वेळ वाया घालवण्याची सवय कितपत गंभीर आहे?

Submitted by ek_maaybolikar on 23 July, 2019 - 10:10

मी मायबोलीवर आहे बरीच वर्षे पण वाचनमात्र आहे. पण लिहिले नाही कधी. इथे काही चांगले सल्ले दिले जातात हे वाचून आहे. सध्या एका खूप कठीण मानसिक अवस्थेतून जात आहे. त्यासंबंधी share करण्यासाठी हा आयडी/धागा काढला आहे व अनुभवींच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे.

बरीच वर्षे job मध्ये होतो. काही वर्षापूर्वी job गेला. Rescission मुळे गेला. पण त्यानंतर job साठी हिरीरीने प्रयत्न करावे कधी वाटले नाही. मध्यंतरी किरकोळ एकादा job केला तेवढेच. बाकी आजवर जे saving होते त्यावरच घर चालवणे सुरु आहे. पण आता ते सुद्धा संपत आले आहे. पण काळजी त्याहून भयंकर आहे. ती अशी कि मला job साठी प्रयत्न करावेच वाटत नाहीत. किंबहुना मला कसलेच प्रयत्न करावे वाटत नाहीत. टाईमपासची अत्य्तंत बेकार सवय गेल्या काही वर्षात अंगात भिनली आहे. Bank मध्ये balance कमी आहे. पण घरच्यांना कल्पना दिलेली नाही. मध्यंतरी कर्ज मिळाले ते घेऊन ठेवले आहे. त्याचीही कल्पना घरच्यांना दिलेली नाही. Job साठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांना दाखवत आहे. पण माझ्याकडून म्हणावे तितके प्रयत्न होत नाहीत. येत्या काही महिन्यात job मिळाला नाही तर कर्जवसुलीसाठी bank चे लोक दारात येतील अशी परिस्थिती आहे. पुढे घरखर्च चालवणार कसा हा सुद्धा प्रश्न आहे. पण मला कशाचेच काही वाटत नाही. समस्या अशी आहे कि मी प्रयत्न करतो क्वचित कधीतरी थोडा. पण अनेक दिवसांनी. ते सुद्धा दिवसातले तास दोनतासच. त्यात सातत्य टिकून राहत नाही. कधी प्रयत्नाला लागलोच तर ती उर्जा टिकून राहत नाही. दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा आहे तसा टाईमपास सुरु. असे होत आहे. वास्तविक बिकट परीस्थित आली आहे. क्षणसुद्धा वाया घालवून चालणार नाही हे इकडे तिकडे फिरत असताना कळते, हे सगळे विचार डोक्यात असतात. व त्यानुसार ठरवतो सुद्धा. नोकरीच्या वेबसाईटवर जाऊन Resume अपलोड करणे, job साठी वेगवेगळ्या ठिकाणी apply करणे हे सगळे ठरवतो. पण laptop वर बसताक्षणीच फक्त आणि फक्त टाईमपास करणे इतकेच होते. Job साठी प्रयत्न केले जात नाहीत. तासनतास असेच जातात आणि मग लक्षात येते आजचा दिवसा पण असाच गेला. असे नेहमी होत आहे. तरी मला कशाचेच काही वाटत नाही आहे. पण रात्री अंथरूणवर अंग टाकताच माझी मलाच किळस येते. उद्या सकाळी प्रयत्न करायचे ठरवतो. पण पुढचा दिवस सुद्धा तसाच जातो! एका भयंकर मानसिक चक्रातून मी जात आहे हे मला कळते पण मला उपाय सापडत नाही आहे.

बाकी माझ्या रुटीन मध्ये वा वागण्याबोलण्यात काही फरक नाही. चिडचिडेपणा होणे किवा उदासवाणे वाटणे वगैरे कधीच नाही. (नाही म्हणायला सकाळी थोडेफार उदास वाटते पण त्या व्यतिरिक्त नाही). मला सल्ला इतकाच विचारायचा आहे कि यासाठी मानसोपचारतज्ञाची गरज आहे का? कोणाला भेटावे लागेल का कि गरज नाही? हा डिप्रेशन चा प्रकार असू शकतो का? याबाबत गांभीर्याने सल्ले हवे आहेत. कोणी यातून गेले असेल तर त्यांनी काय उपाय केले ते सांगितल्यास उपकृत राहीन. आभारी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्या चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला आपण घ्यावा, असं वाटतं.

तुम्हाला आळसाच्या "भावनेने" पुर्णतः वेढलय.

https://www.maayboli.com/node/69797?page=2

या धाग्यावरील माझा प्रतिसाद वाचुन आणि सान्गितलेले अमलात आणुन काही फरक पडतो का ते पहा, एव्हढच म्हणेन.

बाकी माझ्या रुटीन मध्ये वा वागण्याबोलण्यात काही फरक नाही. चिडचिडेपणा होणे किवा उदासवाणे वाटणे वगैरे कधीच नाही. (नाही म्हणायला सकाळी थोडेफार उदास वाटते पण त्या व्यतिरिक्त नाही).
>> माझ्या अनुभवावरून पैसा ही एकच चीज अशी आहे, जी संपली असं वाटलं तर माणूस वेडापिसा होतो. एक तर तुम्ही निर्ढावलेले आहेत किंवा वैराग्य आलं असेल. बायको जर कमावती असेल तर टेन्शन घेणार नाही माणूस पण बायको मुलांची जबाबदारी असेल तर माणूस स्वस्थ बसणार नाही. लवकर कामधंदा शोधा.

तुम्हाला एका चिआंगल्या गुरूची गुरूची आवश्यकता आहे
म्हणजे ध्यानधारणा करता येईल
ध्यानाने एकाग्रता वाढते.
तोपर्यंत वेळ वाया घालवण्या पेक्षा
मनास चांगल्या ठिकाणी रिझवावे.
संगीत, चित्रकला, समाजसेवा इत्यादी

अशा स्वभावाच्या नवऱ्याचा बायकोला आणि मुलांना खूप त्रास होत असतो. त्यांना पूर्ण सहानुभूती.शक्य झालं तर सावरा स्वताला

सर्वात आधी हे घरच्यांना सांगा. कारण पुढे त्रास हा फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या कुटुंबाला सुद्धा होणार आहे.
तुम्ही कर्ज वैगरे च्या गोष्टी कितीही लपवलात तरी आज ना उद्या तुमच्या कुटुंबाला ते समजणार त्यामुळे घरात वाद होऊन तुमचा त्रास वाढू शकतो.
कधीकधी अनोळखी लोकांच्या सल्ल्यापेक्षा ओळखीच्या व्यक्ती कडून मिळालेला सल्ला आपण नीट लक्षात घेतो.
त्यामुळे घरी सांगा आणि मग गरज असल्यास मानसोपचारतज्ञ कडे जा.
Get Well Soon

डॉ. भेटणे केव्हाही उत्तम.
हो, हे खुप गंभीर आहे, खास करुन घरचे तुमच्यावर अवलंबुन आहेत व त्यांना हे माहीत नाहीये. अजुनही उशीर झालेला नसावा. काये, जोवर सुरुवात होत नाही तोवर गती येत नाही, आत्मविश्वास येत नाही.
एकदाच मोह आवरुन प्रोफाईल बनवायच्या पहिल्या पायरीला सुरुवात करा, मग आपोआप बाकी गोष्टी हातुन होतील, जसे की नोकरीला सगळ्या वेबसाईट्सवर प्रोफाईल टाकणे, गुगल करुन नोकरी शोधणे व योग्य जागी अर्ज करणे. रोज सकाळी ताजेतवाने होऊन अशा नकोशा वाटणार्‍या गोष्टी कराव्यात, थोडावेळ केल्या तरी चालेल, म्हणजे सवय लागते. घरी सांगावे म्हणजे एक ओझे उतरेल व हुरुप येईल. हो, व नोकरीला लागणरा अभ्यास सुरु करा. थोडा अभ्यास, थोडा टाईमपास असे गजर लाऊन करावे. शुभेच्छा.

कृपया, मानसोपचारतज्ञां चा सल्ला घ्या.

मी तुमच्या जागी असतो तर सर्वात आधी घरच्या मंडळींना कल्पना देतो. तुमच्या अत्यंत विश्वासाचे असे मित्र परिवार असतील तर त्यांच्याशी पण बोला.

जॉब नसणे अवस्था खुप त्रास देते... पण त्या कडे एक संधी म्हणुन बघायचे. जॉब तर गेला... पण मला अजुन काही शिकता येते का हे तपासा. स्वत: कडे असलेले skills अजुन बळकट कसे करता येतिल ? जॉब असतांना आपण नवे काही शिकण्याचा प्रयत्न करत नाही, तो विचार मनाला शिवतही नाही. जॉब साठी अप्लाय करतांना..... कधी खूप कंटाळा येतो किंवा मन नैराश्याने ग्रासते. अशावेळी आवांतर वाचन, विरंगुळा, छंद, क्ला असतील तर त्यांना जोपासा ... यात मन रमवले तर अर्ज करताना एक नवा उत्साह येतो.

परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा.

घरातल्या लोकांना वेळेत सांगा म्हणजे ते बरोबर तुमच्या खनपटीला बसून तुमच्याकडून गोष्टी करवून घेतील.
बायदवे, मानसोपचार हा एक भाग पण मधुमेह, थायरॉइड सारख्या काही आजारात मानसिक आळसावलेपणा (lethargy) येऊ शकतो. त्या दिशेने सुद्धा तपास करून बघा.

बायदवे, मानसोपचार हा एक भाग पण मधुमेह, थायरॉइड सारख्या काही आजारात मानसिक आळसावलेपणा (lethargy) येऊ शकतो. त्या दिशेने सुद्धा तपास करून बघा.>>>>> +११११

एकदा शांतपणे एकटेच बसुन स्वतःचे आत्मपरीक्षण करा. काय कमी जाणवते आहे त्याचा विचार करा. दुनियांमे कितना गम है, मेरा गम कितना कम है !

काऊन्सीलरची मदत घ्याच. मन मोकळे झाले की नवीन उम्मीद मिळते. शरीराला जपतो ना आपण? मग मनाला जपायला नको का? आधी खंबीर व्हा. सुनिधी, उदय व कपकेक यांचे प्रतीसाद नीट वाचा. छान आहेत ते.

मला वाटतं तुम्हाला जडत्व आले आहे...
१. घरच्यांना सांगा.
२. ज्यांचात वेळ वाया जातो त्या वस्तू थोडे दिवस वापरू नका.. लॅपटॉप
३. नोकरी साठी पूर्वतयारी करा..
४. रात्री वेळेवर झोपा आणि पहाटे लवकर उठून १ तास चालायला जा
५. आदल्या रात्री उद्याच्या कामाची यादी बनवा.

निष्क्रियता..हे टाळण्यासाठी नोकरीधंदा करायला लागतो..नेहमी पैसे कमवणे हेच काराण नसावे...

पहिली गोष्ट घरातल्या सगळ्या मोठ्या लोकांना ( आई- वडील असले तर ते सुद्धा ) हि तुमची अवस्था सांगा . घराच्या लोकांशी बोलून काही तरी मार्ग निघेल . बर घरातल्या सगळ्या मोठ्या लोंकाना कर्ज वगैरे गोष्टी कळल्याचं पाहिजेत . घरातल्या लोकांपासून कर्ज वगैरे गोष्टी लपवून ठेवाव्या असं तुम्हाला का वाटत ? . त्यातून तुम्हाला जॉब नाही हि गोष्ट तर घरच्यांना माहिती असेलच . त्यावर त्यांचं काय म्हणणं असत ? त्या वरून घरात भांडण होतात का ?