मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.
उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी
उत्तर: सातारा
कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.
आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?
पहीला क्ल्यू आहे:
सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला
माहूर
माहूर
तुळजापूर आणि माहुर दोन्ही
तुळजापूर आणि माहुर दोन्ही नाही.
जुन्या काळातली राजधानी होते
जुन्या काळातली राजधानी होते हे शहर..
राहिले अंबेजोगाई
राहिले अंबेजोगाई
किंवा अहमदनगर
दोन्ही नाही..
दोन्ही नाही..
कोल्हापूर
कोल्हापूर?
पण इकडे इतकेसे उकडत नाही
अरे... आमच्या विदर्भा कडे पण
अरे... आमच्या विदर्भा कडे पण लक्ष द्या जरा
चंद्रपूर
चंद्रपूर
चंद्रपूर
चंद्रपूर
Submitted by जिद्दु on 5 September, 2019 - 21:59
>> correct
रामराम.. शुभरात्री
रामराम.. शुभरात्री
कापडी-चोपडी, लग्नाचे बस्ते
कापडी-चोपडी, लग्नाचे बस्ते
अरून्द गल्ल्या, चिन्चोळे रस्ते
जिल्हयाचे ठिकाण तिथे,
लस्सी, खव्याची रेलचेल असते
ओळखा पाहू ?
कोल्हापूर
कोल्हापूर
सातारा
सातारा
अहमदनगर
अहमदनगर
येस नगर असणार!
येस नगर असणार!
नगरच वाटतंय. बस्ता फेमस
नगरच वाटतंय. बस्ता फेमस तिथला. चिंचोळे रस्ते, अरुंद गल्ल्या हे बघितलं आहे. लस्सी प्यायची राहिली मात्र.
उत्तर नगरच आहे, द्या पुढचा
उत्तर नगरच आहे, द्या पुढचा क्लू
मी देऊ का?
मी देऊ का?
भारताच्या पूर्वेला असलेल्या एका देशाचा राजा महाराष्ट्रातल्या या शहरात बंदिवासात होता.
ज्याच्या नावातच गाव आहे अश्या
ज्याच्या नावातच गाव आहे अश्या एका दिग्गज क्रिकेटपटूचे हे गाव!
ज्याच्या नावातच गाव आहे अश्या एका प्रसिद्ध कवीचेही हे जन्मगाव!
ज्याच्या नावातच गाव आहे अश्या
.
रत्नागिरी.... थीबा राजा.....
रत्नागिरी.... थीबा राजा..... म्हणून थीबा पॅलेस.
सिंधुदुर्ग मध्ये आहे एवढंच
सिंधुदुर्ग मध्ये आहे एवढंच माहितेय
गावस्कर का, वेंगुर्ला आहे ना
गावस्कर का, वेंगुर्ला आहे ना त्याचं गाव.
अंजू, करेक्ट आहे वेंगुर्ला
अंजू, करेक्ट आहे वेंगुर्ला
'गाव'स्कर आणि पाड'गाव'कर यांचे गाव.
रत्नागिरी बरोबर.
रत्नागिरी बरोबर.
थँक्स स्वरूप, पाडगावकर मात्र
थँक्स स्वरूप, पाडगावकर मात्र लक्षात नाही आलं. पुढे तुम्हीच द्या कोणीतरी, माझी झोपायची वेळ आता.
इथे धान्याची मोप कोठारे
इथे धान्याची मोप कोठारे
अन रेल्वेचीही पूलबांधणी
काही धर्मिकांसाठी प्रार्थनास्थळ तर
आमच्या शेंडीचे आकर्षण सर्वांनाच !
इथे धान्याची मोप कोठारे
.
इथे धान्याची मोप कोठारे
.
मनमाड.
मनमाड.
Pages