वाट पाहते मरणाची

Submitted by यतीन on 17 August, 2019 - 02:41

मरणासाठी रजले की माझे मी सरण।
यमदूत थबकला बाघता माझे मरण।।

विस्तवाच्या दाह लागल्या माझ्या सरणा।।
श्वासास सांगितले थांबव जीवन यातना।।

माझी जीवनधारा बघता “निती” हि बिथरली।
सावली तर चार पाऊलेच मागे थबकली।।

विट विट बांधता संसाराची ऊभी केली भिंत।
मझल दरमझल केली न चुकता एकहि इंज।।

वाटेत काचखळ्यांनी केली माझी पुरती परवड।
परी म्यान असता तलवार केले सगळ्यांना बिमोड।

दमेल थकले मी अता करता संसार।
श्वासचा ही नाही पेलवत आता भार।।

अग्नीला नमन करते जवळ कर मजला।
हवेत विरून जाऊदे आता या देहाला।।

राम राम घेता मझला निरोप आता द्यावा
विसरून सारे काही आठवणीची ठेव ठेवा।।

वाटेत वाट पाहतो तो ऊभा माझा सखा।।
धुगधुगी ह्रदयाची माझ्या आता थांबवा।
आयुष्याची भरभक्कम दोरी आता तोडवा ।
मुक्त करा पुनरजन्माची आस नाही या जीवा।।

यश
यतीन कुलकर्णी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुमची कविता सुंदरच.मला तुमची कविता वाचता सुचलेल्या काही पंक्ती! Happy

शरीर असे
फक्त एक साधन
हे जीवन जगण्याचे;
इथे स्वतःलाच
शोधावे लागते रोज
नवे बळ जगण्याचे!

काळ कोणास
आहे चुकला;
जीवन असे हे
चार घडींचे
कर यत्न तु ते
मनसोक्त जगण्याचे!

धन्यवाद......
नीत्सुश
मी नक्कीच बदल करतो