छातीत दुखणे

Submitted by मनू on 12 March, 2013 - 04:50

माझ्या नवऱ्याला आधीपासून acidity चा त्रास आहे.

गेल्या सोमवार पासून त्याला छातीत भरल्या सारख होत, पकडून ठेवल्या सारख, आणि पाठीत चमक भरते किवा दुखायला लागत. तेव्हा family डॉक्टर ने ecg आणि bp चेक केला तर high bp होता आणि ecg मध्यही थोडा प्रोब्लेम होता.

नंतर 2d echo टेस्ट आणि स्ट्रेस टेस्ट केली, दोन्हीही नॉर्मल आल्या. आणि या दोन्ही टेस्ट च्या वेळी bp आणि ecg नॉर्मल आले.

ते lipid blood टेस्ट पण सांगणार होते पण हे रिपोर्ट नॉर्मल आले म्हणून नाही सांगितली.
मग त्यांनी ३ गोळ्या दिल्या आहेत त्या १ महिना घेऊन काही फरक पडतो का बघणार आहेत, पण अजूनही त्याचा त्रास बंद झाला नाहीये. मध्ये मध्ये होतच असतो.

तर हे कशामुळे होत असेल? acidity मूळे असेल का?
आणि या साठी जेवणावर काही पथ्य पाळण्याची गरज आहे का? किवा औषधांबरोबर काही घरगुती उपाय करता येतील का

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनु,

तुम्ही नवर्‍याचे वय लिहिलेले नाही.

जर अजुनही त्रास होत असेल तर विनाविलंब एखाद्या हार्ट स्पेशालिस्टला दाखवा. काहीही प्रॉब्लेम नाही असे तुम्हाला वाटत असले तरी ते ज्या सांगतील त्या टेस्ट्स करुन एकदा त्यांच्याकडुन "काही प्रॉब्लेम नाही" हे ऐकणे उत्तम.

शुभेच्छा.

विनायक तुमचा मेल मिळाला. thanx
मनस्मि नवऱ्याच वय ३२ वर्षे आहे.
डॉक्टर कडून टेस्ट तर करून घेतल्याच आहेत, आणि हा त्रास जर acidity मुळे असेल तर, acidity कमी करण्यासाठी, किवा जास्त वाढू नये यासाठी जेवणात काय पथ्य पाळावी लागतील या बद्दल माहिती हवी होती.

मनू,

तुम्हाला अधिक विस्तृत लिहावे लागेल बहुधा. पण जे वाचले त्यावरून जर अ‍ॅसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तरः

१. भरपूर चालणे

२. जेवणानंतर कमीतकमी अर्धा तास अपराईट पोझिशनमध्ये बसणे

३. व्हॅनिला आईसक्रीम न चुकता खाणे

४. चहा, कॉफी, सिगारेट, तिखट व गरम पदार्थ कमी करणे

५. जेल्युसिल लिक्विड दिवसातून तीन वेळा दोन चमचे असे घेणे

६. जमल्यास जिने चढणे

७. पुरेशी झोप घेणे

८. दही (थंड व गोड) एक वाटी खाणे

असे अनेक उपाय असून त्ये एकत्रीत केल्यास तर फारच उत्तम होते.

अनेकदा डायफ्रॅम (छाती व पोट यातील व्हॉल्व्ह) नादुरुस्त झाल्यानेही अ‍ॅसीडिटी वर येते असे ऐकले व अनुभवले आहे. त्यासाठी जेल्युसिल उत्तम! (व्यायाम मस्ट).

ही झाली सामान्य माणसाची सुचवणी. माबोवरील वैद्यकीय व्यावसायिकांशी थेट संपर्क साधा, हा सोपा उपाय.

Happy

लवकर बरे वाटो!

(मद्यपान करत असल्यास एका ड्रिंकच्या मागे कमीतकमी तीनशे मिलीलीटर पाणी पिणे व मूठभर काही ना काही खाणे आवश्यक)

डॉक्टरांनी असे सांगितले नाहीये, पण दोन्ही टेस्ट नॉर्मल आल्या त्यामुळे, हृदयाचा काही प्रोब्लेम असेल असा त्यांना वाटत नाहीये, त्यांनी सांगितलं १ महिना गोळ्या घेतल्यानंतर बघू.

आणि परवा १ दिवस त्याने सकाळी चहा घेतला नाही तर त्याचा हात नॉर्मल होता, आणि काल सकाळी चहा प्यायल्यावर थोड्या वेळाने परत हात भरल्या सारखा वाटायला लागला, म्हणून acidity मूळे होत असेल अस आम्हालाच असा वाटतंय. त्यामुळे आता थोडे दिवस चहा बंद करून बघणार आहोत.
सिगारेट तर ओढतच नाही कधीच. तिखट, तेलकट ही कमी केलंय आता. सकाळी walk ला जायला पण आजपासूनच सुरवात केली आहे.

रक्तवाहिनीत ब्लॉक्स असतात त्याची चेक करायची एक टेस्ट असते ती करून घ्या. अ‍ॅसिडीटी, घरगुती उपाय इत्यादीत वेळ वाया घालवू नका.

मनू, तज्ञ डॉ चा सल्ला घ्या लवकरात लवकर.
शंकानिरसन होउन जाइल.
मी स्वतः एकदा असाच त्रा झाल्यावर ईसीजी (तो नॉर्मल आहे म्हणून मग) २-डी एको करुन घेतलं.
डॉ नी नॉर्मल अस बोलल्यावरच मन शांत झालं.

मनु ,

तुम्ही डॉ कडे जाउन सल्ला घेत आहात ना ... मग इथे विचारुन गोधळ वाढवु नका ..... कुणी ही कसाही आपापल्या माहीती नुसार , अनुभवानुसार सल्ले देतील ... ते आपल्याला लागु असेलच असे नाही ......
कुणाला ही दुखवायाचा हेतु नाही पण डॉ चा स ल्ला आणी गरज असेल तर दुसर्या डॉ चा सल्ला हेच ठिक असते ......

झकासराव आणि अश्विनीमामी, मी वर लिहिले आहेच कि 2d echo टेस्ट आणि स्ट्रेस टेस्ट केली, दोन्हीही नॉर्मल आल्या. मला acidity वाढू न देण्यासाठी काय करता येईल ही माहिती हवी होती

मनू, माझा सल्ला असेल की एकदा चांगल्या कार्डिओलॉजिस्ट अथवा एमडी फिजिशिअनला अवश्य दाखवा. कारण फॅमिली डॉक्टरला एकदा बीपी आणि ईसीजीमधे प्रॉब्लेम आलाय असं तुम्ही लिहिलेलं आहे. नंतर टेस्ट नॉर्मल आल्या म्हणजे "सर्व काही नॉर्मल आहे" असं नसतं, तर टेस्टमधे प्रॉब्लेम पकडला गेला नाही असंदेखील असू शकतं! हे लक्षात घ्या.

पूर्ण चेकप करण्याचा आग्रह डॉक्टरांना धरा. नुसतं एक महिन्याने बघू वगैरेमुळे जर काही फायदा होत नसेल तर काय उपयोग?

चांगल्या डॉक्टरकडून "अ‍ॅसिडीटीमुळेच" असं होतंय का? हे व्यवस्थित विचारून घ्या. तुमच्या ज्या काही शंका असतील त्यांची उत्तरे डॉक्टरकडूनच मिळवा. शक्यतो डॉक्टरकडे जाताना एका कागदावर प्रकृतीच्या सर्व तक्रारी लिहून काढा, म्हणजे डॉक्टरला काहीही न विसरता सर्व व्यवस्थित रीत्या समजावता येऊ शकेल. हेल्थ डायरी मेंटेन करणे ही सर्वात चांगली सवय.

जर तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर द्यायला डॉक्टरकडे वेळ नसेल तर दुसरा डॉक्टर बघणे उत्तम.

माझा सल्ला असेल की एकदा चांगल्या कार्डिओलॉजिस्ट अथवा एमडी फिजिशिअनला अवश्य दाखवा. कारण फॅमिली डॉक्टरला एकदा बीपी आणि ईसीजीमधे प्रॉब्लेम आलाय असं तुम्ही लिहिलेलं आहे. नंतर टेस्ट नॉर्मल आल्या म्हणजे "सर्व काही नॉर्मल आहे" असं नसतं, तर टेस्टमधे प्रॉब्लेम पकडला गेला नाही असंदेखील असू शकतं! हे लक्षात घ्या>>> +१०००१.
अगदि मोलाचा सल्ला.

हाच मेसेज पोचवायचा होता पण नेमक्या शब्दात मांडता आलं नाही.
सेकन्ड ओपिनियन घ्याच ते ही चांगल्या कार्डिओलॉजिस्ट अथवा एमडी फिजिशिअनला भेटुन.

अर्थात डॉ स्ट्रेस टेस्ट मध्ये प्रोब्लेम सापडला नाही म्हणजे नॉर्मल असच म्हणतील.
त्याच्यापुढची एखादी चाचणी असेल ती करता येइल.

मनू, तुम्हाला घाबरवायचा माझा हेतू नाहीय पण गेल्याच आठवड्यात माझ्या ऑफिसातला ३२ वर्षांचा एक तरुण माझ्यासोबत एरोबिक्स करत असताना क्लासमध्ये कोसळला आणि दुस-या दिवशी गेला. तो कोसळला ते सिव्हीअर हार्ट अ‍ॅटॅक आल्यामुळे हे आम्हाला नंतर कळले. त्याची आधीची मेडिकल हिस्टरी पुर्णपणे क्लिअर होती, एरोबिक्स जस्ट गंमत म्हणुन सुरू केलेले आणि त्यातही तो जास्त धावपळ करत नव्हता. त्या दिवशी क्लासमध्ये आल्यापासुन आपला डावा खांदा दुखतोय याचा उल्लेख त्याने केला होता पण व्यायाम करताना दुखावला असेल असे मानुन त्याने आणि इतरांनीही तिकडे दुर्लक्ष केले होते.

नॉर्मल टेस्टमद्ये काहीही कळत नाही हे एका मोठ्या डॉक्टरांकडुन ऐकलेले. त्यामुळे तुम्ही साध्या टेस्टवर विसंबुन न राहता एका इसिजीमध्ये प्रॉब्लेम आलाय म्ह्जणजे काहीतरी गडबड असेल असे मानुन सेकंड ओपिनीयन घ्या.

stress test करून घेतली आहे का?
Generally, ecg/ekg मध्ये abnormality आढळली तर stress test करायला सांगतात. त्यात शरीरात कुठे Blockage आहे का ते समजते.

प्लस वन टू नंदिनी.

स्ट्रेस टेस्ट किंवा ईसीजीमधे फाल्स पॉजिटीव्ह / फाल्स निगेटीव निष्कर्ष येणे सहज शक्य आहे. याचा अर्थ "अ‍ॅसिडीटी" हेच डायग्नोसिस तुम्ही गृहीत धरू नका. डावा हात भरून येणे हे उच्चरक्तदाब / अंजायना चे लक्षण असू शकते. अ‍ॅसिडीटीने किंवा चहा प्यायल्याने असे होण्याचे कारण नाही. काही दिवस रेगुलर फॅमिली डॉक्टरकडून बीपी मॉनिटर करा, किंवा जमल्यास बीपी मशिन घरी आणा. सोपे असते ते.

महत्त्वाचे म्हणजे, तज्ञ वैद्यकीय व्यावसायिकाकडून उपचार करा.

शुभेच्छा !

मनु, वर आपल्या मायबोलिकरांनी बरेच सल्ले दिलेत. त्यात..... सेकन्ड ओपिनियन घ्याच ते ही चांगल्या कार्डिओलॉजिस्टचे हे महत्वाचे वाटते. पण त्याच्याकडे जाताना नंदिनीने सांगीतल्याप्रमाणे सर्व प्रश्न एका कागदावर लिहुन काढा. म्हणजे सांगताना काही राहायला नको. तसेच तुमच्या नवर्‍याची फॅमेली हिस्र्टीही
डॉ.सांगायला हवी. मी पण यासर्वातुन गेलेली आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटते हे मी समजु शकते.
माझ्या नवर्‍याला ४-५ वर्षापुर्वी असाच त्रास सुरु झाला. आमची मोठी चुक झाली ती सेकन्ड ओपिनीयन घेतले नाही ही. आम्ही पण डॉ.म्हणतील त्या सर्व टेस्ट केल्या. सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत. मुख्य म्हणजे हार्टचा ,अ‍ॅसिडीटी चा प्रोब्लेम नाही. डॉ.अजुनही नक्की सांगु शकत नाही. कदाचीत arthritis चा त्रास असेल असे ते म्हणतात. आता पुर्वीसारखे नाही पण खुप थंडी पडली की कधीतरी त्रास होतो.

नंदिनी आणि विद्याक यांच्या सल्ल्यास पूर्ण अनुमोदन.
घाबरू नका पण हयगय अथवा स्वतः काही गृहित धरू नका.तुम्ही कोणत्या गावात असता हे कळल्यास उत्तम डॉक्टरांचा रेफेरन्स मी वि पु मध्ये देवू शकेन .
आणखी महत्त्वाचेह म्हणजे डॉक्टरने सर्वकाही व्यवस्थइत वेळ देवून समजावून सांगितले पाहिजे तसेच कुठली औषधे कशासाठी हे देखील विचारता येईल
ऑल द बेस्ट

नेट कन्सल्टेशन देणे बरे नव्हे. खालील सल्ला वैद्यकीय सल्ला समजू नये. मी पेशंट तपासलेला नाही. सबब, सल्ला चुकीचा असू शकतो.

पण, २डी एको व स्ट्रेस टेस्ट नॉर्मल असतील तर हार्टचे टेन्शन सोडा. बर्‍यांचदा भितीने बारीक सारी दुखणे मोठे वाटते. अती विश्रांती घेऊ नका देऊ. डॉक्टरांना विचारून हळू हळू प्राणायाम(ब्रीदींग एक्सरसाईज) व योगा सारखा सोपा व्यायाम सुरू करा.

मलाही दोन दिवस आधी पासून श्वास घेताना मानाच्या उजव्या बाजूने छातीत उजव्या बाजूला चमक येत आहे.....कश्यामुळे होत असेल समजेल का..?

सुशील, माझ्या नवर्‍यालाही असाच उजव्या बाजुला त्रास होत होता. मान, छाती, हात,पाय दुखायचा. मान, पाठीचा x-ray काढल्यवर मानेमधे gap असल्याचे समजले. ३ महिने chiropractor कडे जात होता. बराच फरक पडला. कधी तरी अजुनही थोडा त्रास होत असतो. पण खुप बरे आहे .