Submitted by अजय चव्हाण on 11 July, 2019 - 07:12
आता फक्त पाऊस पडतो
पण भरून मन येत नाही
आता आठवतात नवे काही क्षण
पण "ती" आठवत नाही..
गजांतून थंड ओघळ वाहणे नाही.
गुलाबी वार्याने ते शहारणे नाही...
एकटाच खिडकीत उभा मी..
हळूच दारातून, तुझे पाहणे नाही..
कवितांच्या अलगद पाने लिहणे नाही..
अडखळतो शब्दांत मी,तुझे सांगणे नाही..
सरीतातिरी कपाळावर टिंब तुझे नाही..
पाण्यात चांद तुझा, प्रतिबिंब माझे नाही..
उरलेलं ऋणासारखं आयुष्य माझं..
त्यात साथ तुझी का नाही.
भिंतीवरच्या फोटोत एकटीच तु..
खंत वाटे जीवाला त्यात मी का नाही..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कवितांच्या अलगद पाने लिहणे
कवितांच्या अलगद पाने लिहणे नाही..
अडखळतो शब्दांत मी,तुझे सांगणे नाही..
सरीतरी कपाळावर टिंब तुझे नाही..
पाण्यात चांद तुझा,
प्रतिबिंब माझे नाही..
>>वाह! खुपच सुंदर
पु.क.प्र!
भिंतीवरच्या फोटोत एकटीच तु..
भिंतीवरच्या फोटोत एकटीच तु..
खंत वाटे जीवाला त्यात मी का नाही.. अरेरे !
पण खूपच आवडली
सरीतरी कपाळावर टिंब तुझे नाही..
पाण्यात चांद तुझा, प्रतिबिंब माझे नाही..>> यात सरीतरी म्हणजे काय ?
शेवट वाचताना चर्र......झालं
शेवट वाचताना चर्र......झालं
जमलीये कविता..
>वाह! खुपच सुंदर
>वाह! खुपच सुंदर
पु.क.प्र! Happy
शेवट वाचताना चर्र......झालं
शेवट वाचताना चर्र......झालं +१ खरंच
संपूर्ण कविता सुरेख लिहीली आहे.
एकटाच खिडकीत उभा मी..
हळूच दारातून, तुझे पाहणे नाही..
- या ओळी पण मस्त जमल्या आहेत.
धन्यवाद दिप्तीताई, शशांकसर,
धन्यवाद दिप्तीताई, शशांकसर, खान आणि सिद्धी..
@anjali_kool
@anjali_kool
टाईपिंग मिस्टेक..खरंतर मला सरीतातिरी असं लिहायचं होतं..
संपादित केल आहे...प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
खंत सुंदर कशी म्हणू ?
खंत सुंदर कशी म्हणू ?
बरचं काही आठवलं!
बरचं काही आठवलं!
छान उतलीये कविता
खुप सुंदर लिहीलय आवडल
खुप सुंदर लिहीलय आवडल
धन्यवाद साळुंके सर, आसाजी
धन्यवाद साळुंके सर, आसाजी आणि पंडीतजी..
छान आहे.. शेवट वाचताना चर्र
छान आहे.. शेवट वाचताना चर्र वगैरे
टायपिंग मिस्टेक..
टायपिंग मिस्टेक..
खरंतर मला सरीतातिरी असं लिहायचं होतं..>>>टायपो होता?! मी पावसाच्या सरी या अर्थाने वाचलेली कविता.
छान आहे..
छान आहे..
Chan ahe...
Chan ahe...
छान लिहिलय.. शेवट..
छान लिहिलय.. शेवट..