मटमट्या (पिंगळा घुबड)

Submitted by Dr Raju Kasambe on 2 August, 2019 - 09:48

Spotted Owlet Pench DSCN9209 (9).JPGमटमट्या (पिंगळा घुबड)

करतो विदुषकी चाळे
मान त्याची सर्वत्र वळे

मोठमोठे बटबटीत डोळे
वाकुल्या दाखवितो बळे

सांजवेळी बाहेर पडतो
मटमट्या आम्हाला बघतो

गिचीडमिचीड कर्कश बोलतो
रात्रीची घोषणा करतो

लक्ष्मिचे वाहन असे तो
तिन्ही लोकीची सफर घडवीतो

शेतकऱ्यांचा खरा दोस्त
किडे-उंदरांना करतो फस्त

धरणीवरती बहू प्रजाती
प्रसार सर्वत्र भूलोकी

अंधश्रद्धांनी घेरले घुबडांना
लढतो अस्तित्वाची लढाई

डॉ. राजू कसंबे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या गावी याला मटमटी म्हणत. खुप होत्या मटमट्या, आमच्या घरासमोरच एक अड्डा होता यांचा.
वेगवेगळ्या वदंता होत्या, अपशकून ते मटमटीच्या अंड्याने आंधळा बरा होतो वगैरे.