कावळा आणि अंधश्रद्धा

Submitted by Dr Raju Kasambe on 27 July, 2019 - 00:46

कावळा आणि अंधश्रद्धा

काळ्या काळ्या कावळ्याच्या, अकलेला तोडच न्हाय
काळा काळा दिसतो अन, करतोया काव

कावळ्याशी पंगा कधी, घेऊच न्हाय
हैराण करील चोच मारून, सोडणार न्हाय

गाणी गातो कावळीसाठी, खाऊन जातो भाव
उन्हाळ्यात बांधतो घरटे, खरकटं खाय

कोकिळा बनविते उल्लू, त्याला कळतच न्हाय
घरट्यात टाकून अंडी त्याच्या, भुर्र उडून जाय

कोकिळेच्या पिल्ल्याला, भरवत र्‍हाय
अकलेच्या गोष्टी मोठ्या, सांगतच र्‍हाय

मडक्यात टाकून खडे, पाणी पीतो काय
अजूनतरी कुणी तसं, पाह्यलंच न्हाय

घरट्याची जागा म्हणे, सांगे पावसाचा भाव
खरं मानायला मात्र, कुणी तयारंच न्हाय

श्राद्ध अन तेरवीला, खाऊन जाय भाव
अंधश्रद्धेपायी शिक्षण, वाया गेलं राव

स्वर्गवासी पितरांना कावळ्यांशी, जोडूच न्हाय
बिनपगारी करतो सफाई, मित्रच हाय !!

(दि. १ जून २०१९, अप्रकाशित)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंधश्रद्धेपायी शिक्षण, वाया गेलं राव

स्वर्गवासी पितरांना कावळ्यांशी, जोडूच न्हाय
>> करूद्या मजा बिचाऱ्याला. एवढं गोडधोड जेवण घेऊन कोणी कुणाला खायचा आग्रह करताना पाहिलंय का? आयते जेवण मिळतं त्याला , वरून खा खा रे बाबा ही विनवणी! मग खातो तो भाव.

डॉ. साहेब आपण वैयक्तिक पितरांना पिंडदान, घास टाकणं हे बंद केले आहे का? आपल्या अत्यंत जवळच्या नात्यातील लोकांना अशी कृत्ये करताना थांबवून त्यांचं मन वळवलं आहे काय?.

कवितेत लिहिलेले कार्य कवीने केलेले असेल असे नाही. बरे झाले मी कारगिलवर कविता लिहिली नाही. नाही तर तुम्ही सीमेवर जाऊन कधी लढाई लढलात काय असे पण विचारतील? असो “जो न देखे रवी, वो देखे कवी” असे म्हणतात. किती कवी सूर्य चंद्रावर गेलेत ते पण शोधायला हवे. कवितेचा आस्वाद कविता म्हणूनच घ्यायचा असतो. असो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद

ओके ओके. भारताचा हाच प्रॉब्लेम आहे. असो मी पण गमतीतच बोललो होतो. आपल्या लोकांना खोडच आहे इतरांना ब्रह्मज्ञान सांगायची. त्यात तूम्ही व मी वेगळे नाही आहोत. शिक्षण गेलं वाया आपलं.

कावळा सकाळी काव काव करायला लागला की पाहुणे येणार असं मोठी माणसं म्हणायची आणि खरंच पाहुणे येत असत. कावळ्या इतका चतूर पक्षी कोणता नसेल. मागे कावळा अक्रोडा सारखी फळं रस्त्यावर टाकून वाहनं जाऊन फुटली की खात होता हा व्हिडिओ मी पाहिला होता. मी रोज पक्षांसाठी धान्य बाजरी तांदूळ ठेवतो, पोळीही ठेवतो. पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी ठेवतो तर कावळे भाऊ त्या पाण्यात कडक वाळलेल्या शिळ्या पोळ्यांचे तुकडे, वाहनांखाली सापडून चपटे झालेले वाळलेले बेडूक भिजवून जरा नरम झाले की मग खातात. एक अतिशय काळा कावळा, आमच्याकडे डोमकावळा म्हणतात, त्याची अन् माझी खूप गट्टी जमली आहे. मला तर तो माझा पुर्वजच वाटतो. मला तरी वाटते की कावळा माठातील पाणी खडे टाकून पिला हे खरं असलं पाहिजे. आमच्या कडे दूध काढल्यावर बादलीत कापडाने झाकून थंड व्हायला ठेवतात तर कावळे दादा कापड बाजूला करून दूध पिताना मी पाहिलं आहे.