तिला पाहिले हृदयामध्ये धडधड झाली

Submitted by द्वैत on 20 July, 2019 - 04:49

बिन छत्रीचा बाहेर पडलो गडगड झाली
तिला पाहिले हृदयामध्ये धडधड झाली

नाकासमोर चालायाचा सराव केला
मित्र भेटले जुनेपुराने गडबड झाली

वापर केला पुस्तकातल्या सूत्रांचा अन
आयुष्यातील पुढची गणिते अवघड झाली

मथळा आला छापून भीषण दुष्काळाचा
शहरामध्ये वाचून केवळ बडबड झाली

वादळवारे मुकाट सारे झेलत होता
नव्या विचारांनी वाड्याची पडझड झाली

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

कविता आवडली पण कवितेच्या या प्रकाराला काय म्हणतात
>>>>>>>>>
कल्पना नाही बुवा, तुम्हीच जरा मार्गदर्शन केलात तर बरं होईल..

नाकासमोर चालायाचा सराव केला
मित्र भेटले जुनेपुराने गडबड झाली>>>>>>> Biggrin

वापर केला पुस्तकातल्या सूत्रांचा अन
आयुष्यातील पुढची गणिते अवघड झाली

मथळा आला छापून भीषण दुष्काळाचा
शहरामध्ये वाचून केवळ बडबड झाली

वादळवारे मुकाट सारे झेलत होता
नव्या विचारांनी वाड्याची पडझड झाली >>>>>>>>>> सर्वच मस्त! Happy