संभाजी : येत आहेत

Submitted by मी - सागर on 7 September, 2017 - 02:50

संभाजी : येत आहेत

झी मराठी वर लवकरच वेळ आजून माहीत नाही पण कुठलीतरी शिरेल बंद होणार असा दिसतंय.

Upcoming Sambhaji Maharaj serial teaser

https://www.youtube.com/watch?v=AjKvkh1Qweo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी, माहीत आहे राहुल, बोक्या सातबंडेमध्ये बोक्याचा मोठा भाऊ होता खूप वर्षपुर्वी, खूप देखणा दिसायचा तेव्हा. आता रया गेली आहे. प्रोमो काही वेगळाच दाखवतात आणि मालिकेत काही वेगळेच चालू असते. प्रोमो पाहून कुणालाही वाटेल की अनाजीपांत सापडले आहेत पण कसचे काय.

पण सर्व कलाकार अगदी हिर्‍यासारखे चोख आहेत. बाळाजीपंतांचे काम करणारा नझीर खान हा कलाकार अक्षरशः शुद्ध पुणेरी बोलतो. अनजी पंतांचे काम करणारे महेश कोकाटे यांनी सुद्धा किती बेरकीपणा दाखवलाय भूमिकेत. हिरोजी फर्जंद असो, नेताजी पालकर असो, यांचे नाणे कामाच्या बाबतीत खणखणीत आहे.>> माझं पण तेच म्हणणं आहे रश्मी..

तो काय दिग्दर्शक सांगेल तसा बोलणार
शेवटी काय घडलं यापेक्षा काय दाखवायचं आहे हे एकदा ठरलं असेल तर दुसरे काय होणार

आणि मग ज्यांना सोयीस्कर आहे ते म्हणणार वाह, हाच खरा इतिहास

आनंद आहे

कावेरी बाईंची किती तगमग झाली असेल याची कल्पना करवत नाही. एका बाजुला अनाजी सारख्या खाल्या ताटात विष्ठणार्‍या व्यक्ती आणि एका बाजुला कावेरीबाईंसारख्या खाल्ल्या घराचे वासे न मोजणार्‍या व्यक्ती स्वराज्यात होत्या. कालचा भाग खरेच खुप भावला.

कालच्या भागात अनाजी प्रभुणेकरासहीत खाल्लेल्या ताटात विष्ठणारे सर्व देशद्रोही दोषी ठरले. सोयरा राणीसाहेबांवर येऊ घातलेला किटाळ आपोआप दूर झाला.
आजच्या भागात छ. संभाजी महाराज त्या लफंग्यांना शिक्षा करणार. आजच्या भागाची झलक दाखवत असताना शंभुराजे जे काही म्हणाले त्याला तोड नाही... सर्वांनीच विचार करण्यासारखी गोष्ट सांगितली त्यांनी.

Lol देशद्रोही अणाजी!

पण खरंच खुप जास्त लांबड लावताहेत आता.झीमवाले.
टिआरपीच्या नादात चुकीचा इतिहास पोचवताहेत याची साधी कल्पना पण नाहीये का त्यांना? Angry

एरवी जरा जास्तच मेलोड्रामॅटिक असल तरी आजच भाषण मात्र अगदिच चुकिच वाटल, तस काही इतिहासात घडल असेल यावर मात्र विश्वास बसत नाही.

मला तेव्हा हसू आले ( मी नुसते डॉयलॉग ऐकले, खरे आहेत का ते? ) जेव्हा संभाजी महाराज की कुणीतरी म्हणतं की अनाजी पंतांना शिक्षा झाल्याने त्यांचे ज्ञाती बांधव ( जात बांधव ) नाराज झाले आहेत. असे कसे होऊ शकते? कोण कशाला नाराज होईल? जर अनाजी पंत, जनार्दन पंत हे विष प्रयोगात सामिल आहेत, स्वराज्याचे गुन्हेगार आहेत तर त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हायलाच पाहीजे. आणी मग तसे पाहीले तर अनाजी पंत ब्राह्मण म्हणून त्यांचे जात बांधव त्या शिक्षेने नाराज झाले, तर या गुन्हेगारांमध्ये संभाजी महाराजांचे पण ३-४ नातेवाईक सामिल आहेतच की. हिरोजी फर्जंद आणी अजून काही या कटात सामिल असतात. मग काय अख्ख्या मराठा समाजाने पण नाराज व्हायला पाहीजे का?

काय लिहीतो या सिरीयलचा लेखक पण. डोक्यावर पडलाय का?

सिरियल चे डायलॉग ऐकून लेखकावर कोणी आरोप करु नयेत की ब्राम्हण द्वेष्टे आहेत, तसेच संभाजी महाराजांची इमेज जपली जावी आणि सोयराबाईंना क्लिनचीट देता यावी या अनुषंगाने लिहिले आहेत असं वाटलं.
आवजीने सोयराबाई ची पाठराखण केली तर त्यांना माफी चा साक्षीदार का नाही बनवले, सोयराबाई नी ज्या पत्रावर मोहर उमटवली तो मजकूर काय होता हे ही सोयिस्करपणे टाळले आहे. त्याचे डायलॉग पण असे की आम्ही काही न करता आम्हावर दोष येतो (?).
असो. खरं खोटं माहित नाही म्हणून आता त्यामुळे तेढ पसरु नये म्हणून हे सांभाळून लिहिलेले संवाद...

आवजीने सोयराबाई ची पाठराखण केली तर त्यांना माफी चा साक्षीदार का नाही बनवले, सोयराबाई नी ज्या पत्रावर मोहर उमटवली तो मजकूर काय होता हे ही सोयिस्करपणे टाळले आहे. त्याचे डायलॉग पण असे की आम्ही काही न करता आम्हावर दोष येतो (?).>>>> हेच तर म्हणायचे आहे मला कुरुडी.

विचार करा की छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज या दोघांनी जनतेला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळले, त्यांच्यावर माया केली, कुठलाही भेदभाव नाही केला. जनतेला एका छत्राखाली आणले. ते संभाजी महाराज कुणाच्या ज्ञातीचा उल्लेख कशाला करतील? जो माणुस राजा रामा प्रमाणे निर्भीड होऊन राज्य करतो, तो या जातीपातींना फालतु महत्व देईल?

हो, एक गोष्ट मला अजूनही खरच कळली नाही की त्या काळात ब्राह्मणांनी शिवरायांना राजा का मानले नाही, गागाभट्टांना काशीहून का बोलवावे लागले? कारण ब्राह्मण समाज म्हणाल तर त्याच समाजाचे समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांना राजा रामा ( श्री राम ) प्रमाणे मानत होते. मग बाकीच्यांनी का विरोध करावा? आणी तीच चूक खरच अक्षम्य होती.

खरे तर ज्यांनी ज्यांनी शिवचरीत्र आणी संभाजी महाराजांचे चरित्र अभ्यासले आहे, त्यांची मते पण घ्यायला हवी होती.

नाही म्हणजे कळकळ समजु शकते.. Wink

हीच कळकळ तेव्हा संभाजी महाराजांनी ओळखली असावी जेणेकरुन अनाजीच्या त्याच्या वंशजांना तरी सुबुद्धी यावी म्हणुन कदाचीत एवढी होउनही त्या अनाजीला माफी देण्याचा विचार केला असावा.

परंतु अनाजीच्या कटकारस्थानाचे गांभीर्यच एवढे होते की त्याच्या बायकोने देखिल त्याची साथ सोडली. इतिहासाला नावे ठेवताना अनाजीचे उदात्तीकरण करण्याच्या हट्टापाई कावेरीबाईचा करारीपणा मात्र कोणालाच कसा दिसत नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. असो.. शेवटी खोट्याला थारा मिळत नाही.. सत्य कधी ना कधी समोर येतेच..! Wink

>>हो, एक गोष्ट मला अजूनही खरच कळली नाही की त्या काळात ब्राह्मणांनी शिवरायांना राजा का मानले नाही, गागाभट्टांना काशीहून का बोलवावे लागले? कारण ब्राह्मण समाज म्हणाल तर त्याच समाजाचे समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांना राजा रामा ( श्री राम ) प्रमाणे मानत होते<<

मागे ह्या विषयी, कुठे तरी वाचनात आले होते की, गागाभट्टांना काशीहून बोलविण्यामागे कारण एकच होते की इथल्या कुठल्याही ब्राहमणांस्/पुरोहितांस शास्त्रशुद्ध राज्याभिषेक विधी ठावुक च नव्हता !! शिवरायांच्या आधी आपला असा कुणी राजा होता काय ? तेच आपले पहिले राजे, छत्रपती, तारणहार... त्या आधी ६००-७०० वर्ष आपण गुलामगिरीत च तर होतो !! मग इथल्या कुठल्याही ब्राहमणांस्/पुरोहितांस शास्त्रशुद्ध राज्याभिषेक विधी कसा ठावुक असेल ? मी स्वतः ब्राम्हण असुन खेदाने ही गोष्ट नमुद करु इच्छितो की आज कित्येक ब्राम्हण कुटुंबियातील पोरांना/त्यांच्या आइ-वडिलांना च बेसिक पुजा-पाठ वगैरे गोष्टी येत नाहीत, कदाचित तसेच त्या काळच्या ब्राहमणांस्/पुरोहितांस शास्त्रशुद्ध राज्याभिषेक विधी ठावुक च नसेल. Isn't it ?

प्रसन्न - विचार करण्यासारखा मुद्दा आहे
हे झाले असू शकते

मुळात मला कळत नाहीये दोन आठवड्यापासून कावेरी बाईने थेट पुरावे दिलेत तरी अजून मालिका वाल्यांचे कोर्ट कोर्ट खेळणे काय संपत नाहीये. अनाजी प्रकरण हे राजांच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगांपैकी एक होते.
ते छत्रपती झाले तेव्हा अनेक मोठी आव्हाने समोर होती आणि राजांनी बेधडक मोहिमा काढून पोर्तुगीज ते सिद्दी सगळ्यांना नमवले
ते दाखसायच सोडून हे अनाजी प्रकरण किती उगळणे सुरू आहे?

@आशुचँप : द्वेष पसरविणे, आणि आधीच असलेला किंवा पसरलेल्या द्वेषास खतपाणी घालत राहाणे, जो पर्यंत दहा+दोन मती कडुन पुढील ऑर्डरी येत नाहीत तो पर्यंत !!

ते छत्रपती झाले तेव्हा अनेक मोठी आव्हाने समोर होती आणि राजांनी बेधडक मोहिमा काढून पोर्तुगीज ते सिद्दी सगळ्यांना नमवले
ते दाखसायच सोडून हे अनाजी प्रकरण किती उगळणे सुरू आहे? > +१

आजकाल कुणीही काही खरं दाखवलं/बोललं की लोकं १२मतीकडे काय बोट दाखवतात काही कळात नाही Proud

अरे सत्य काय आहे ते स्विकारा ना... घाला ना त्या अनाजीला शिव्या..! ते आठवडाभर दाखवु देत अथवा महिनाभर.. ईतकी वर्षं दाबुन ठेवलेली हरआमखोर लोकांची हरआमी चव्हाट्यावर येते आहे हे काय कमी आहे का..?

डीजे हेच मी मागेही तुम्हाला याच धाग्यावर विचारले होते की कुठला खरा इतिहास....या मालिकेत दाखवला जाणारा इतिहास हाच खरा आहे बाकी सगळे खोटे असा दावा आहे का?

तुम्ही खोडुन दाखवा मालिकेतील इतिहास खोटा आहे ते..

बाकी मालिका उत्तम आहे.. कलाकार कसलेले आहेत.. लेखक अभिनंदनास पात्र आहेत..

आजकाल कुणीही काही खरं दाखवलं/बोललं की लोकं १२मतीकडे काय बोट दाखवतात काही कळात नाही >>>>> डिजे, हे पण सत्यच आहे की, तुम्ही एकटे मानत नसला तरी. Proud

आमचे पण हेच म्हणणे आहे की संभाजी महाराजांचा पराक्रम सोडुन लेखक भाऊ अनाजीला का कुरवाळत बसलेत. सत्य तर आम्ही प्रेक्षकांनी कधीच स्वीकारलेय. पण या सिरीयल मध्ये महाराजांचा पराक्रम सोडा, कुठल्याही मोहीमाही जास्त दाखवल्या नाहीत. उलट कौटुंबीक वाद जास्त दाखवलेत.

बरं, अनाजी प्रकरण ताजे ताजे आहे, जेव्हा शेवट येईल तेव्हा महाराजांना कोणी कपटाने औरंग्याच्या हवाली केले हे ही लेखकाने विस्ताराने दाखवावे म्हणजे लेखक व निर्माते किती कुशल ( बद्रिके नव्हे ) आहेत तेही कळेल.

डॉ. जयसिंगराव पवार ज्यांनी आजवर १३ इतिहास संशोधन ग्रंथ लिहीले, त्यात कित्येक ग्रंथाना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला, जे अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष होते, ज्यांनी छत्रपती राजाराम यांच्यावर पीएचडी केली आणि ज्यांना २००० साली जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार मिळाला

ते आपल्या मराठी सत्तेचा उद् य या पुस्तकात स्पष्टपणे म्हणतात

'सोयराबाई कटवाल्यांना सामिल होत्या आणि त्या १६८१ मध्ये विषप्रयोगाने मृत्यू पावल्या. मुंबईकर इंग्रजांची बातमी अशी होती की संभाजीराजांच्या आज्ञेनेच त्यांना विष देण्यात आले.'

या पुढे पवार लिहीतात

'तिच्या अपराधाबद्दल तिला मिळालेली शिक्षा ही राजनीतीत बसणारीच होती.'

मराठी सत्तेचा उद् य, पृष्ठ क्रमांक २५८,
लेखक डॉ. जयसिंगराव पवार
क्रमिक पुस्तक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

आता हे खरे मानायचे का खोटे

>>घाला ना त्या अनाजीला शिव्या..! <<

अनाजीला का अनाजीच्या निमित्ताने ब्राम्हणांना?
या डीजे नामक जातीयवादी आयडीला वाटते की आपण डोळे मिटून दूध पितो पण जगाचे डोळे उघडे असतात

डीजेडॉटडॉट....तू जळत रहा मज्जा येते बघायला Proud

कसं आहे डीजे, इथे कोणी अनाजीला निर्दोष म्हणा म्हणत नाहीये. त्याने आणि त्यावेळच्या अष्टप्रधान मंडळातील कारभाऱ्यांनी एकदा नव्हे तर दोनदा छत्रपतीविरुद्ध कट केला आणि त्याला हत्तीच्या पायी देण्यात आले ही अतिशय योग्य आणि न्याय शिक्षा होती. कुठल्याही राजाने हेच केले असते.

तसेच, तुम्ही जो खोटा इतिहास म्हणताय की जो मधल्या काळात रंगवला गेला होता, की राजांचे प्रेमप्रकरण, विलास, मद्यपान हे एक टोक होते आणि राजांना असे रंगवल्याबद्दल त्या कादंबरीकारांना फटकावून काढायला हवे होते. कुठलाही असा मद्यधुंद, स्त्रीलंपट, विलासी राजा आठ वर्षे इतक्या विविध शत्रुंना एकाच वेळी तोंड देऊ शकला नसता.

ते एक टोक झाले आणि आता जे सुरु आहे ते दुसरे टोक. स्वराज्यात जे जे अहितकारक, राजद्रोह आणि कट झाले ते केवळ आणि केवळ ब्राह्मणांनी केले असे मालिकेद्वारे ठसवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला विरोध आहे.

ब्राह्मणांवरचा राग असणे समजू शकतो, कारण पेशवाईच्या काळात जो काही उन्मत्त अत्याचार त्यांनी केलाय त्याला क्षमा नाहीच. अतिशय घृणास्पद असा तो इतिहास आहे. पण म्हणून केवळ ब्राह्मण बॅशिंग केले म्हणजे खरा इतिहास असा जो काही प्रचार चालवला आहे त्याने केवळ तेढ निर्माण होत आहे.

अर्थात तोच उद्देश्य असल्यास काय बोलणार

Pages