व्यभिचारी आणि महामुर्ख

Submitted by नीत्सुश on 13 August, 2019 - 04:48

गाढ आणि अबाधित विश्वासाला
कधीतरी तडा जातो पण प्रेमापोटी
तो विश्वासघात माफ़ केला जातो
त्याच विश्वसाला जपुन साम्भाळून
पुन्हा चुचकारुन गाडे रुळावर येते

गाडे रुळावर आले असे वाटत असतानाच
ठण्ण...............................................
तुमच्या विश्वासावर दुसरा, तिसरा, चौथा असे अनेकानेक
आघात सहन करुन तुमच्या उरल्या सुरल्या प्रेमाला कवटाळत
जेव्हा तुम्ही जगत राहता -

त्या विश्वासघातकी अन व्यभिचारी
हो व्यभिचारच कारण तो फ़क्त
शारिरिक नव्हे तर मानसिकही असतो..
तर त्या व्यक्तीला पुन्हा क्शमा करता
तेव्हा तुम्ही असता सन्त किन्वा एक महामुर्ख ..

Group content visibility: 
Use group defaults

छान कविता आहे.

पण संत किंवा महामुर्ख असण्यापेक्षा माणूस कधीकधी परिस्थितीवशही असतो.

सगळीच माणसे संत किंवा महामुर्ख नसतात. चुकतो तो माणूस. माफ करण्याची चूक करणाराही माणूसच. अप्रत्यक्षपणे व्यभिचार करायला भागही पाडले जाते कित्येकदा.

छान.

शायद उनका आखरी हो ये सितम
हर सितम ये सोचकर हम सह गये

हम वफा करके भी तनहा रहे गये
दिलके अर्मा आसुओ मे बह गये

एकमेकाला जखडून ठेवून पाळत ठेऊन जगणे म्हणजे प्रेम नव्हे. काही बेअकली पूर्वजांनी निसर्गतत्वाच्या विरोधात जाऊन लग्नसंस्था नावाचा अनैसर्गिक प्रकार जन्माला घातला. मालकीहक्क जोप्सले गेले. वैवाहिक बंधनाच्या गोंडस नावाखाली बलात्काराची सोय केली गेली. प्रेमाला नियमात बांधले. ते नियम मोडेल त्याला/तिला पद्धतशीरपणे व्यभिचारी, कुलटा, छीXल रांX वगैरे हिणवले गेले. कशासाठी हा अट्टाहास? अरे आत्मपरीक्षण करा कि का ती व्यक्ती अशी वागते. आणि नसेल त्याचे/तिचे प्रेम तुमच्यावर तर द्या न सोडून. निसर्गाला नियमात बांधून ठेवता येत नाही.

मग माकडातल्या हुप्यासारखं झालं तर ? माणसाने समानता असावी व प्रत्येकाला कुटूंबाचे, मुलाबाळांचे सुख मिळावे म्हणून लग्नसंस्था तयार केली. फक्त कामवासनेच्या शमनासाठी नाही असे मला वाटते. घटस्फोट सहज असावा अमेरिकेसारखा वगैरे हे ठिक आहे.

मी ह्यात शारीरिक नव्हे तर मानसिक व्यभिचाराबद्दल लिहिले आहे ज्यात आपल्या जोडीदाराला (फक्त नवरा बायकोचं नातंच नाही तर कोणत्याही दोन व्यक्ती )ज्यांचं एकमेकांवर प्रेम आणि विश्वास आहे पण त्यातील एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून काहितरी लपवत राहते किंवा खोटं बोलते, दिलेलं वचन मोडते किंवा पाळत नाही.
बहुतेक आता कवितेची कन्सेप्ट clear होईल.

> मालकीहक्क जोप्सले गेले. वैवाहिक बंधनाच्या गोंडस नावाखाली बलात्काराची सोय केली गेली. प्रेमाला नियमात बांधले. > परिचित, हे पाहिलं का? लग्नातर्गत बलात्कार हा गुन्हा नसणे याबद्दल मीदेखील वेळोवेळी लिहलं आहे. त्याकडे कानाडोळा करून पद्धतशीतपणे मुलींना 'घडवणं' चालू असतं. कधी गोडगुलाबी प्रेमकथा असतात, कधी होममेकर हादेखील कसा जॉबच आहे याचं प्रमोशन & मार्केटींग चालू असत. हे बालपणापासून डोक्यात भिनवत गेलं की मग मग ती बाई केवळ समाजमान्य रखेलच असते हे कोणाच्या लक्षात येत नाही, रादर तिचं कौतुक केलं पाहिजे हाच स्त्रीवाद म्हणून सांगितला जातो....

ह्यावर उपाय अगदी सोपा आहे, बायकांनी स्त्री सत्ताक आणावी, कमी शिकलेला , बिनपगारी नवरा घरजावई करून स्वतःच्या घरी न्यावा, त्याला घर मूल देऊन स्वतः करियर करत फिरावे , त्याचे नाव बदलावे , गजानन माधुरी दीक्षित , असे त्याचे नाव ठेवावे,

शिकल्या बायकांची अवस्था मोदी सरकार सारखी झाली आहे, काँग्रेसने 60 साल से , तसे ह्यांचे, पुरुषांनी हजार वर्षे अमके केले , तमके केले.... रडगांणे संपत नाही.
आता शिक्षण , नोकरी आहे हातात तर स्रीसत्ताक आणा.

स्वतःच्या बापाच्या दारात मोर होऊन नाचायचे, म्हणजे पुरुषांनी सत्ता गाजवली,हा विषयच समाप्त होतो, पुरुषांना घरजावई करून अंगणात न्यायचे, दारात बाभळीचे झाड लावायला सांगायचे , रोज पुरुष तुमच्या दारात गाणी म्हणतील

मैं बबूल तेरे आंगन का

Black cat भाई मी म्हणतो स्रियांनी लग्नच करू नये. मला नवरा नको गं बाई... असं गाणं गात मस्त एकटीने जगावं. लैच झाले तर एखादा दुसरा ठेवून घ्यावा कराराने. करार मोडला की आउट. कशाला मेला पुरुष जातीचा जाच सहन करायचा.

<<<< ह्यावर उपाय अगदी सोपा आहे, बायकांनी स्त्री सत्ताक आणावी, कमी शिकलेला , बिनपगारी नवरा घरजावई करून स्वतःच्या घरी न्यावा, त्याला घर मूल देऊन स्वतः करियर करत फिरावे , त्याचे नाव बदलावे >>>>
BLACKCAT प्रतिसाद आवडला

अर्थातच रडु बाई ग्रुपला तो पेलणारा नाहीये कारण सुस्पष्ट आणि परखड वास्तव्य अश्या बोलबच्चनगिरी स्त्रीमुक्तिवाल्याना प्रत्यक्षात वावरताना झेपणारे नसते

Black Cat's प्रतिसाद>>>>> Lol

७० वर्षांत नावे तर कैक लोकांनी ठेवली. पण मोदी सरकारने उत्तम कामगिरी देखील करून दाखवली. त्यामुळे तो मुद्दा सोडून बाकी मुद्द्याशी सहमत.

जोडीदाराने व्यभिचार केला तर त्याबद्दल कसं react ववहायचं याबद्दलचे सामाजिक संकेत असं करणारा जोडीदार पुरुस आहे की स्त्री यावर ठरतात . अर्गथ चित्ररपटातला शेवटचा संवाद आठवा. आतापर्यंत कायदाही दोघांना एकसमान नव्हता.
जे व्यभिचाराबद्दल तेच कवितेत अभिप्रेत असलेल्या इतर विश्वासघाताबद्दल.
कवितेत व्यभिचार हा शब्द खूप स्वस्त करून टाकलाय असं वाटलं.