Submitted by सुंदरराव on 21 July, 2019 - 11:37
तो, हो तोच तो
पुरता झालाय पागल
ओळखेना कुणाला
बनलाय बेताल
परत परत तेच ते
शब्द आणि वाक्यं
पुटपुटतो स्वत:शी
तुटलाय आतून
हसतोय रडतोय
कण्हतोय कुथतोय
कुणाचं कुणाला
देतोय नाव
तो, तोच तो
दिसला वाटेत
बाजूला व्हा
वाट बदला
नाहीतर म्हणेल जग
तुम्हालाच मुर्ख
पागलच्या नादाला
पाहिलंय कुणाला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान कविता. खरंच नादी लागू नये
छान कविता. खरंच नादी लागू नये शहाण्या माणसाने.
आभारी आहे शशिकांत.
आभारी आहे शशिकांत.
कुणावर केलीय. संभ्रमु वर?
कुणावर केलीय. संभ्रमु वर?
हा हा हा हा
हा हा हा हा