आकाशवाणी ऑनलाइन

Submitted by Mandar Katre on 14 August, 2019 - 14:09

९० वर्षाहून अधिक काळ सेवेत असलेली आणि भारतात सर्वदूर पसरलेली व सर्वप्रकारच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची गंगोत्री असलेली जगातील सर्वात मोठी प्रसारण सेवा असलेली तुमची आमची आवडती आकाशवाणी आता कात टाकतेय . प्रमुख शहरातील आकाशवाणी केन्द्रे सात-आठ वर्षापासूनच ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस वर उपलब्ध होती परन्तु आता काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते अरुणाचल प्रदेश यत्र तत्र सर्वत्र असणारी आकाशवाणीची प्रादेशिक केन्द्रेही ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस वर उपलब्ध होत आहेत .

यात महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबई अ , ब , विविधभारती , एफ एम रेन्बो , एफ एम गोल्ड , न्यूज सर्व्हिस यासह रत्नागिरी ,कोल्झापूर , पुणे , सांगली , सोलापूर , नागपूर ,गोवा व इतर अनेक प्रादेशिक केन्द्रे आता ऑनलाइन उपलब्ध आहेत . जगभरात कुठेही प्रसारभारती अ‍ॅप अथवा वेबसाईटच्या माध्यमातून ही सेवा ऐकता येइल ...

http://prasarbharati.gov.in/playersource.php?channel=165
https://play.google.com/store/apps/details?id=com.ionicframework.air152951
https://apps.apple.com/in/app/all-india-radio-live/id1289849764
https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews
https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एक app घेतलय. पण त्यात मुंबई अ,ब केंद्र लागत नाहीत। एफेम लागतात, स्पीकर आहे, रेकॉर्डिंग आहे.
All Indian Radios HD Recorder ( by Permsoft Inc.)

All india radio अँप वर विविध भारती, एफएम गोल्ड व रेनबो व इतर सर्व भाषिक वाहिन्या आहेत. त्यातल्या रेडिओ उर्दू वर सकाळी 8 ते 10 व संध्याकाळी 6 ते 8 फर्माईशी कार्यक्रम असतो, ज्यात नेहमी मेजबान जोडगोळी असते. हे दोन्ही कार्यक्रम खूप मस्त आहेत, मी सहसा चुकवत नाही.

वर दिलेल्या यादीतले दुसरे.

धन्यवाद

अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे

खूप धन्यवाद मंदार जी.
मला आम्रविकेत ऐकता येइल आता आकाशवाणी गावचा रेडियो

All Hindi Radios HD हे सुद्धा by Permsoft Inc. याच कंपनीचं आहे. दणकून लागतं. एमपी ३ रेकॉर्डिंग, शेअरींग आहेच.

माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. धाग्यात दिलेले NewsOnAir PrasarBharati Official app AIR News+Live हे अ‍ॅप पूर्वीच इंस्टाल केले होते पण तेंव्हा ते बरेच सदोष होते. आज पुन्हा रन करून पाहिले. सुधारणा केल्या आहेत अनेक केंद्रे पण आली आहेत. मस्त वाटले. अनेक केंद्रे अजूनही उपलब्ध नाहीत. आकाशवाणी सांगली आहे पण आवाज येत नाही.

All Indian Radios HD Recorder ( by Permsoft Inc.) हेच बेस्ट. सांगली लागतं.

या धाग्याबद्दल खूप खूप धन्यवाद! प्रसारभारतीवरून मला आता वेगवेगळ्या स्टेशन्सवर मस्त मराठी गाणी ऐकता येतात. मज्जा येते आहे.