नजर.

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 10 July, 2019 - 02:38

नजर.

आई घरात आली तीच तणतणत. काय झालं विचारल्यावर चिडचिड नुसती. माझ्यासमोर काही बोलेचना. शेवटी बऱ्याच वेळेनंतरच्या धुसफुसीनंतर बाबाना सांगत होती, " अहो तो वाण्याचा पोर... आपल्या रवीच्या वयाचा, पण काहीही विचारताना तोंडाकडे बघायचंच नाही .... सतत नजर खाली ...छातीवर खिळलेली ..."

.

.

.

पुढे काही ऐकायला मी तिथे थांबलोच नाही; मला ऑफिसमधली तिच्याशी बोलतानाची 'माझी' नजर आठवली...

©मयुरी चवाथे-शिंदे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

कथा वाचून दिग्मूढ व्हायला झालं. आपली आई असे काही सहन करतेय ही भावना कशी (कशीतरीच) वाटते!

मन्या S - हो

विनिता - नक्की इमोजी कशासाठी ? अभिप्राय कळवा .

कथा वाचून दिग्मूढ व्हायला झालं. आपली आई असे काही सहन करतेय ही भावना कशी (कशीतरीच) वाटते! - विनिता + १
खरी वस्तुस्थिती आहे ही.

- काही लोकांच्या नजरे प्रमानेच त्यांची मानसिकता सुद्ध्या झुकलेली आहे, हेच पहायला मिळते.
शतशब्द कथे पेक्षाही अतिशय कमी शब्दांत खुप खोल आशय दडलाय या लेखात.

हल्ली हां प्रकार मायबोलीवरसुद्धा बऱ्याच ठिकाणी पहायला मिळतो. दुसऱ्या कोणाच्या धाग्यावर विषय भरकटवणे हे एकमेव उद्दिष्ट ठेवून नजर वळवताना त्या नजरकर्त्या आयडीच्या धाग्याबाबत मात्र तसेच इतरांकडून घडले की त्यांचे डोळे उघड़तात आणि मग प्रशासकांच्या दारी विचारपुस मोहीम जोम धरते.

धन्यवाद प्रतिसादासाठी.

विनिता, सिद्धी एकच बाजू झाली - आई सहन करतेय ही .
स्वतःची नजर - ही कथेची दुसरी बाजू

अज्ञानी ... काय बोलताय ते कळत नाहीये... म्हणजे इथे त्याचा संबंध दिसत नाही .

सदरची कथा मानवी वृत्तीवर भाष्य करते तर त्याच अनुषंगाने इकडे पाहिलेले सोदाहरण सांगीतले. त्यामुळे प्रत्यक्ष संबध नसला तरी फक्त एक निरीक्षण नोंदवले.

बाकी कथा तर नेहमी प्रमाणेच अतिशय मार्मिक आणि पौगंडावस्थेतील बहुतांश मुलांसाठी मार्गदर्शक !

आवडली नाही. आपण एखाद्या स्त्रीकडे ज्या नजरेने बघतो त्या नजरेने आपल्या घरातील स्त्रीकडे अन्य कोणी पाहिले तर कसे वाटेल असे काहीसे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. म्हणून काय चांगली फिगर असेल कोणी तर पाहू नये का? नजर फिरवावी का डोळे झाकून घ्यावे? याउलट आपल्याला चांगली फिगर नाही व आपल्याकडे कोणीही पाहत नाही म्हणून तक्रार करणाऱ्या महिला अधिक असतात किंबहुना निसर्गनिमानुसार तेच साहजिक वाटते.

फिगरचा अभिमान असलेली कोणतीही स्त्री कोणी परपुरुषाने पहिले तर ते फार मनावर न घेता ती गोष्ट कोणालाही न सांगणेच पसंद करते कारण ते अपेक्षितच असते व तिच्या घरच्यांना सुद्धा....... हां पण छेड काढली वा विनयभंग केला तर गोष्ट वेगळी... पाहणे गुन्हा नाही. नैसर्गिक आहे. स्त्रीची फिगर चांगली असल्याची पोचपावतीती आहे...

शिवाय असे कोणी पहिल्याने संकोच वाटणारी कोणतीही स्त्री घरी येऊन आपल्या मुलासमोर नवऱ्याला एक पोरगा माझ्या छातीकडे पाहत होता असे थेट कदापि सांगणार नाही. त्यामुळे कथेच्या नायिकेने चिडचिड करून नवऱ्याला सांगणे व मुलाने अपराधी वाटून घेणे अनरियालिटीस्टिक वाटते.

Sad Sad

कथेचा विषय काय, आणि भलते प्रतिसाद देऊन तो कुठे वळवला जातोय?
स्त्रीची फिगर चांगली म्हणून लगेच तिला स्कॅन करायचा परवाना मिळतो की काय?? काय विचारसरणी आहे ही !!! कठीण आहे.

मीनाक्षी कुलकर्णी यांच्याशी सहमत. पण ताई वाईट वाटुन का घेताय? अशा विचारवंताना खलबत्यांत टेचलं पाहीजे. Angry

एकंदरीत सगळा लेख "घरी आया-बहिणी नाहीत का?" याच छापाचा आहे. प्रत्यक्षात बाहेर स्त्री पुरुष दोघेही नजरसुख हवं तसं लुटत असतात, आणि ते करताना कुणीही आपल्या घरच्या आया-बहिणींना, भाऊ वडिलांना आठवत बसत नाही. ही गोष्ट इतकी नैसर्गिक आहे की बऱ्याचदा नकळत लक्ष जाते पण प्रत्यक्षात बघणार्याच्या मनात काहीही वाकडे नसते. म्हणून प्रत्येक वेळी संस्कारांचा बुरखा पांघरून दुसर्यांकडे बोटं दाखवणे मला अगदीच उद्दामपणाचं वाटतं.

आणि स्त्रियांच्या छातीवर नजरा खिळवण्याची खाज फक्त पुरुषांनाच आहे असं समजू नका बरं! या नजरानजरीचाही एक सर्वे आहे, ज्यात सरासरीने स्त्री पुरुष दोघेही स्त्रियांच्या अवयवांवर जवळजवळ सारखीच नजर ठेवतात, असा निष्कर्ष निघाला.(https://news.unl.edu/newsrooms/unltoday/article/unl-eyetrack-study-captu...).
हा दुसरा लेख - https://medium.com/@RobertBurriss/eye-gaze-and-attraction-97955ddd217c. शेवटच्या आलेखात स्पष्ट दिसतंय की स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांना जवळपास एकाच पॅटर्ननुसार स्कॅन करतात.

किमान ह्यावरूनतरी समस्त स्त्रीपक्षाचा नजरेविषयीचा 'नजरिया' बदलायला हरकत नसावी.

मला या अतिलघु कथा प्रकारातील गोष्टी फार आवडतात कारण त्यात जनरली धक्कातंत्राचा वापर केला जातो . चार ओळींची सुरुवात आणि शेवटच्या ओळींत धक्का. मी या प्रकारच्या कथांचा संकलित धागा शोधला इथे पण नाय घावला.
भारीये गोष्ट तुमची.. लिहा अजून इथेच या प्रकारच्या कथा

कितीतरी अभिनेत्री यशाच्या शिखरावर आहेत. कितीरी सुंदर व्यक्तिमत्व असलेल्या स्त्रिया सीइओपद गाजवत आहेत. त्यांच्या फिगर कडे कोणी बघत नसेल असे वाटते का. "सोच" काय असावी हाच खरा प्रश्न आहे व कुणाला "खलबत्यांत" घालून चेच्ल्याने त्याचे उत्तर मिळणार नाही.............. त्यापेक्षा स्वताच्या विचारांत डोकवून बघितले तर अधिक बरे होईल. दोनच उदाहरणे देतो......................

कुणी आपल्या कशाकडे बघितले म्हणून चिडचिड झाली असती तर माधुरी दीक्षित इतकी यशस्वी झली असती का. अमेरिकेत सेटल न होता कुठल्यातरी लांडगापुरातल्या एखाद्या गल्लीत कोण्याएका बिडीफुक्याबरोबर... आपल्या कडे नवऱ्या व्यतिरिक्त इतर कोण पाहत तर नाही न याची काळजी घेत... संसार करत बसली असती ना.

जिचे सर्व काही खुलेआम केलेले लाखो लोकांनी चोरून पाहिले आहे ती सनी लिओन मागच्या वर्षी लातुरात आली होती. छातीकडे का कशाकडे बघणारे अक्षरश किड्यामुंगी सारखे लाखोंच्या संख्येने तिला बघायला आले होते. ती मात्र हेलिकॉप्टरने येऊन टेचात उद्घाटन करून परत हेलिकॉप्टरने निघून गेली. ह्याला म्हणतात कोन्फिडंस. नाहीतर आहेच "तो जळालामेला नीच हलकट माझ्याकडे का बघत होता" म्हणत चरफडत बसायचे.

रोचक कथा आणि प्रतिसाद!

सुडौल शरीर सगळेच बघतात, पण बऱ्याचदा तर त्या सुडौल व्यक्तीच्या लक्षात येत नाही, किंवा लक्षात येणार नाही असेच बघितले जाते. जेणेकरून त्या सुडौल व्यक्तीला आणि पाहणाऱ्यालाही awkward वाटणार नाही, आणि तेच योग्य आहे. फक्त नजरेत कॉम्प्लिमेंट हवी, हपापलेपणा नसावा इतकंच!

एक निरीक्षण: एखादा अनोळखी पुरुष जर एखाद्या स्त्रीच्या आसपास असेल, आणि आकर्षित होऊन बघत असेल तर ते त्या स्त्रीला नक्की कळते.. म्हणजे तो पुरुष नजरेच्या टप्प्यात नसेल तरीही.. 6th सेन्स असेल कदाचित. आणि विशेष म्हणजे प्रतिसादही येतात, जसे की ती नजर आवडत नसेल तर लगोलग ती हटवण्यासाठी उपाय आपसूक केले जातात (पदर नीट करणे वगैरे). बऱ्याचदा आश्चर्य वाटते अश्या गोष्टींचे कि हे मेकॅनिझम काम तरी कसे करते म्हणून?

इथल्या (खऱ्याखुऱ्या) स्त्री idनां एक प्रश्न: तुमच्याबाबतीत असे कधी घडले आहे का?

विषय उगाचच वाढवला जातोय म्हणून हे स्पष्टीकरण.(जे मी सहसा देत नाही)

मुळात ह्या ज्या लहानशा कथा असतात त्या बऱ्याच वेगवेगळ्या आशयाच्या असतात. थोड्या शब्दात मोठं काहीतरी सांगणाऱ्या. काहींना आवडतात काहींना नाही आवडत. अशा वेळेला कथेच्या विरोधात असणारे त्या दृष्टीने बघतात अन कथेच्या सहमतीने असणारे कथा समजून घेतात.

मुळात वरील कथा हि सामान्यांची कथा आहे. स्त्रीच्या अनुभवाची. जे काही बाहेरच्या देशाचे ठोकताळे बांधले आहेत त्यांनी सर्व्हे नक्कीच भारतीय स्त्री-पुरुषांचा / त्यांच्या मानसिकतेचा केलेला दिसत नाही. कथेतून एक लहानसा अनुभव सांगितला आहे. सरळसकट कोणावर आरोप केलेला नाही त्यामुळे एवढं चिडून / वैतागून प्रतिसाद द्यायचं काहीच कारण नाही. प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत असं घडतंच किंवा प्रत्येक पुरुष असच करतो असं नक्कीच त्यात म्हटलं नाही.

शेवटच्या वाक्यात त्याला त्याची 'नजर' आठवली ... ती नक्की कशी होती ? मग ती चुकीची आहे का? मग हे तिला कळत असेल का ? की तिचा समज- गैरसमज झाला असेल ? किंवा मग................ असे खूप काय काय प्रश्न ... जे वाचकाने समजून घ्यायचे असतात. म्हणूनच "जैसी जिसकी सोच " .