मेलेल्या बकरीला

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 12 August, 2019 - 13:43

मेलेल्या बकऱ्याला
****************

मेलेल्या बकरीला
नाव नसते गाव नसते
घर नसते दार नसते
प्रत्येक बकरा असतो
प्रथिनाचा ढीग
चविष्ट रुचकर
भूक वाढवणारा
चव जागवणारा

त्याचे हुंदडणे बागडणे
दुध पिणे चरणे
शिंग खाजवणे
सहज पुसून टाकता येते
विस्मृतीच्या फडक्याने
एका क्षणात

मालकाला धन मिळते
कसायाला फायदा
खाणाऱ्याला सुख ..

जन्मलेल्या प्रत्येक जीवाला
मृत्यू हा असतोच
असा नाहीतर तसा
त्याच्या देहाचे जन्माचे
सार्थक झाले
चला पान खावून येवू यात !

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही पटले...
तुमच्या आधीच्या विचारांत आणि यात खूप तफावत आहे (diagonally opposite)