नवीन फुलणारे जग

Submitted by बेफ़िकीर on 21 July, 2019 - 00:49

मी खूप पाहिल्या अशा तर्‍हेच्या विधवा
ज्या वैधव्याला संकट मानत नव्हत्या
जग काटे बनून त्यांना टोचत होते
पण जगास त्या अजिबात जुमानत नव्हत्या

मी शोध घेतला फार कसोशीने हा
की ताकद इतकी यांना कुठून मिळते
पण धक्का बसला जेव्हा मला समजले
स्त्री जन्मतः शक्तीचे स्वरूप असते

पांढर्‍या कपाळी प्रयत्नरेषा असते
पण कुंकू त्या रेषेला झाकत असते
आवाजाला तर धार विलक्षण असते
पण गळ्यातले, स्वरयंत्रच दाबत असते

पाऊल ठाम टाकू शकते तीसुद्धा
जोडवी, पैंजणे जर पायी नसली तर
नाजूक मनगटे पहाड फोडू शकती
सौभाग्य कंकणे जर हाती नसली तर

मोकळे करू या बंधनांतुनी स्त्रीला
जग आहे त्याहुन सुंदर करेल ती मग
बस पहात राहू नवीन सृजनावस्था
बस पहात राहू नवीन फुलणारे जग

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर!
बेफिकीर जी आपण अशा स्त्रियांवरील केलेलं लेखन डोळ्यांपुढे आले.

sundar

अधून मधून या ही आयडीने असेच काहीतरी लिहीत जावे. म्हणजे पासवर्ड विसरायला होणार नाही.
>>अशा नादान संकुचित लोकांना आपण कोणाला काय बोलतो हे कळत नाही, तेवढा आय क्यू नाही. बेफिकीर जी खेटरासारखं यांना दूर ठेवले पाहिजे.