वाट...(दिप्ती)
जुन्याच एका वाटेवर
वाट चुकले होते मी
आज पुन्हा मी
त्याच वळणावर
नवी वाट शोधत आहे मी
भांबावलेली आहे मी
गोंधळले हि आहे मी
वाट पुन्हा पुन्हा शोधून
दमले आहे मी
अशी कशी मी हि वेडी
इतकी कशी मी बावरलेली
वाट स्पष्ट समोर असुनही
वाट शोधत भटकणारी मी
वाट हरवली आहे म्हणून
जीवनात माझ्या
निराशेचा हा काळोख
देईल का मज करुन कोणी
माझ्या नव्या वाटेची ओळख
अखेरीस कुणीतरी
हाक मजला दिली
हिच आहे ती वाट तुझी
अशी खात्री मजला दिली
ती हाक ऐकून
धीर आता मजला आला
हाक देणारा आवाज
मला आता ओळखीचा वाटला
उमजले मजला नंतर
हि हाक तर आहे
माझ्याच अंर्तमनाची
त्यानेच तर शोधली आहे
वाट माझ्या नव्या प्रवासाची
पुन्हा जुन्या त्या वळणावर
मी मला नव्याने भेटले
माझी मी मलाच आता
नव्याने ओळखू लागले
एकदा वाटले माझे मलाच,
हा तर आहे परतीचा प्रवास
तेव्हा अंर्तमनाने दिला आवाज
हा तर आहे
तुझ्या आयुष्याचा
नव्याने घडणारा प्रवास!
(Dipti Bhagat)
सुरेख! छान लिहिलंय
सुरेख!
छान लिहिलंय
छान लिहिलंय ! पुलेशु.
छान लिहिलंय !
पुलेशु.
धन्यवाद!
धन्यवाद!
छान आहे कविता
छान आहे कविता
राजेंद्रजी, खुप खुप धन्यवाद!
राजेंद्र, प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
छान लिहिलंय !
छान लिहिलंय !
वाट..........
आहे मी तुझी साथीदार
वाटेत वाट दाखवणारी
तुझ्या सवे आनंदाने
सहगमन मी एकटीच करणारी
अशी तुझी वाट..........
यश
मस्त
मस्त
Chan
Chan
Chan
Chan
मस्त
मस्त
यतीन, तुमची चारोळी सुंदरच!
यतीन, तुमची चारोळी सुंदरच! आणि प्रतिसादासाठी धन्यवाद!
अक्की, उर्मिला, नीस्तुश प्रतिसादासाठी धन्यवाद!
धन्यवाद मन्या
धन्यवाद
मन्या
आवडली.
आवडली.
खुप खुप धन्यवाद सुपु!!
खुप खुप धन्यवाद सुपु!!
वाह! छान आहे कल्पना.
वाह! छान आहे कल्पना.
सामो प्रतिसादासाठी खुप खुप
सामो प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!