दत्त धावतो गर्दीत

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 15 August, 2019 - 09:49

दत्त धावतो गर्दीत
दत्त दिसतो वर्दीत
दत्त उगाच गुर्मीत
जाब मागे

दत्त घुसतो डब्यात
दत्त राही लटकत
दत्त चाले ढकलत
दाराकडे

दत्त सिग्नली धावतो
दत्त भिक्षेकरी होतो
दत्त दत्ता धुत्कारतो
गूढ मोठे

दत्त दप्तरी दाखल
दत्त वाहतोय माल
दत्त हप्त्याचा दलाल
रोज ठाम

दत्त दत्ताला ओळखी
दत्त दत्ताला नाकारी
दत्त दत्ताची चाकरी
करू जाणे

दत्त विक्रांत मनात
दत्त व्यापून जगात
दत्त सागर थेंबात
सामावला

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दत्त जाणून घ्यावया
दत्त लिहितो गहन
दत्त सामावेना त्यात
दत्त स्विकारीतो मौन

दत्त दत्त श्री दत्त दत्त _____/\_____

आवडली..

दत्त नामाचे
मना लागे छंद
भक्तीरसात मन
होई बेधुंद

शशांक .>> वाह
मिनल राजु >>धन्यवाद
मन्या >>छान

पाहतो जिथे ----- दिसता तुम्ही...
बघतो जिथे------ असता तुम्ही...
किती आनंद वाटे जीवा
जेव्हा माझ्या सोबत
दत्त राया असता तुम्ही...

सुपु
नीत्सुश
धन्यवाद

यतीन >>>जेव्हा माझ्या सोबत
दत्त राया असता तुम्ही...

हो न ? धन्यवाद