ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - २ - महाराष्ट्रातील गावे

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 10:49

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.

उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी

उत्तर: सातारा

कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.

आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?

पहीला क्ल्यू आहे:

सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अकला ई देवी, शंकरराव कोल्हे आणि अकलूज किल्ला. पण शोधायला सगळ्यात श्रीमंत ग्रामपंचायत हेच उपयोगी पडलं.

होते कधी इथे पाहुणे पांडव आणि यवन
शिवरायांच्या पदस्पर्षाने झाली ही पावन
खेळते दारी हिच्या गंगा
पाठी असती सह्याद्रीच्या रांगा.
असूनी जगाचे ज्ञान घरी तरीही असे हिचे छोटे नाव
होते का पूर्वी हे कोहलीचे गाव? Happy

नाही

वाई?

वाई

वाई बरोब्बर स्वरूप आणि जिद्द.
शिवप्रभूंच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या विराटनगरीत वाई नगरपालिका तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. Happy
अशी आमच्या वाईत पाटी होती. Happy

या गावाच्या नावात एक पूर्ण आकडा आहे आणि एका प्राण्यामुळे या गावाला सर्वदूर प्रसिद्धी लाभली आहे!

Pages