एक रात्र मंतरलेली... भाग 4(अंतिम) finale

Submitted by छोटी on 19 July, 2019 - 05:48

#कथा

#एकरात्रमंतरलेली
©अर्चना चौधरी
एक रात्र मंतरलेली भाग 3

एक रात्र मंतरलेली भाग 4 (अंतिम) finale
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता नदीच्या पलीकडे
केशवने काही दिसत नसताना सुद्धा ठरवलं ... हा माझा शेवट असूच शकत नाही.... बाप्पा, तुला जेवढी परीक्षा घ्यायची ती घे.... मी हार मानणार नाही... राघव, मी वाट बघतो आहे... जानू, गाढव लवकर कर... मला काही झालं ना भूत बनून तुम्हाला छळेल मी.. आताच सांगतो... त्याने अजूनही हातात आलेलं लाकूड काही सोडलं नव्हतं.. त्याने जोरजोरात आवाज द्यायला सुरुवात केली... जीजू जीजू... पण पाण्याच्या आवाजापलिकडे काही ऐकू येत नव्हतं... आणि अचानक पाण्याच्या आवाजाबरोबर खडखडात ऐकू यायला लागला... आणि ज्या झाडावर तो अडकला होता त्याला काहीतरी मोठी वस्तु येऊन धडकली... एक फांदी direct त्याच्या काखेत घुसली... त्या परिस्थितीत पण एक सणसणीत शिवी हासडली त्याने..ह्या गडबडीत त्याचा अडकलेला पाय सुटला... त्याने कसं बस लाकूड त्या झाडात अडकवलं...दोन्ही काखेत ते लाकूड धरलं... जे काही आपटलं होत त्यावर तो उभा राहू शकत होता... पाण्यात तो उभा राहिला ...पायाला असंख्य गोष्टी येऊन आपटत होत्या... आणि त्या असंख्य गोष्टीमध्ये माणसं पण होती... म्हणजे त्यांचे मृतदेह होते... इथे स्वतः जिवंत असणं जास्त यातनादेयी होत मरणापेक्षा... जितक्या वेळा त्याला वाटलं की कुठला मृतदेह बाजूने गेला तितक्या वेळा त्याने संस्काराप्रमाणे 'राम'नामाचा उच्चार केला... गेल्या काहीवेळात त्याने रामनवमीला पण एवढा रामाचा उच्चार केला नव्हता... तेवढा रामजप केला... आणि मध्ये मध्ये राघवा, मदत लागते आहे तुझी... कळत आहे का तुला... साल्या कुत्र्या... ac मध्ये बसून TV बघत असशील तर तुझ्या *****... उगाच तो राघव आणि जान्हवीला शिव्या घालत होता.. त्याच दुखणं वाढत चालले...पायाला हाताला पूर्ण शरीरालाच कुठे ना कुठे लागलं होतं... तरीही त्याला मनापासून विश्वास होता मदत मिळेल तर आपल्या मित्रांची.. आई शप्पथ.... इतक्या जोरात किंचाळला ना तो....भीती म्हणजे काय असतं हे त्याला त्या दिवशी कळलं... राम नाम तर जाऊच द्या... शब्द पण फुटत नव्हते साधे... त्याच्या पायाला कोणीतरी पकडून ओढत होत मागून ते पण पाण्यात... लाकूड काखेच्या जखमेत लागुन प्रचंड वेदना होत होत्याच पण पाय कोण ओढत आहे..खाली जमेल तेवढं बघितलं तर मानवाकृती दिसली... अचानक प्रकाश पडल्यासारखा जाणवला.. त्याला वाटलं आकाशात वीज चमकली... आजूबाजूच्या आवाजांना तर immune झाला होता..... कसली तरी घरघर ऐकू होती पण खाली कोण होत त्याला वाचवणं त्याला जास्त महत्वाचं वाटलं...एका हाताने आधार देत त्या माणसाला वरती घेतलं.... त्यांच्यासारखाच एक जण होता...
"Thanq thanq... मला वाटलं सगळं संपलं... " त्या इसमाने केशवला धन्यवाद दिला..
केशवला तर आता बोलताही येईना... खुप अशक्तपणा आला होता त्यातल्या त्यात क्षीण आवाजात त्याने सांगितलं
"आपल्याला अजून एक लाकूड शोधावं लागेल..नाहीतर दोघेही वाहून जाऊ..." त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं त्याचा आवाज कुठेच का पोहचत नव्हता.... जीजू कुठे असतील...ह्याची काळजी त्याला लागली....
"ह्या झाडाला माझी गाडी आपटली आणि दरवाजा उघडला म्हणून मला बाहेर पडता आलं... तुमचा पाय मला आधार वाटला... sorry आणि thanq..." त्या इसमाला पाण्याचा अजून तेवढा त्रास नाही होत म्हणजे आताच पडला असावा पाण्यात हा... जीजू कुठे आहेत ...एकच विचार त्याच्या डोक्यात होता.
कोणीतरी जवळ येत असल्याची जाणीव आणि प्रकाश एकदमच त्याच्या जवळ आला

---–--------–-------–---------------------------–--------–-------–-----------------------------------–-------–-------------
आता नदीच्या अलीकडे

थोड्याच वेळाने, एका हवालदार काकांनी मला आणि राघवला बोलावून त्या सगळ्या टीमकडे घेऊन गेले... सर्जा सरांनी आमची ओळख करून दिली
"ह्या दोघाचं म्हणणं आहे की काही लोक अजून जिवंत आहे पाण्यात... त्यांना आपण वाचवायला पाहिजे.."
NDRF च्या chief जे बरेच मोठे आणि experience वाटत होते त्यांनी आम्हाला विचारलं
" तुम्हाला कसं कळलं हे?"
"सर, कळलं एवढंच सांगु शकतो... कसं ते परमेश्वराला माहिती.."
"राघव, ना नाव तुझं.. तुला सांगतो,मी असे इतके प्रसंग बघितले आहेत की ह्या पाण्यात कोणी वाहून गेलं असेल तर तर जिवंत असणं जरा अवघड आहे...रात्रीचे दोन वाजता आहेत... 12 वाजता जरी पूल वाहून गेला असेल तरीही 2 तास टिकून राहणं अशक्य...."
"सर, all due respect to u r experience... आमचा मित्र जर ह्या पाण्यात असेल तर पूल जवळ जवळ 10 च्या सुमारास किंवा त्याच्या आधी पडला आहे... 2 तास नाही 4 तास झाले असतील सर... पण काहीतरी आहे ज्यामुळे मी माझ्या 2 महिने pregant wife ला घेऊन इथे उभा आहे.. सर स्त्रियांना 6th सेन्स जबरदस्त असतोच... पण जेव्हा त्या कोणाला तरी मनातून जागा देतात... त्या माणसासाठी त्या काहीही करू शकतात... ह्या 9 महिन्याच्या वेळात ह्यांचे सगळेच सेन्सेस खूप खतरनाक काम करतात... सर, आमच्यावर विश्वास ठेवा...केशव, माझा मित्र मदत मागतो आहे माझ्याकडे... महाभारतात केशवचं बोट कापलं तेव्हा मदतीला द्रौपदीच आली होती.. त्याची सखी... आज आमचा केशव जीवन मरणाच्या दारात आहे... please सर विश्वास ठेवा तो जिवंत आहे..मदत पाहिजे आहे त्याला... " राघव ने full इमोशनल टोचन दिल त्यांना... पण त्यावेळेस ते काम केलं हे त्या chief च्या डोळ्यात दिसलं...
" हे बघा, आम्ही प्रयत्न करायला नाही म्हंटलं नाही...आम्ही एक राऊंड मारला पण असं काही जाणवलं नाही... थोडा उजेड आला की आम्ही सुरवात करणारच आहोत... हे सुरज... ह्यांनीच स्वतः राऊंड मारला"
"Hello सुरज सर, तिथे कुठे झाड होती का?"
"Mam, एवढ्या पाण्यात कुठे असतील झाड???"
" काहीतरी जे धरून ठेवता येईल... तो खूप लांब नाही इथेच जवळ आहे..."
सर्जा साहेबांनी interrrupt करत "आपण अजून एक गस्त केली तर मॅडम ना घेऊन किंवा सरांना घेऊन "
"no, not at all possible? Against the rule... They are not train people... We can't take risk"
"But we are ready to take risk... Me and my wife ready to sign that all responsibility is belongs to us..."
"अरे, काय गाढवपणा आहे हा? तिकडे तो मित्रा खरंच पाण्यात पडला आहे की नाही माहीत नाही...पडला असेल तर जिवंत असेल की नाही माहीत नाही... आणि कसल्यातरी समजुतीवर जीव कसले ओवाळतात रे... आपल्या बाळाचा तरी विचार करा"
"सर, मित्र पडला आहे हे नक्की आहे.. आता जिवंत पण आहे सध्या... सर, risk ह्यासाठी उद्या आमच्या बाळाला कळाल माझ्या आईवडिलांनी मैत्री निभावली नाही... तर तो कसली मैत्री करेल... आमच्या बाळाला आम्ही मैत्री गिफ्ट देणार... baby must be ready for this sir...सर please एक चान्स सर"....
"Enough is enough... सुरज, lets get ready..we Indians are mentally fool... Emotional fools... तुम्हाला काय वाटत ...असे इमोशनल काहीतरी बोलालं आणि मी तुम्हाला जाऊ देईन... काही decoram असतात...शिस्त असते, प्रशिक्षण दिल जात... कोणीही उठलं की चालले का? पण .... " त्या पण नंतरचा एक एक सेकंद खुप जीव तोडत होता...आता ह्यांना कस conviece करायचं हा एकच विचार मनात चालू होता..."तुमच्या पैकी एकच कोणीतरी जाऊ शकेल" हे त्यांचं एकच वाक्य....आई शप्पथ!!! ते असं काही बोलतील असं वाटलं नव्हतं... अर्धी लढाई तर जिंकली ...पण पण आता जाणार कोण शोधायला...
"राघव, तुझ्या बायकोला जाऊ दे..." सर्जा साहेबांनी आपलं मत मांडलं
"जानू????"
"जाईन मी राघव ... जाईन... केशवसाठी जाईन...माझ्या उंचीवर जाण्याच्या फोबियावर मात करून जाईन..."
"That's my good girl... काहीच घाबरू नको... concentrate कर... आपल्या मित्राला आपली सगळ्यात जास्त गरज आहे...."
"Mam, माझी पण इच्छा आहे तुमचा मित्रा जर खरच अडकला असेल तर वाचवा आणि माझ्या helipcopter मधून तो परत यावा" कॅप्टन सुरजने आपली postive power पण मला दिली.... आता सगळं चांगलं होईल असं वाटतच होत... सगळी तैयारी होऊन आम्ही भरारी घेतली... जेवढं वाटत होती त्यापेक्षा खुप भयानक परिस्थिती होती... काहीही दिसत नव्हतं फक्त आवाज हेलिकॉप्टरचा आणि पाण्याचा... एक मोठया light मध्ये search करत होतो आम्ही...पण सर काय सांगत होते ते आता कळालं.. की का शक्य नाही आहे search operation आत्ता ... सर सांगत होते आम्हीच ऐकलं नाही... तेवढ्यात सुरजने एका ठिकाणी थांबवलं होतं ...काहीतरी हालचाल दिसली होती... टीम पैकी एक जण खाली उतरला होता ... दोरीच्या साहाय्याने.... थोड्यावेळाने प्रोटोकॉल नुसार इशाऱ्यानंतर बाकी टीमने त्याला वरती ओढला... त्यांच्या बरोबर एक माणूस होता... प्रचंड थकलेला... पाण्यामुळे पांढराफटक पडलेला... तिथल्या डॉक्टरांनी त्याला first aid द्यायला सुरुवात केली... तोपर्यंत ते परत खाली उतरले होते... 2 जण होते म्हणे खाली...अपेक्षाभंगाच दुःख म्हणजे काय हे तो दुसरा माणूस वरती आल्यावर कळलं... त्याला सुद्धा first aid सुरू झालं.... "सुरज, आपण अजून search करू शकतो ना..."
"Mam, मला instruction आहेत की तुम्ही म्हटल्याशिवाय परत यायचं नाही"
आम्ही तिथे गस्त घालत होतो... मनात जाप तर चालू होता...पण अंधारात अजून अंधार दाटून येत होता...आशेचा एक किरण आनंद देणार होता
" इथे, इथे बघा..." मी सांगितलं...
"Mam काहीच दिसत नाही आहे.."
"Please, इथेच खाली आपल्याला बघायचं आहे.."
काहीही हालचाल दिसत नव्हती तरी तो अधिकारी खाली उतरला... बराच वेळ झाला तरी काहीच reply नव्हता येत... एक एक क्षण... एक एक युगासारखा वाटत होता...finally सिग्नल आला खालून.. वरती एका माणसाला आणलं गेल... कोणीतरी वेगळाच होता पण जिवंत होता...फार मुश्किलीने तिने मनाला समजावलं की एवढंच ती करू शकत होती...परत तेच ह्यावेळेस देखील खालून एक माणूस परत आणला गेला...वरती आला त्या जखमी माणसाला मध्ये घेतलं..." केशव... नालायका कुठे कडमडला होतास...किती शोधायचं रे तुला" म्हणत मी डोळ्यातले अश्रू थांबवत त्याच्या जवळ गेली त्याचा हात हातात घ्यायचा प्रयत्न केला तर माझी सगळी बोटाचं त्याच्या हातात मध्ये घुसली... पाण्यामुळे पूर्ण शरीर फुगलं होत त्याच..." बंड्या, जीजू?" एवढंच बोलू शकला तो... फर्स्ट aid चालू झाला... " केशव, काही idea असेल, कुठे असतील? तर सांग आम्ही तिथे शोधतो... कारण आता शोधणं खुप अवघड आहे रे, खुप जास्त अवघड आहे"
"नका, शोधु मी इथेच आहे" पहिल्यांदा आणलेल्या माणसाने उत्तर दिलं... ते ऐकल्यावर केशव बेशुद्ध पडला...
"Mam, जायचं परत?"
" हो सुरज, i owe a party to all of u guys... Please please give us chance to host... गणपती बाप्पा...."
" मोरया" सगळेच ओरडले
श्रद्धा जिंकली... भीतीत, दुःखात, काळजीत मंतरलेली रात्र... मैत्रीत न्हाहून निघाली.... मैत्री परत एकदा जिंकली... त्या तिघांचा विश्वास जिंकला...

****************************************

ह्या कथेचा base बऱ्याच जणींनी सांगितल्याप्रमाणे सावित्री नदीवरील पुल वाहून गेला आणि खुप जण त्यात वाहून गेले हाच होता... जे वाहून गेले त्यातल्या कोणाचीही चुकी नव्हती पण ते सगळे आणि त्यांच्या घरातले कुठल्या परिस्तिथीतुन गेले असतील, हे आपण फक्त imagine करू शकतो... पण एक काम आपण सगळे नक्की करू शकतो... ते म्हणजे त्या सगळ्यांना श्रद्धांजली देऊ शकतो...
ही कथा त्या सगळ्यांना एक श्रद्धांजली आहे.... आणि एक गोष्ट electronics media च्या काळात कुठेतरी आपण आपला personal कनेक्ट विसरत चाललो आहे... मिळणारे सिग्नल ignore करत, फक्त कामात busy रहात आपल्या लोकांना दूर ढकलत आहोत... ते थांबवूया... सिग्नल accept करा... आठवण काढा... आठवणींना परत जगायचा प्रयत्न करा... आणि नवीन आठवणी बनवा... जगण्यात रंग भरा.....

Thank you all of u for being in journey of

एक रात्र मंतरलेली...

भरतवाक्य किंवा उपसंहार

Group content visibility: 
Use group defaults

ही कथा त्या सगळ्यांना एक श्रद्धांजली आहे.>> तुमचा हेतू आवडला, पण कथा खूप फिल्मी वाटली. पहिला-दुसरा भाग आवडला होता. हा भाग वाचताना 'सिलसिला' चा शेवट आठवला.

वावे धन्यवाद

हो कथा थोडी नाही बरीच फिल्मी आहे.कारण तेवढी लिबर्टी कथेत घेऊ शकतो आपण.
मी सिलसिला बघितला नाही त्यामुळे तुम्हाला end तो आठवला का हे नक्की कळलं नाही बघावा लागेल सिलसिला.

पण आपण आपल्या लोकांचे signal accept करणं बंद केलं आहे त्यामुळे असे होणं filmich झालं आहे

सावित्री नदीवरील पुल वाहून गेला... आणि जे घडल फरच वाईट.
माझ्या गावाल जाताना लागतो तो ब्रिज..... जाताना तिथे पोहोचल्यावर अक्षरशा अंगावर काटा येतो.
पुन्हा एकदा त्या सर्वाना श्रद्धांजली.

कथा म्हणून छान लिहिली आहे, हेतू आवडला Happy
फक्त 2 महिन्याची गर्भवती स्त्री एवढा धोका पत्करेल का ही शंका आलीच मनात
Anyway, लिहीत राहा, शुभेच्छा Happy

फिल्मी ड्रामा चा खूप जास्त ओवरडोस झाला, खासकरून संवादातून.
वाक्याच्या मध्येच रोमन लिपित का लिहितात ? वेळेचा अभाव, आळस, ईंग्रजीचा सोस, नवीन कल्पना की अजून काही.
एपिलॉग म्हणून लिहिलेले असंबंधित आणि कथेची गरज नसलयासारखे वाटले.
माफ करा, पहिल्या भागानंतर अपेक्षा ऊंचावल्या होत्या पण पुढचे भाग Sad

मला नाही माहिती तुम्ही IT field मधल्या किती लोकांना ओळखतात पण IT वाले असेच बोलतात.... मधेच इंग्लिश मध्ये....and yes it is filmy....मी ते तसंच लिहिलं आहे... नाही आवडलं तरी comment केल्याबद्दल धन्यवाद... sorry अपेक्षा पुर्ण नाही करू शकली