Submitted by डी मृणालिनी on 11 August, 2019 - 05:11
मी नाही कोणी कवयित्री
नाही कोणी लेखिका
तरी मनातल्या शब्दांची
होऊन जाते कविता
न जाणो कधी माझ्या
हातात कलम येतो
कोऱ्या करकरीत कागदावर
हळुवार स्पर्श करतो
स्पर्शांनी उमटलेल्या या शब्दांना
न जाणो कोण सूर ताल देतो
पूर्ण झालेली कविता
माझ्याकडून म्हणवून घेतो
माझी कविता म्हणजे
बालिशपणाचा उद्रेक
माझी कविता
मलाच वाटते सुरेख
तुम्ही म्हणाल माझ्या कवितेचे
मीच कौतुक करते
पण न जाणो हे माझ्याकडून
कोण करवून घेते
कोण आहे , कोण आहे तो
जो मनातल्या शब्दांची कविता करतो
कोण आहे तो
जो माझ्या कवितेला रूप देतो
शोधतेय , शोधतेय मी त्याला
तुम्ही पण शोधा
भेटल्यावर मात्र
नक्की मला कळवा ....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वेड्या कविचं भूत आहे ते. मला
वेड्या कविचं भूत आहे ते. मला भेटलं म्हणून तुम्हाला सांगितलं.
अलगद सापडलेल्या मनातल्या
अलगद सापडलेल्या मनातल्या शब्दखुणा आहेत त्या.
कविता आवडली
धन्यवाद ....
धन्यवाद ....
सुंदर मनोगात आहे
सुंदर मनोगात आहे
एकंदरीत स्वतःचा मागोवा
मनोगात वाचून चणियाची आठवण आली
मनोगात वाचून चणियाची आठवण आली
सुंदर! अप्रतिम..
सुंदर! अप्रतिम..
कोण आहे तो?
तुझ्या मनीचा
चंद्रमा तो..
तुझ्या भावनांच्या
भरती-ओहोटीचे
कारण तो!
तुझ्या लेखणीचा
तुझा व्यक्त-अव्यक्त
शब्दांचा नाजुक
अतूट बंध आहे तो!
कविता एकदा अंगात घुसली आपण
कविता एकदा अंगात घुसली आपण कुठेही सुरु होतो नाही का.
आपण?? तिला उत्तर मी दिलंय..
@अक्की
आपण?? तिला उत्तर मी दिलंय..
तु कधी तिला उत्तर दिलंय चारोळीतुन?? आपण म्हणायला?
हो.
हो.