झरा

Submitted by नीत्सुश on 9 August, 2013 - 05:00

झरा

झुळझुळ झुळझुळ पाणी झऱ्याचे
वाहत जाते, कधी कड्यावरून कोसळते,
धावत जाते, नाचत जाते,
पिसारा तुषारांचा फुलवीत सागरा मिळ्ते..

त्याची ही ओढ अनामिक विसावते समुद्राच्या कुशीत
खाऱ्या पाण्यात मिसळते झऱ्याची गोडी अवीट
का हा रवि आग ओकतो, पाहून त्यांना मिठीत
काय झाले, कसे विलगले दोन प्रेमी शापीत

तप्त झाली सृष्टी सारी, पाण्याचीही झाली वाफ
वारा म्हणे थांब जरा, तुला घेऊन जातो खूप लांब
त्याच्यासवे वाफ, उंच उडत गेली रविला भेटायला
त्याला जाब विचारायला, त्याच्याशी खूप भांडायला

वर जाता जाता हवा झाली थंड, वारा झाला बेधुंद,
वाफेला भरली हुडहुडी, आकाशातली म्हातारी गडगडली,
वीजही कडकडली अन घाबरून वाफ डोंगराला धडकली
सृष्टीने घडवला चमत्कार, वाफ झरा होऊन पुन्हा झुळझुळली

झुळझुळ झुळझुळ पाणी झऱ्याचे पुन्हा धावले सागराकडे
सागरालाही आले उधाण, तो ही झेपावला किनाऱ्याकडे
पुनर्मिलन पाहून त्यांचे सृष्टी झाली हिरवीगार
झरा झाला सागरमय, स्वत्व हरवूनही आनंदमय..आनंदमय..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीत्सुश, कवितेचे शीर्षक झरा हवे ना? काव्यलेखन हा प्रकार आहे...

असो, कवितेच्या वरच संपादन लिंकवर जाऊन हा बदल करता येईल.

छान आहे.......
नदी दूरवर जाऊनही रंग बदलत नाही.........
आपल्या कवीते वरून मला पण चार ओळी सुचल्या.......

कधी खळखळत दर्या डोकंरा वरून वाहते
कधी शांत मंद झूळूझूळू करत वाहते
शब्द न बोलता बरेच काही बोलून जाते
जाता जाता कधी खळाळून हासून जाते