बदल केले आहेत. त्यावरून इथे बरीच चर्चाही झाली. सर्वांना विनंती आहे की चर्चा थांबवून मायबोलीच्या अपल्या या उपक्रमात नेहेमीप्रमाणे जोरदार भाग घ्या. >> संयोजकांच्या न आवडलेल्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करत असलो तरी उपक्रमात नेहेमीप्रमाणे जोरदार भाग घेणे चालूच आहे.

गझल स्पर्धेचा दुवा पुन्हा दिल्याबद्दल धन्यवाद.

ज्यांच्या कथेत 100 पेक्षा कमी शब्द असतिल त्यानी आता फालतु वाक्य घालुन 100 करावे. नाहितर संयोजक बाद ठरवतिल .. बरोबर ना ?

मी आत्ता एक कथा संपादित करून पुन्हा टाकली आहे
पण दिसताना ती जुनीच कथा दिसतीये
कृपया आपण पाहाल का ?
कथा - आनंद - बिपीन सांगळे

Pages