वारी

Submitted by वैशाली अ वर्तक on 12 July, 2019 - 00:45

वारी

चला चला, वारीस जाऊ
विठ्ठल डोळा ,भरुनी पाहू
जवळच उभी, रखुमाई
भक्तगण , लोटांगण घाली.

डोईवर ,घेऊनी तुळशी
मनी आस ,विठू दर्शनाची
विठू नाम वसे सदा ओठी
पाउले चालती ,वाट पंढरीची.

ज्ञानोबा-तुकाचा होतसे गजर
रिंगण वारकरी मधेच करत
खेळ फुगडीचा, धरुनीया फेर
भजन कीर्तनी रंगूनी जात

काही भक्त , होऊनी दातार
सोय निवा-याची करण्यात धुंद
सुखकर वारी घडविण्या भक्तांना
वारीस जाण्याचा मिळविती आनंद

वारीत होतो दुःखाचा विसर
मी-तू पणाचा, दिसे अभाव
विठ्ठल नामात, सारेची दंग
सर्वत्र भासे , समतेचा भाव

जो तो दुस-यात विठ्ठल पाही
वारीची अशी, मजाच आगळी
सर्व दुनियेत अनोखी अशी
पंढरीची वारी जगा वेगळी

वैशाली वर्तक

वैशाली वर्तक

Group content visibility: 
Use group defaults

छान!