आता फक्त पाऊस पडतो....

Submitted by अजय चव्हाण on 11 July, 2019 - 07:12

आता फक्त पाऊस पडतो
पण भरून मन येत नाही
आता आठवतात नवे काही क्षण
पण "ती" आठवत नाही..

गजांतून थंड ओघळ वाहणे नाही.
गुलाबी वार्याने ते शहारणे नाही...
एकटाच खिडकीत उभा मी..
हळूच दारातून, तुझे पाहणे नाही..

कवितांच्या अलगद पाने लिहणे नाही..
अडखळतो शब्दांत मी,तुझे सांगणे नाही..
सरीतातिरी कपाळावर टिंब तुझे नाही..
पाण्यात चांद तुझा, प्रतिबिंब माझे नाही..

उरलेलं ऋणासारखं आयुष्य माझं..
त्यात साथ तुझी का नाही.
भिंतीवरच्या फोटोत एकटीच तु..
खंत वाटे जीवाला त्यात मी का नाही..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवितांच्या अलगद पाने लिहणे नाही..
अडखळतो शब्दांत मी,तुझे सांगणे नाही..
सरीतरी कपाळावर टिंब तुझे नाही..
पाण्यात चांद तुझा,
प्रतिबिंब माझे नाही..
>>वाह! खुपच सुंदर
पु.क.प्र! Happy

भिंतीवरच्या फोटोत एकटीच तु..
खंत वाटे जीवाला त्यात मी का नाही.. अरेरे !
पण खूपच आवडली

सरीतरी कपाळावर टिंब तुझे नाही..
पाण्यात चांद तुझा, प्रतिबिंब माझे नाही..>> यात सरीतरी म्हणजे काय ?

शेवट वाचताना चर्र......झालं +१ खरंच
संपूर्ण कविता सुरेख लिहीली आहे.

एकटाच खिडकीत उभा मी..
हळूच दारातून, तुझे पाहणे नाही..
- या ओळी पण मस्त जमल्या आहेत.

@anjali_kool
टाईपिंग मिस्टेक..खरंतर मला सरीतातिरी असं लिहायचं होतं..
संपादित केल आहे...प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

टायपिंग मिस्टेक..
खरंतर मला सरीतातिरी असं लिहायचं होतं..>>>टायपो होता?! मी पावसाच्या सरी या अर्थाने वाचलेली कविता. Happy