संभाजी : येत आहेत

Submitted by मी - सागर on 7 September, 2017 - 02:50

संभाजी : येत आहेत

झी मराठी वर लवकरच वेळ आजून माहीत नाही पण कुठलीतरी शिरेल बंद होणार असा दिसतंय.

Upcoming Sambhaji Maharaj serial teaser

https://www.youtube.com/watch?v=AjKvkh1Qweo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्षुल्लक कारणांवरुन चर्चेचा रोख जातीयवादाकडे फिरवण्याचा कल सोशल मिडियावर सतत जाणवतो; >
हे कुठेतरी थांबलं पाहिजे, थांबवता आलं पाहिजे > +१

हत्तीच्या पायी देण्याचा प्रसंग अगदीच विनोदी होता. खोटा हत्ती वगैरे ठिक आहे पण रडारड, पळापळ, दादा दादा करून सोमजीचा धावा, अनाजीचा उद्धटपणा, सगळंच खोटं वाटत होतं. राजे कुठे दिसले नाहीत. तो मिशिवाला सूर्यकांत-चंद्रकांत सारखा दिसतो.

कीव आली झी वाल्यांची
इतकं फुटेज खाऊन इतका तद्दन विनोदी प्रकार सादर केल्याबद्दल
कसला तो हत्ती, जोरात पळत येऊन धप्पा दिल्यासारखा हळूच छातीवर पाय टेकवून निघून जातोय

आणि आजूबाजूचे सिक्स किंवा फोर मारल्यासारखे उड्या मारत आहेत, एकच शॉट किती वेळा दाखवायचा याला काही सुमार

आणि इतके करून अजून अनाजी ला मारलं नाहीच
तो कोण कलाकार आहे त्याचे पैसे वसूल झाल्याशिवाय मारणार नाहीयेत का?

का फटाक्यांची सोय झाली नाहीये कारण डॉ कोल्हे यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की ज्या दिवशी अनाजी मरेल त्या दिवशी महाराष्ट्रभर फटाके फुटणार आहेत, बघाच तुम्ही

बहुदा असे असणार की भारत क्रिकेट कप जिंकेल असा अंदाज असेल आणि त्यात इथला टीआरपी कमी होऊ नये म्हणून पाणी ओतत राहिले असतील
आता विम्बल्डन, क्रिकेट संपलं, आता मरेल (निदान आतातरी)

अनाजी ला हत्तीने पायदळी तुडवल्याचा सीन जेवढा लांबवलाय तेव्हढ्या दिवसांत एखादा हत्ती अख्खा भारत पायदळी फिरून आला असता.

काल पहिल्यांदा या सिरीयल चा एक भाग जाता येता पहिला.
एकंदर लेखन आणि दिग्दर्शन "ग री ब" गटात मोडते.

एकदा शिक्षा सूनावून झाल्यावर, या देशद्रोहाला काय शिक्षा दिली पाहिजे? आणि लोकांचे हत्तीच्या पायाखाली द्या वगैरे ओरडा अगम्य होता.

आधी अनाजीचे मला अभिमान आहे भाषण, मग मला माफ करा भाषण, मग कबुली जबाब परत अभिमान आहे, मग परत मला सोडून द्या विनवणी , संवाद लिहिणारा माणूस थोर आहे.

हत्तीचा स्पेशल इफेक्ट अतिशय वाईट

अनाजी ट्रायल जी काही 5 6 दिवस चालली, त्याची धावपळ + खटला त्यात त्याला नाव्ह्याची/ धोब्याची सर्व्हिस दिली होती का? गुळगुळीत दाढी आणि टक्कल + स्वच्छ न चुरगळलेले कपडे.

हत्तीने सगळा विश्वचषक मन लावून पाहिला होता. गोलंदाज जसे लांबून धावत येतात तसाच हत्तीपण प्रत्येकाला मारायच्यावेळी लांबून धावून येत होता.

हत्तीने सगळा विश्वचषक मन लावून पाहिला होता. गोलंदाज जसे लांबून धावत येतात तसाच हत्तीपण प्रत्येकाला मारायच्यावेळी लांबून धावून येत होता.

नवीन Submitted by बोकलत on 16 July, 2019 - 09:59

World Cup Effect Happy

संवाद लिहिणारा माणूस थोर आहे.>>>>>>

होना, काय खटखट गियर बदलत होता
ते आधी त्याचा निगरगट्ट पणा दाखवायचं म्हणून पण मग त्यांना असे जाणवले असणार की असाच हा मेला तर त्याचे उदात्तीकरण होईल की धीराने मरणाला सामोरा गेला
मग अचानक ट्रॅक बदलला पण तो वाईट आहे हे तर दाखवायचे होतेच
लैच कसरत झालीये हा सिन करताना

आजचा एपिसोड छान होता
सोयराबाईंची खंत खरीखुरी वाटत आणि जाणवत होती
येसूबाई यांचे काम ही मस्त

राजाराम उर्फ बाळराजे अगदीच मिसफिट, कसलेच हावभाव नाहीत

कोंडाजी बाबा गेले. Sad खरे तर मी यातला एखादा सीन येता जाता बघते. कोंडाजी बाबा आणी बाकी मावळे बुरुजापर्यंत जातात एवढे मी पाहीले आणी बघणे सोडुन दिले. नवरा मात्र नेटाने बघतो. कोंडाजी बाबा गेले त्याचा सीन अस्पष्ट बघुनच मला रडु आले. खूप संताप झाला, वाटले की त्या काळात अख्खा हिंदु समाज आणी बाकी सरदार, राजे, प्रजा जर शिवाजी महाराजांच्या पाठिशी उभी राहुन एकदिलाने, एकीने लढले असते तर औरंगजेब आणी बाकी मुघल सैन्याची काय बिशाद होती स्वराज्य संपवण्याची ! आपले लोक खरच फार भित्रट होते. शिवाजी महाराज असो वा संभाजी महाराज, दोघांनाही एकटेच पाडले गेले त्या काळात. त्यातल्या त्यात स्वामीनिष्ठ मावळे, सरदार पाठिशी होते म्हणून. खंडो बल्लाळ, बहिर्जी नाईक, कोंडाजी फर्जंद असे अनेक मावळे, सरदार खंबीर होते. खूप वाईट वाटते ही सिरीयल बघीतली की.

Pages