पूर्वी आपण जिथे भेटायचो , तिथे आता एक टपरी झालीय

Submitted by सिद्धेश्वर विला... on 8 July, 2019 - 09:20

पूर्वी आपण जिथे भेटायचो

तिथे आता एक टपरी झालीय

एक तपानंतर पुन्हा कप घेतला

पण कटिंग इथली बरी झालीय

वळणे घेत घेत तू तिथून तर मी कुठून कुठून यायचो

कधी तू तर कधी मी , या इथेच झाडामागे तोन्ड लपवायचो

मी घाबरून तुलाच म्हणायचो हळहळू डेरिंग बरी झालीय

त्या झाडामागे बराच इतिहास घडला

तो काळ सुवर्णाक्षरात लिहावा असा

पण नंतर तुटलो ते कायमचेच जणू भेटलोच नव्हतो

आज इथे आलो तेव्हा साठी माझी पुरी झालीय

असेल तीही स्वतःच्या नातवंडांबरोबर खेळत

मीही व्यग्र माझ्या जीवनात

तिच्या कपाळावर मळवट भरायची इच्छा होती

ती मात्र कायम अधुरीच ऱ्हायलीय

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पहिली ओळ जबरदस्त आहे, पण शेवटच्या ओळींवर परत एकदा विचार करावा.

काही शब्द वेचावे अन काही जपून ठेवावे
हे मनात साचलेलं परतून लिहावे

आपले म्हणणे बरोबर आहे , पण हे सुचलं आणि टंकल आणि सोडून दिल .. आणि काय आश्चर्य म्हणावे , ज्याच्या कथांचा मी पंखा आहे , आज त्यानेच मला हे सुचवावे .. अलभ्य लाभ ,, अलभ्य लाभ .. धन्यवाद ,, चैतन्य साहेब .. त्रिवार धन्यवाद