हैदराबाद मध्ये cbsc school मध्ये तेलगू भाषा घ्यावीच लागेल का ?

Submitted by Cuty on 7 July, 2019 - 07:22

Company change झाल्यामुले लवकरच पुणे ते हैदराबाद शिफ्ट होणार आहोत. मुलगा 4थी ला आहे. तिथे शालेत तेलगू घ्यावीच लागेल का? घरात कोणालाच तेलगू येत नाही. काय करावे? त्याला मराठी,हिंदी लिहीता वाचता येते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पहिल्या वर्गात आणि सहाव्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तेलुगू शिकण्यास सुरवात करणे अनिवार्य आहे.
म्हणजे तुमच्या मुलाला आता लगेच तेलुगू घ्यावे लागणार नाही. सहावी पासून घ्यावे लागेल. जर हैद्राबादलाच बरीच वर्षे राहायचे असेल तर दोन वर्षात तो बऱ्यापैकी तेलुगू बोलायला शिकेल. सहावीत जाण्यापूर्वी त्याला तेलुगू बाराखडी शिकवली की पुढे जड जाणार नाही.

एकदम सोपी भा षा आहे. तुम्हाला पण कामी येइल शिकणे तिथे शॉप मध्ये, कामवालीशी बोलायला बरे पडेल. सध्याचे रूल काय आहेत माहीत नाही. शाळेत विचारून घ्या. मुख्य म्हणजे मराठी व तेलुगुत साम्य आहे. बच्चु लगेच पिक अप करेल.

हिंदी घेऊ शकता २ री किंवा ३ री भाषा, पण मुलाला ३री भाषा काय निवडणार ते विचार करुन निवडा, फ्रेंच, संस्कृत असे घेतलेत तर नंतर कुठे बदली झाली तर मिळेल ना ते बघा
फक्त ६ वी नंतर तेलुगु ची ओळख होईल इतपतच तेलुगु शाळेत शिकवतात (४थी भाषा म्हणुन)
ते टाळायचे असेल ( ४थ्या भाषेचे ओझे वाटत असेल तर) ३ री भाषा म्हणुनच तेलुगु घ्या