सरलं ते आयुष्य

Submitted by यतीन on 16 August, 2019 - 08:23

सरलं ते आयुष्य उरल्या त्या आठवणी
अवघड वळणातील ही जीवन कहाणी।

निशब्द करून जाते मजला ह्या ठेवी
कहाणी उजळताना येते डोळ्यातून पाणी।।
कळी उमलताना हि कोमेजून गेली
फुले बहरताना वास विसरून गेली
फांदीला नाही कळले फुल कधी गळले
झाडही उन्मळून पडले न जिरता पाणी।
कहाणी उजळताना येते डोळ्यातून पाणी।।

चिमुकल्या बोटांचा एक हात रिता झाला
वादळा च्या गर्गेत आजीने तो सावरला
दुडू दुडू धावू लागले पाया आली ताकद
बडबड गीते गाता होऊ लागली उजळणी
कहाणी उजळताना येते डोळ्यातून पाणी।।

तारूण्यपण फुलपाखरू सारखे ऊडू लागले
प्रेमात चार पावले पुढे दोन पाठी पडू लागले
आण घेऊन टाकु लागले एक एक पुढे पाऊल
विडा उचलून घालू लागले आकाशा गवसणी
कहाणी उजळताना येते डोळ्यातून पाणी।।

संवगडी चार मिळताच उडू लागले पाखरू
सावली शोधत उडत राहीले ते भीरूभीरू
वादळ आले फिरून घेण्यासाठी हिरावून
घात केला त्या विधात्याने एक पंख छाटूनी
कहाणी उजळताना येते डोळ्यातून पाणी।।

मन भिरभरले वाट घराकडची शोधू लागले
एक स्वपंवत सुंदरी ने हातांना अवचित धरले
पर येता उडे आकाशी पाय न टेके धरणीला
भरारी घेत घेत बांधल्या नवनवीन कमानी
कहाणी उजळताना येते डोळ्यातून पाणी।।

सुख समाधानाने हिरवळ बहरली
माहेरवाशीण आता फुलु लागली
एक एक धागा दोरा विणू लागली
म्हणे बाळकृष्ण देई घरा वंशदीप लावूनी
कहाणी उजळताना येते डोळ्यातून पाणी।।

पारडे फिरले घिरट्या घालू लागले गिधाड
जाऊ कुठे कसे आहेत वाटा सगळ्या घिसाड
या वळणावरती बळकट होता हात पाठशी
न डगमगता पुढे साथ देई ते माझे स्वामी
कहाणी उजळताना येते डोळ्यातून पाणी।।

आधार तुटे परी झाड उभे राहिले पाय रोवून।
संगतीने होती परी हातात हात घट्ट धरून।।
सुकलेल्या पानांना कळ्यांना बहर तो आला।
उरलेल्या आयुष्यात आहे ती माझी रातराणी।।
कहाणी उजळताना येते डोळ्यातून पाणी।।

प्रंपच्या मोहात आथ्रे आधिक आयुष्य सरले
आठवणीना उजाळा देता खारे पाणी आले
भानी न आले फुल होऊन कधी कोमेजून गेले
उरल्या त्या काटक्या विस्तवाची वाट पहात
मन मोकळे झाले आता वाटे जावे असमानी
कहाणी उजळताना येते डोळ्यातून पाणी।।

यश
यतीन कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुरा+११११
अप्रतिम कविता..आवडली.

(स्वपंवत - स्वप्नवत,
आथ्रे - अर्धे,
प्रपंच्या - प्रपंच्याच्या)

मधुरा ताई
वरील कविता मझ्या जीवनावरील आहे