IT return बद्दल माहिती हवी आहे

Submitted by अविका on 30 July, 2018 - 07:31

मला जरा IT return बद्दल माहिती हवी आहे.

१ - उद्याची शेवटची तारीख वाढवुन ३१ ऑगस्ट केली आहे असे ऐकले , ते खरे आहे का ???

२ - माझ्या मित्राचा TDS कापताना, त्याने कंपनीत रेन्ट रिसित दिला नाही तर जास्त कापला गेलाय, मग त्याचा रिफंड कसा मिळु शकतो, कारण रेन्ट फॉर्म १६ मधे कण्सिडर केले नाहीये

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पेक्युलेटिव्ह ट्रेड करणाऱ्यांना बुक्स मेंटेन करणं आणि ऑडिट करणं आवश्यक आहे. पण ते करोडोत. अशी माहिती मिळाली.
ज्यांचा मेन सोर्स ऑफ इनकम तो नाही, त्यांना नसावं.

Submitted by Mmmmm on 16 August, 2019 - 10:26 >>>>
मी गेली दोन वर्षे Income Tax site वर login करूनच ITR1 भरतोय. फॉर्म १६ किंवा इतर काहीही अपलोड करावे लागत नाही. Everification साठी मी आधार बेस्ड ओटीपी वापरतो. E verification त्वरीत होते.

जर trading आपण business activity दाखवत असू तरच Audit चा प्रश्न येईल. काही मर्यादेच्या वर (बहुतेक एक करोड) उलाढाल असेल तर business activity दाखवणे आवश्यक आहे.
त्यांनतरही Audit बद्दल एक नियम आहे, एकंदरीत business करता. जर तुमची उलाढाल २ करोडच्या आत असेल आणि नफा किमान ६% असेल तर Audit ची गरज नाही. (जर काही व्यवहार रोख रकमेत असतील तर किमान नफा ८%, पण ट्रेडिंग मध्ये रोख रकमेचा प्रश्नच नाही.).
थोडक्यात उलाढाल एक करोड(?) पेक्षा कमी असेल तेव्हा
आणि १ तर २ करोड असेल पण नफा ६% च्या वर असेल तर Audit ची गरज नाही.
हे मी कुठे वाचलेले आणि त्यावरून दोन CA सोबत झालेले बोलणे यावरून लिहीत आहे, आपल्या CA कडून खात्री करून घ्यावी.

<<< हे ८% कुठून आले? >>

८ टक्के टॅक्स नसून [एकूण खरेदीची रक्कम + एकूण विक्रीची रक्कम] याच्या ८% नफा धरला जातो आणि त्यावर रेग्युलर कर लागतो.

जर उलाढाल बिझिनेसच्या मर्यादेत येत असेल आणि तुम्ही बुक्स मेंटेन केले नसतील तर असे असावे असे मला वाटते. कारण हा नियम एकंदरीत बिझिनेसला लागु आहे.
आणि त्यात रोख रकमेचे व्यवहार अजिबात नसतील तर ८% ऐवजी ६%.

Audit – You need to keep a close record of all your trades and accounts. If your turnover exceeds Rs 2 crore a year, or if your profit is less than 8% of your turnover, you could well be audited.
८% प्रॉफिट ग्रुहित धरून त्यावर tax असं अजूनही दिसलं नाही.
तसंच लॉस असेल तरीही कर हेही नाही.

<< ८% प्रॉफिट ग्रुहित धरून त्यावर tax असं अजूनही दिसलं नाही. तसंच लॉस असेल तरीही कर हेही नाही. >>

That is one option. Second option is get the accounts audited and carry forward the lass for four years to be adjusted only against Speculation Gains only.

Problem is the heavy cost of audit and one you go in heavy loss, you generally do not try spculation. The CAs suggest paying tax.

https://www.incometaxindia.gov.in/Tutorials/13.%20Tax%20on%20presumptive...

प्रिझंप्टिव्ह इन्कम स्कीम डॉक्टर, वकील,इंजिनीयर, इंटिरियर डिझायनर इत्यादी व्यावसायिकांसाठी आहे, असं इथे म्ह्टलंय.
यात डे ट्रेडिंगचा उल्लेख दिसला नाही. आणि डे ट्रेडर हा या लोकांसार खी कोणाला प्रोफेशनल सर्व्हिस देत नाही.
कायद्यातला संबंधित भाग
https://www.incometaxindia.gov.in/pages/acts/income-tax-act.aspx?key=44AD

ऑनलाइन डे ट्रेडिंगचे रेकॉर्ड सहज उपलब्ध असतात. किती नफा नुकसान झालं हे सहज पाहता येतं, मग तिथे प्रिझम्टिव्ह प्रॉफिट कशाला लागेल?

मी गेली दोन वर्षे Income Tax site वर login करूनच ITR1 भरतोय. फॉर्म १६ किंवा इतर काहीही अपलोड करावे लागत नाही. Everification साठी मी आधार बेस्ड ओटीपी वापरतो. E verification त्वरीत होते.>>> मानव, मग यावर काही query येते का किंवा समजा काही रिफन्ड यायची असेल तर येते का

क्वेरी तसे काही कारण असेल / चूक झाली असेल तरच येते.
रिफन्ड असेल तर तो मिळतो, त्याचे इंटिमेशन ITR file केल्यावर दोन तीन आठवड्यात येते.
माझा गेल्यावेळी बराच मोठा रिफन्ड होता, तो सप्टेंबर मध्ये त्यावरील व्याजासकट सरळ माझ्या खात्यात जमा झाला.
यंदा पण थोडा रिफन्ड आहे, त्याचे इंटिमेशन केव्हाच आलेय पुढल्या महिन्यात जमा होईल.

भरत Presumptive tax हा पर्याय आहे, सक्ती नाही हे मी सीए कडून कन्फर्म केले. आणि तुम्ही लिहिल्याप्रमाणे तो ही म्हणाला की शेअर ट्रेडिंग मध्ये बुक किपिंगचा प्रश्नच नाही, तुमच्या ब्रोकर कडूनच फ्रॉफिट लॉस स्टेटमेन्ट मिळते तेवढे पुरेसे आहे, तेव्हा तोटा असो की कमी नफा असो कशाला presumptive tax भरायचा?.

हो मानव.
पण शरद यांनी इतक्यांदा आणि इतक्या छातीठोकपणे ते सांगितलंय. मला त्यांच्याकडून ऐकायचंय.

इन्कम टॆक्स भरुन प्रामाणीक करदाता अशी मिरवायची इच्छा माझी अपुरीच राहिली. आता तर शक्यताच नाही.

एका मित्राला अचानक धनलाभ टाईप्स जुन्या व्यवहारातून पैसे मिळाले आहेत आणि त्याला आता त्यावर पडणार्‍या टॅक्सचे टेंशन आले आहे.. त्याचबरोबर त्याला धनलाभ रकमेच्या ५०% किंमती ईतका स्टॉकमार्केट लॉस आहे. त्याला स्टॉक्स विकायचे नाहीयेत कारण त्याची खात्री आहेत की ते सहा आठ महिन्यात पुन्हा वर जाणार आहेत. मी त्याला म्युचुअल फंडाचे अ‍ॅसेट मॅनेजर्स जसे फिस्कल ईयर एंडला विंडो ड्रेसिंग करतात तसे करण्याचा सल्ला दिला ( विंडो ड्रेसिंग - लाँग टर्म ईन्वेस्टमेंट मध्ये पडलेले स्टॉक्स विकून लॉस क्लेम करायचा आणि दोन महिन्यांनी तेच स्टॉक साधारण त्याच किंमतीत पुन्हा घ्यायचे) .
ह्या स्ट्रॅटेजीमध्ये ईन्कम कॉन्स्टंट असेल तर फार काही फरक पडत नाही कारण पुढच्या फिस्कल ईयरमध्ये स्टॉक वरती जातील कमी किंमतीत विकत घेतल्याने कॉस्ट बेसिस कमी असेल व प्रॉफिट जास्त. मग पुन्हा वाढीव टॅक्स भरावा लागेल. ही फक्त आजचा टॅक्स पुढच्या वर्षावर ढकलण्याची युक्ती आहे. टॅक्स अवॉयडन्स वगैरे काही होत नाही.
पण धनलाबाच्या एक्स्ट्रा ईन्कम मुळे टॅक्स ब्रॅकेट चेंज होत असेल तर मात्र लॉस दाखवून त्या एक्स्ट्रा ईन्कमवरचा टॅक्स वाचवू शकतो.
मला भारतातले विंडो ड्रेसिंगबाबतचे नियम पक्के माहित नाहीत तर कोणाला काही अंदाज आहे का ह्याबाबतीत?

मी गेली दोन वर्षे Income Tax site वर login करूनच ITR1 भरतोय. फॉर्म १६ किंवा इतर काहीही अपलोड करावे लागत नाही. Everification साठी मी आधार बेस्ड ओटीपी वापरतो. E verification त्वरीत होते.

Submitted by मानव पृथ्वीकर on 17 August, 2019 - 14:49 >>> मानव धन्स
आज केल मी, मुख्य म्हणजे नेटबँकींग वरुन लॉगीन केल्याने E verification साठी OTP ची गरज नाही पडली, लगेच झाले.

आता स्टेटस successfully e-verified असे आहे, मग अजुन काही करायची गरज नाहीयेना?

अजून काही करायची गरज नाही.
आयकर विभाग तुमचा रिटर्न तपासेल आणि जर तुमचा रिफन्ड असेल किंवा तुम्ही भरलेला कर कमी पडला आणि अजून भरायचा असेल तर त्यांच्या कडून इंटिमेशन इमेल येईल. दोन्ही नसेल तर काहीच येणार नाही.

आज टॅक्स फाईल करताना एक डिक्लेरेशन विचारले - आर यु फिलींग अंडर सेक्शन १३९ - १.

हे नेमके काय आहे. माझे जर सॅलरी सोडुन ईतर कुठलेच ईन्कम नसेल तर नो सिलेक्ट करावे की येस?

Pages