ती

Submitted by पुरंदरे शशांक on 30 July, 2019 - 23:45

ती

पानांवर अलगद थेंबी ती आरसपानी होते
.......ती अशीच उमटत जाते

कुसुमांच्या बहरातूनही काटेही पेरीत जाते
......ती अशीच वेडी असते

सुंदरता हाती धरुनी ओंगळास थारा देते
......ती सदा मनस्वी असते

सुंदरासुंदरापलिकडली व्यक्तता केवळ असते
....... ती कधीही कृत्रिम नसते

प्रिय स्पर्शाने अनामिक भावना मनी उमटते
....... ती अशीच बहरत जाते

जावळातून तान्हुल्याच्या ती गंधीत होत रहाते
.......ती अशीच शब्दी येते

भाकरीत दिसते कधी ती, भुई सारवताना येते
.....ती कविता अविरत असते

अव्यक्त सदैव असूनी व्यक्ताचे माध्यम होते
.....ती कविता असून नसते...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जावळातून तान्हुल्याच्या ती गंधीत होत रहाते
.......ती अशीच शब्दी येते

भाकरीत दिसते कधी ती, भुई सारवताना येते
.....ती कविता अविरत असते——————————वाह वा! अप्रतिम! खुप सुंदर! छानच!
__/\__

अप्रतिम!

ती कधी श्रावणसरी
बनुन बरसते,तर
कधी नयनांतील अश्रु
बनुन ओघळते,
लेखणीतुन झरत जाते,
तर मनाच्या कागदावर
अलगद टिपल्या जाते,
ती. ती कविता असते.
(आगाऊपणासाठी माफ करा. Happy )