अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

aata ashi utaarvayatali lagna hou lagli ahet.. karan baraych family madhli mule pardeshi astaat.... tyana property issue yet nahi.... rather tyanchi kalaji thodi kami hote.. n utaarvayat maansik garja jast astaat..

मला आव डला पहिला भाग. तेज श्री जरा जास्त करते पण चालसे. तुपारे पासून बिग ब्रेक. निवेदिताने मुलाला एकदम चम्या बनवले आहे. आयडिअल नवरा म टेरिअल. म्हातारा बाबा धमाल कर णार. घराचे नेपथ्य छान व वेगळे आहे. निवेदि ताचा वावर सहज आहे किचन व इतर घरात. गिरिश ओक लास्टला आलेले.

मला आव डला पहिला भाग. तेज श्री जरा जास्त करते पण चालसे. तुपारे पासून बिग ब्रेक. निवेदिताने मुलाला एकदम चम्या बनवले आहे. आयडिअल नवरा म टेरिअल. म्हातारा बाबा धमाल कर णार. घराचे नेपथ्य छान व वेगळे आहे. निवेदि ताचा वावर सहज आहे किचन व इतर घरात. गिरिश ओक लास्टला आलेले.

तो इतक्या ठोंब्या मुलगा तेजश्रीला (For that matter कोणालाही) कसा काय आवडू शकतो Uhoh आईने त्याला अगदीच बुळ्या बनवले आहे. बेडवरच ब्रश Angry असल्या आयांची कितीहे धावपळ झाली तरी दया येत नाही.

आणि कितीही गृहिणी असली तरी या वयाच्या वुड बी सासूबाईंना लग्नाच्या बजेटबाबत नवीन पिढीकडून माहिती घ्यावी लागेल असे वाटत नाही.
तेजश्री निवेदिताला सरळ गुंडाळताना दाखवलीय कैच्याकै

मलाही आवडला पहिला भाग.ते.प्र. ही चांगली वाटली.
पण आईचं मुलाला बेडवरच ब्रश हातात आणुन देणे..ई..
पोहे पण भरवले..नंतर होणार्या सुनेसमोरच 'बबड्या' काय म्हणते मुलाला.
रवि पटवर्धन का एवढे ओरडतायत सारखे?
त्यांनाही देव्हार्यात समोरच ठेवलेलं चंदन, हार काहीच दिसत नाही.सगळं हातात दिलं सुनबाईने.का वडिल आहेत ते?
घर छान आहे.

आवडला पहिला भाग. तेप्रला यात रडकी सून दाखवली नाही ते बर केलय. बिनधास्त, हुशार, चतुर, सासूला गुंडाळणारी सून मस्त! हि पुन्हा जान्हवी रिपिट करणार की काय असा प्रोमो बघून गैरसमज झाला होता.

हिरो इतका बुळया का दाखवलाय?

म्हातारा बाबा धमाल कर णार. घराचे नेपथ्य छान व वेगळे आहे. निवेदि ताचा वावर सहज आहे किचन व इतर घरात. >>>>>>>>>> ++++++++++१११११११११

दुसर्या भागात लग्न झालेल दाखवलय तेप्रच. इतक फास्ट दाखवतायत हे!

हिरो इतका बुळया का दाखवलाय? >>> मुद्दाम असेल तेजश्रीचं तेज पडावे म्हणजे दिसावं Wink म्हणून Lol

कोण आहे कलाकार. मी झी मराठी बंद केलं, मुद्दाम zee 5 वर बघेन असं नाही पण प्रोमोत निवेदिताचा प्रकाश पडतोय तेजश्रीपेक्षा, ती छान दिसतेय.

शेफ अभीची असिस्टंट का कोण आहे ती असं irritating, नाटकी का बोलतीये?
फारच गोड गोड झाले बाई दोन्ही भाग.खानदानी दागिने मिळाले पण लगेच नातसुनेला. सुनेने सासुच्या पाया पडून, ऊखाऩ्यात सासुचाही ऊल्लेख करुन सासुला खुश करुन टाकलं.
भोचक शेजारिणही गोड आहे.
आजोबांनी जरा कमी आरडओरडा करावा.बबड्या व शुभ्राच्या आई वडिलांनाही काही काम नाही,काही संवद नाहीत. ते वडिल आधी कशात होते?

तेजश्रीचा नवरा अशोक पत्कींचा मुलगा आहे,नाव नाही माहीत.पण कलर्स की स्टारप्रवाह वरच्या कुठल्यातरी सिरियलमध्ये होता.

हो का पण तो एवढा बुळा नाही वाटला कधी. मेंदीच्या पानावरमध्ये होता बहुतेक आणि कुठेतरी बघितला आहे.

Thank u UP आणि आईची_लेक.

लग्नाचा एपि सोड एकदम क्युट चालू आहे. थोडक्यात लग्न. मग प्रीति भोजन. सासू जरा टू मच भावनिक आहे. सून एकदम सर्व परंपरा मोडीत घालून नवेच काय काय करायचे मोड मध्ये आहे. तिची ज्वेलरी जरा जास्तच पिव ळी दिसते आहे. २२ कॅरट सोने पण तसे दिसत नाही. शेवटचा सीन गोड. रवी पटवर्धन सोडले तर पुरुष माणसे बोलतच नाहीयेत. बबड्या नुस ता मुंडी हलवतो. सुनेचा बाबा अपेक्षेनुसार विनोदी.

तो बबड्या छान आहे एकदम . अशोक पत्कींचा मुलगा काय ? सगळं फोकस सासू सुनेवरच असणारे आणि सासूबाईंचा नवरा म्हणजे गिरीश ओक . शुभ्राचे आई -बाबा किंवा भाऊ जास्त नसतील बहुतेक . आधुनिक विचारांची सून दाखवलेय . त्यानिमित्ताने आधुनिक / नवे विचार लोकांच्या मनात भरवणार बहुतेक .कोर्टात ती आधी सासूबाईंना नमस्कार करणार म्हणते मग आई -वडील . माप ओलांडताना तांदूळ वाया जाऊ नयेत असं मत व्यक्त करते आणि त्याप्रमाणे वागते . चांगलं दाखवलाय सगळं . नवऱ्याला बबड्या म्हणून नका असं ती सासूला सांगेल त्याच्या मुलगा म्हणून ज्या काही सवयी आहेत ज्या सासूने बदलल्या नाहीयेत ती हि सुन बदलेल असं दाखवतील . नवऱ्याला पण शिस्त लावेल ती

शनयाची आई..अगदी..
सिरीयल मधली गोड गरीब गाय आई व प्रोमो मधली..लोक बघतात माझ्याकडे..अजुनही..असं ठसक्यात सांगणारी आई दोन वेगळी व्यक्तिमत्त्व वाटतायत..

छान वाटते सिरिअल.. निवेदिता प्रोमो मधे दिसते तशी फार भडक नाही सिरिअल मधे. आजोबा आणि शेजारीण पण भारी दाखवलेत.
सिरिअलचा प्लॉट पुण्यातला आहे का..? पहिला भाग मिसला म्हणुन टोटल लागली नाही.
निवेदिताचा ठोंब्या कुठेतरी पाहिलाय.. बहुतेक स्टार प्रवाहच्या कोणत्यातरी सिरिअल मधे होता..

शेफ अभिची असिस्टंट... केड्याची आधीची मावशी आहे बहुतेक...जी लंडनला गेली! >>> ती रोहिणी निनावे . ती नाहीये ही .

सासूबाईनी लेकाला फारच लाडावले आहे हे खरं .
आजोबा आवडले . म्हातारी माणसं अशीच होत जातात थोडी हट्टी .सासरे आहेत ते निवेदिताचे , वडील नाही .
तेजश्रीला जास्त फूटेज मिळावं याची पूरेपूर खात्री घेतली आहे . पण तिचा वावर आवडला . अजून तरी छान वाटतेय.
निवेदिता फार आवडली .
गिओ जरा जास्तच गोरे दिसतात कधी कधी .

शेफ अभिची असिस्टंट... केड्याची आधीची मावशी आहे बहुतेक...जी लंडनला गेली! >>> मला शनायाची आई नाही केड्याची मावशीच म्हणायच होतं. मानबा बघणं सोडून जमाना झाला त्यामुळे गलतीसे मिसटेक झाली Proud

मला आजोबा खूपच आवडले:)शुभा (shubhraa) क्युट आहे एकदम Happy आसावरी आणि राजे पण awesome Happy
वाट नाही लावली आणि असंच चालू ठेवली तर बघायला मजा येणार आहे Happy

नव्या नवरीचं औक्षण करायला सासुबै दुसर्‍या सवाष्ण बाईला सांगतात. पण सुनबाई आई तुम्हीच औक्षण करा सांगते ते आवडलं.
तेप्र गोड आणि हसरी आहे. इषानंतर झीने रीलीफ दिलाय प्रेक्षकांना Happy

दोन्ही एपिसोड आवडले. रोहिणी निनावे सुद्धा पटकथा लेखन करतेय बहुदा या सिरीयल साठी काल त्यांचे नाव पाहिले सुरुवातीच्या यादीत.

Pages