दिंडी माऊलीची

Submitted by वैशाली अ वर्तक on 12 July, 2019 - 00:48

दिंडी माऊलीची

विठ्ठल सावळा ।
उभा विटेवरी ।
चंद्रभागे तीरी ।
पांडुरंग ॥

गोजीरे ते रुप ।
बघते मी डोळा ।
येतसे उमाळा ।
अंतरात ॥

राहो सदा मुखी ।
विठ्ठल ची नाम ।
हेची कर्म काम ।
सदाकाळ ॥

उठता बसता ।
स्मरते तुजला ।
तारण्या मजला ।
तुच देवा ॥

कसे वर्णू गुण
माझी अल्पमती
तव नाम चित्ती ।
ठेवीतसे॥

सावळ्या विठ्ठला ।
दाटे मनी खंत ।
पाहू नको अंत ।
विनवीते ॥

दिंडीत भासतो ।
मी तू चा अभाव ।
समतेचा भाव ।
चोहीकडे ॥

मनी एक आस ।
दिंडीत जाण्याची ।
तूच पुरवावी ।
पांडुरंगा ॥

हेची दान दे गा ।
आले मी शरण ।
दाखवा चरण ।
मजलागी. ॥

वैशाली वर्तक

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर

छान